एन्दिरन स्तोत्र - ३

   -----भाग २ पासून पुढे ----                                                                          भाग १ इथे वाचा       
          
शांतीचा संदेश जरी चिट्टी  वदला । परी तो न कुणा पटला ॥ जगी कायदाच हा भला । निश्चीत असे ॥१०६ ॥
वसीगरनचा पारा चढला । चिट्टीसी घेऊनी आला ॥ बोल बहु  लाविला ।  रागाच्या भरात ॥१०७॥
प्रेम करण्याची केली याचना ।  आणिक जगू देण्याची याचना । परि वसी ऐकेचना । चिट्टीची विनंती ॥१०८॥
जग हे अमानुष खरे । प्रेम करणार्‍याला म्हणती भले-बुरे ।शरण न येती जोवरे । प्रेममार्गी ॥१०८॥
प्रेमाची ही न्यारी किमया । विरोध करते जरी दुनिया ।। प्रसंगी अपुला जीव देऊनिया । प्रेम अमर करती ॥१०९॥
चिट्टीच्या प्रेमाग्रहाने त्रासुनी । वसी आणिक ती तरुणी ।। थकुनि गेले समजावुनी । चिट्टीस त्या ॥११०॥
वसीने निर्वाणीचे निर्णय घ्रेतले । चिट्टीचे अंगविच्छेद केले ॥ मन गहिवरून जाते अपुले । दृष्य बघुनी ॥१११॥
अंग अंग वेगळे होतांना। प्रेमाचीच करी याचना ॥ विट्टीची ही वेदना । पाहवत नाही ॥११२॥
फ़ेकुनि देतो कचर्‍यात । अपुल्या हस्ते निर्मीत ।चिट्टीची ती गत । हेलावणारी ॥११३॥
चिट्टीचा हा अंत नसे खरा । दुष्ट तो डॉ. बोहरा ॥ त्याच्या हाती लागला झरा । विषाचाच बघा ॥११४॥
चिट्टीला जीवनदान दिले । तयासी अपुला केले ॥ त्याला विनाशक बनविले । अपुल्या स्वार्थासाठी ॥११५॥
दुष्टांची ती संगती । अनिष्टच असे अंती । चिट्टीची ती गती । बघा जरा ॥११६॥
यंत्रमानवाचा Version 2.0 आला । चिट्टी हा दुष्ट झाला । मारुनिया बोहराला ।दिले बघा ॥११७॥
सनाचे अपहरण नाट्य बघा । चिट्टीचा हिंसाचार बघा । आणिक तुम्ही बघा । तंत्राची कमाल ॥११८॥
प्रेमवेडा जो असतो । विश्वासी भारी पडतो । हे सत्य तुम्हा सांगतो । साक्षात रजनीदेव ॥११९॥
परि शक्तीहून युक्ती श्रेष्ठ असे । हे जयाच्या मनी ठसे । तोचि विजेता असे । युद्धभूमीवर ॥१२० ॥
चिट्टी अतिप्रगत रोबोट जरी । परि तयाहून भारी ॥ मानवाची बुद्धी खरी । हेचि सत्य ।।१२१॥
प्रबळ झालेला चिट्टी । निर्मीतो सहस्त्र प्रतिचिट्टी । कळपात जसे हत्ती । मदमस्त सारे ॥१२२॥
सना जी विश्वसुंदरी । तिला अपुली राणी करी । तिजकरिता आणली सारी । दुकाने लुटुनिया ॥१२३॥
सनाला वाचविण्यासाठी । चिट्टीला मारण्यासाठी । प्रभावी जी युक्तीचीच  काठी । वसी वापरतो ॥१२४॥
आता कथा मी न सांगावी खरी । तुम्ही ती बघणेच बरी ॥  जी असे अचंबित करणारी । सर्व भूमंडळी ॥१२५॥
ही कथा न भूतो न भविष्यति । यात नाही अतिशयोक्ती ॥ करा करा हो रजनीभक्ती । गजर नामाचा ॥१२६॥
तंत्रज्ञानाची कमाल बघा । रजनीदेवांचे चमत्कार बघा ॥ सह्स्त्ररजनी बघा। पडद्यावरी ॥१२७॥
रजनी एके रजनी । दृष्य असावे लोचनी । दुसरे ध्यानी- मनी । कदापि नसावे ॥१२८॥
रजनीदेवांच्या भक्तांनी । भारतीय सिनेमाभक्तांनी । तंत्रज्ञानभक्तांनी । दर्शनास यावे ॥१२९॥
शेवटच्या अर्ध्या तासात । भक्तांनी यावे तालात । रजनीनामाच्या गजरात । दृष्य बघावे ॥१३०॥
रजनीदेवांचा हा चित्रपट आगळा। रजनीभक्तांसाठी आहे सोहळा । रजनीशत्रूंना येतील भोवळा । चित्रपट बघुनि ॥१३१॥
भारतीय सिनेमाच्या इतिहासात । सिनेमा असा अद्भुत । बनला नाही भूतकाळात । एन्दिरन सारखा ॥१३२॥
हा चित्रपट बघावा । बोध मनी घ्यावा । आणिक अनुसरावा ।संदेश यातला ॥१३३॥
एन्दिरन हा आहे सागर । तयाचे दृष्य करण्या साकार । स्वामी संकेतानन्द लाचार ।समर्थ नसे ॥१३४॥
परि मी प्रयत्न केला ।रजनीदेवांची दाखविण्या लीला । काही चुकल्यास मला ।क्षमा असावी ॥१३५॥
हे स्तोत्र व्हावे अमृत । अवघ्या रजनीभक्तांप्रत । रजनीदेवाने साक्षात ।आशीर्वाद द्यावा ॥१३६॥
रजनीनामाचा गजर करावा । श्रद्धेने स्तोत्र वाचावा । अविश्वास न ठेवावा । या स्तोत्राप्रत ॥१३७॥
रजनीदेवांचा असावा आशीर्वाद । देवाजींचा मिळावा कृपाप्रसाद । मान्य व्हावे निर्विवाद । स्तोत्र हे ॥१३८॥
स्तोत्र करिता पठण । दिसतील त्याचे गुण । प्रसाद म्हणून ग्रहण ।यासी करावे ॥१३९॥
स्तोत्राप्रति सद्भाव ठेवावे । नित्य वाचन करावे । रजनीदेवासी भजावे । प्रतिदिनी ॥१४०॥
रजनीदेवांच्या कृपेने । स्वामी संकेतानन्दांच्या लेखणीने । मुक्कामी शहर पुणे ।स्तोत्र रचियले ॥१४१॥
इसवी सन दोन हजार दहा साली । ऑक्टोबर महिन्यात  स्फूर्ती झाली । आणिक स्तोत्ररचना केली। त्याच महिन्यात ॥१४२॥
रजनीनाम स्मरण करुनी । देवाजी आणुनि लोचनी । ठेवितो ही लेखणी । स्वामी संकेतानन्द ॥१४३॥


॥  इति स्वामी संकेतानंदविरचित श्रीएन्दिरन स्तोत्र: ॥

॥ श्रीरजनीकांतार्पणमस्तु ॥
॥ श्री रजनीकांताय नमः ॥
॥ शुभं भवतु ॥

टिप्पण्या

  1. स्वामी संकेतानंद आपण महान आहात !!! आणिक काय लिहिणे? :)

    उत्तर द्याहटवा
  2. @ heramb :
    आम्ही कसचे महान !!! ही हेरंबाचीच कृपा आहे !!!(श्लेष लक्षात आला असेलच :-)!! ).
    आभार्स !!!

    उत्तर द्याहटवा
  3. स्वामी संकेतानंद आपण महान आहात !!! आणिक काय लिहणे? :)..+१
    खरच भन्नाट लिहलयस हे ऐकुणच एन्दिरन स्तोत्र...

    उत्तर द्याहटवा
  4. अंधासी दिव्यदृष्टी, मुकबधिरासी श्रवणवाणी असे हि स्तोत्राची करणी |
    झाल्या जागृत बधिर पंचेंद्रियांच्या जाणिवा ||
    भजा भजा एन्दिरन आणिक तो स्वामी संकेतानंद |
    भक्तांसी ज्याने रजनिदेव वर्णिला ||

    उत्तर द्याहटवा
  5. हे देवा रजनीराया । धन्य आहे तुझी माया । बा सदया करुणामया । तारी भक्तां ॥ १ ॥
    तुझे स्तोत्र रचूनी । संकेतानंदस्वामींनी । केले उपकृत जीवनी । धन्यवाद त्यांचे ॥ २ ॥
    स्तोत्र तीन भागांचे । नित्यदिनी म्हणता वाचे । निर्दालन होई पापांचे । सर्वांच्याच ॥ ३ ॥
    अंधासी लाभे दृष्टी । होई गरिबावर धनवृष्टी । पुलकित होतसे सृष्टी । तव कृपेने ॥ ४ ॥
    मुखी येता रजनीनाम । जळून जाई कुकर्म । सार्थ होतसे नरजन्म । कलियुगी ॥ ५ ॥

    उत्तर द्याहटवा
  6. देवेनदा, हे महान वगैरे लावू नकोस रे !! फोटोला आणि पुतळ्याला हार घातलेला असलेली दृष्य डोळ्यासमोर येतात... :))
    आभार्स !!!

    उत्तर द्याहटवा
  7. बा आपटे असलेल्या संकेता, तू पण एखादे स्तोत्र लिही आता.. माझ्यापेक्षा उत्कृष्ट जमते तुला !!!
    मी ते स्तोत्राच्या चमत्कारांचे वर्णन मुद्दामच टाकले नव्हते.. ते रजनीला जरा जास्तच gr8 बनवल्यासारखे झाले असते ..(रजनीदेव फक्त त्यांच्या लीला करण्याची शक्ती देतात, हेच मी सर्वत्र नमूद केलंय, दृष्टी, धनवृष्टी वगैरे नाही.. याचे कारण माझी श्रद्धा ह्या गोष्टी गंमत म्हणूनसुद्धा लिहू देत नाही रे ...)त्यामुळे ते तू लिहीलंस बरं झालं ... आता स्तोत्र अगदी realistic वाटतंय ...
    आभार्स रे दादा !!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय