पोस्ट्स

सप्टेंबर, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काय लिहू आज...

काय लिहू आज... एक शनिवार कंटाळवाणा .... कितीतरी गोष्टी करायच्या राहून गेल्या.. खरं तर साधा प्रयत्नही  नाही केला... पराभव हा माझाच, लाजीरवाणा .. कित्येक  बघितलेली स्वप्नं... स्वप्नातच विरलेली... दिवस  उजाडताच  नवा ... माझी तीच वाट, अंधारलेली ... एक काळ असा येईल.. माझ्या स्वप्नाप्रमाणे घडेल.. माझी ताकद  मलाच कळेल .. पण तोही..कदाचित स्वप्नातच.. काय लिहू आज ..मी  दुर्मुखलेला. खरडल्या चार ओळीच.. मनस्थिती निराशलेलीच... थांबतो इथेच.. मी कंटाळलेला ..

सार्वजनिक रजनीकांतोत्सव

          आज १२ डिसेंबर, ३०१०. भल्या पहाटे उठून रजनीदेवाजी आराधना करून सहज फेरफटका मारायला बाहेर पडलो. रजनीकांत चौकात आल्यावर एका मोठ्या फलकाने स्वागत केले, " अखिल वैश्विक MIND IT मित्र मंडळ तर्फे आयोजित सार्वजनिक रजनीकांतोत्सव आपल्या हजाराव्या वर्षात पदार्पण करत असल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे ." तो फलक वाचताक्षणीच " स्वामी  संकेतानंद कृत रजनीकांतायण" या प्राचीन महाकाव्याची "MIND IT मित्र मंडळ"  हा अध्याय डोळ्यासमोर तरळला. भावनावेग अनावर होऊन डोळयातून हर्षधारा वाहू लागल्या. शरीर रोमांचित झाले. रजनीकॄपेने आजही "MIND IT मित्र मंडळ" त्याच पद्धतीने सार्वजनिक रजनीकांतोत्सव साजरा करत आहे.एवढेच नव्हे तर हा उत्सव आता संपूर्ण विश्वात सर्व जाती-धर्म-पंथाचे लोक साजरा करतात. या सणाने जगभरातील भेदभाव कामयचा नष्ट केलाय.          आता घरी आल्यावर माझ्या संग्रहात असलेले "सार्वजनिक रजनीकांतोत्सव" ची प्रथम घोषणा करणारे ऎतिहासिक पत्रक वाचायला काढले. हजार वर्षं जुने असलेले हे पत्रक आपल्या दर्शनासाठी प्रकाशित करतोय.                                          

१२ रजनीचित्रपट व्रतकथा - २

        जुनी गोष्ट आहे. एक आटपाट नगर होते.लुंगीनगर त्याचे नाव.त्या नगरात एक बस वाहक राहायचा. सगळे त्याला चिदूअण्णा म्हणायचे. खाकी सदरा, खाली पांढरी शुभ्र सुती लुंगी, गळ्यात बांधलेला लाल रुमाल, डोळ्यांवर चढवलेला काळा गॉगल ही त्याची वेशभुषा होती.तो रजनीदेवाचा भक्त होता. तो त्याच्या व्यवसायात आनंदी होता. पण त्याला सुटे पैसे परत मागणार्‍या प्रवाशांचा फार त्रास होता.त्यांच्यासोबत वाद घालतांना प्रकरण कसे निस्तरावे कळेनासे झाले होते. त्याचा हिशोब बरोबर लागत नसे. सुट्या पैशांची कमतरता त्याला हैरान करी. प्रवासी पण त्याचे ऎकेनात.        एके दिवशी त्याला एका सहकार्‍याकडून "१२ रजनीचित्रपट व्रताची" माहिती झाली. सहकार्‍याने सांगितले की, हा व्रत केल्यास तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मग त्याने व्रताची विधी समजावून सांगितली. सोबतच त्याला एक चेतावनी दिली की, हा व्रत मनोभावे पूर्ण कर, देवाजींना विसरू नकोस. " उतू नको, मातू नको, घेतलेली dvd टाकू नको. " इतके बोलून सहकारी आपल्या मार्गाला लागला.       चिदूअण्णाने ठरवले की, आपण हा व्रत करायचा. १२ जुलै ला त्याने व्रताला प्रारंभ केला. तो

तो राजा आमच्याच जातीचा......

        जुनी गोष्ट आहे. शेकडो वर्षं जुनी. भारतवर्षात एक राजा होता. राजा पराक्रमी होता, कलेचा भोक्ता होता, रसिक होता, त्याच्या दरबारी कलाकारांना, साहित्यिकांना मानाचे स्थान होते. राजा स्वतः एक साहित्यिक होता, प्रकांडपंडित, विद्वान होता.आपल्या पराक्रमाने त्याने आपल्या राज्याचा विस्तार केला.सुख-समृद्धीचे राज्य आणले. त्याच्या राज्यात भरभराट होती,प्रजा सुखी होती.         वर्षामागुन वर्षं गेलीत. राजा आता दंतकथेचा, लोकसाहित्याचा विषय झाला होता.त्याच्या पराक्रमाचे पोवाडे गायले जाऊ लागले. त्याची महानता अधोरेखित करणार्‍या म्हणी निघाल्या.त्याच्या काळातल्या वास्तूंना तिर्थक्षेत्राचे स्थान मिळाले         राजा जाऊन शेकडो वर्ष झाली. आता विसावे शतक लागले होते."जात नाही ती जात" चा प्रत्यय येत होता. जाती तिथेच होत्या.महापुरुषांना जातीच्या दावणीला बांधण्याची नवी टूम निघाली. राजा कसा वाचणार! राजा ज्या जातीचा होता त्या जातीने राजावर आपला दावा केला. त्याच्या नावाने त्या जातीने संघटना उभारल्या. सम्मेलने भरू लागली.त्याचा जयंती सोहळा साजरा होऊ लागला. त्याच्या कार्याची महती जात-बांधवांना व्हावी म्हणून

ती....

शृंगारिक कविता किंवा प्रेम कविता हा माझा प्रांत नव्हे. पण एक प्रयत्न केला होता फार दिवसांपूर्वी (फेब्रुवारी ११,२०१०). मग सहजच ती कविता मराठीकविता या संकेतस्थळावर प्रकाशित केली होती.तिथे प्रतिसाद ठीकच होता. पण आता अधिकाधिक लोकांचा प्रतिसाद कळावा म्हणून परत इथे post करतोय. आपली प्रतिक्रिया अगदी परखडपणे द्या. या कवितेनंतर मी पुन्हा कधी या प्रकारात कविता केली नाही.असो, सहन करा आता ही कविता...                                                                                                  ती....                                                    अल्लड अवखळ, पाण्याची खळखळ                                                     तापणार्‍या बनात, पानांची सळसळ                                          ती....                                                    ओठांवर हसू ,लटका राग                                                    भुंग्याचा पिंगा, फुलांचे पराग                                           ती....                                                     पायांत पैंजण,हातांवर गोंदण           

१२ रजनीचित्रपट व्रतकथा - १

         जुनी गोष्ट आहे. एक आटपाट नगर होते पुण्यनगरी त्याचे नाव.त्या नगरीत एक ऑटोचालक राहत होता.वेंकट त्याचे नाव.तो चित्रपटांचा चाहता होता. ईशकृपेने त्याच्या घरी भरभ्रराट होती.कशाची टंचाई त्याला जाणवली नाही.त्याच्याकडे काळा गॉगल होता, पिवळा रुमाल होता. ते त्याच्या देहाचे घटक बनले होते. तरीपण तो दुःखी असायचा. त्याचे मन त्याला खात असायचे. त्याच्या जीवनात एका गोष्टीची कमतरता त्याला कष्टी करायची. तो रजनीकांतदेवांचा निस्सीम भक्त होता. त्यांचे चित्रपट तो दररोज दिवसभर ऑटो चालवून थकल्यानंतर घरी जाण्यापूर्वी बघायचा.रजनीकांतदेवांच्या काही क्रिया त्याला करणे जमायचे.तो गळ्यातून आपला पिवळा रुमाल काढून एकदाच झटकायचा आणि संपूर्ण ऑटो स्वच्छ व्हायचा.ही रजनीकांतदेवांचीच कृपा असे तो समजायचा. अशा अजूनही काही क्रिया ज्या फक्त स्वय‍ं रजनीकांतदेव किंवा त्यांचे निस्सीम भक्तच करू शकतात,त्या तो करायचा.                 तरी तो कष्टी होता. त्याला "उजवा पाय जमिनीवर ठेऊन डाव्या पाय गोल फ़िरवून धुळीचे वादळ निर्माण करणे" ही क्रिया जमेना. ह्याखातर त्याने डाव्या पायाच्या गुडघ्याची वाटी ६ दा मोडली होती.असाच एकदा

१२ रजनीचित्रपट व्रतकथा - प्रस्तावना

                                    ॥ श्री रजनीकांताय नमः ॥ आमच्या असे निदर्शनास आले आहे की, स्वामी संकेतानंद महाराजरचित या अद्भुत व्रताची महती बहुश्रुत असूनदेखील आणि लाखो भक्तांना याची प्रत्यक्ष अनुभूती आली असतांनादेखील कित्येक नास्तिक ह्या व्रताच्या सत्यतेवर शंका करतात. अशा नास्तिक व या भूलोकी राहण्यास अपात्र अशा मंडळींसाठी आम्ही या व्रताच्या १२ दिवसांच्या १२ कथा प्रकाशित करण्याचे योजिले आहे. ह्या कथा म्हणजे भाकडकथा नसून ज्या भक्तांनी हे व्रत यशस्वीपणे व पूर्ण श्रद्धेने केले त्यांनी स्वामी संकेतांनंदाना प्रत्यक्ष येऊन सांगितलेले अनुभव होत.     एका दिवसाला एक याप्रमाणे १२ दिवसांच्या व्रतकालावधीमधे ह्या कथांचे चित्रपट संपल्यावर देवाजींच्या पूर्णाकृती पोस्टरसमोर बसून आरतीअगोदर पठण करायचे आहे.उपस्थित इतर भाविकांनी श्रद्धापूर्वक श्रवण करावे.      पुढील पानापासून आम्ही कथा प्रकाशित करु.                           रजनीकांतजींच्या नावाने.....  MIND IT  अण्णा  !!!     तमिळप्रान्तस्वामी, सहस्रसूर्यप्रकाशित, कोटिहस्तबलाभुषित,सर्वयुद्धकलाविषारद, धुम्रदन्डिकाधारी, कृष्णनयनावरणउच्छालिता, अ

१२ रजनीचित्रपट व्रत-महात्म्य

                                               ॥ श्री रजनीकांताय नमः ॥          अभिनेताशिरोमणी, प्रातःस्मरणीय श्री रजनीकांतदेवजींच्या स्वामी संकेतानंद रचित अद्भुत व शिघ्रफलदायी अशा "१२ रजनीचित्रपट व्रताचे" महात्म्य वर्णनातित आहे. तरीही भक्तांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही आमच्या अल्पमतीप्रमाणे या व्रताचे महात्म्य वर्णन करण्याचे धारिष्ट्य करित आहोत.        भाविकांनी लक्षात घ्यावे की, येथे वर्णिलेले महात्म्य म्हणजे हिमनगाचे टोक होय. ह्या व्रताची यशस्वी सांगता केल्यावर तसेच ह्या व्रतकालावधीमध्येसुद्धा आपल्याला या दिव्य व्रताची अनुभूती येईलच. ती अनुभूती इथल्या वर्णनापेक्षा वेगळीसुद्धा असू शकते. तो देवाजींचा प्रसाद समजून ग्रहण करावा.          आता आम्ही स्वामी संकेतानंद महाराज आणि इतर भक्तांच्या निदर्शनास आलेले " १२ रजनीचित्रपट व्रत " महात्म्य वर्णित आहोत. भाविकांनी श्रध्दापूर्वक तो श्रवण करावा.  १.  ज्या कोणाचे कृष्णनयनावरण(पक्षी : काळा गॉगल) तर्जनीमध्ये फ़िरकी घेत नसेल किंवा मानेला झटला दिल्यास कपाळावर अथवा डोक्याच्या मागे जात नसेल त्यांनी हा व्रत केल्यास त्यांचे प्रयत्न

"१२ रजनीचित्रपट व्रत" - विधी

प्रस्तावना : -        "१२ रजनीचित्रपट व्रत" हे रजनीकांतदेवांचे परमभक्त स्वामी संकेतानंद महाराज ह्यांच्या अनेक वर्षांच्या दिव्य साधनेचे फळ होय. हे व्रत अतिशय सिद्ध व तत्काळ परिणाम दाखवणारे आहे.हे व्रत श्रद्धेने पूर्ण केल्यास रजनीकांतदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या काही लीला करण्याची क्षमता सामान्य माणसात अंगी येते.        समस्त भूलोकीच्या मर्त्य मानवांना या व्रताचा लाभ व्हावा या उदात्त हेतूने ह्या व्रताची सम्पूर्ण विधी स्वामी संकेतानंद महाराज ह्यांनी प्रस्तुत अनुदिनीलेखकास सांगितलेली आहे. ह्या व्रताची अचूक व परिणामकारक विधी फ़क्त याच अनुदिनीवर असून भाविकांनी इतर खोट्या व्रत-अनुदिनींपासून सावध रहावे तसेच अनुदिनीस भेट देण्याआधी http://manmanjusha.blogspot.com या संकेतस्थळाची खात्री करुन घ्यावी. इतर अनुदिनींमधे सांगितलेली व्रत-विधी परिणामकारक नाही याची श्रद्धाळूंनी नोंद घ्यावी. तसेच हे व्रत कॉपीराइट केलेले असल्याने ह्या व्रताची नक्कल व चोरी करण्याचे पातक करु नये. रजनीकांतजी आपल्या गॉगलआडून सगळे बघत असल्याची चोरट्यांनी नोंद घ्यावी               ---  प्रकाशक       व्रतासाठी ल

रजनीकांतची आरती - मराठी

प्रात:स्मरणीय आदरणीय रजनीकांतदेव तमिळप्रांतीय चित्रपट-उद्योगाद्वारे आपल्या लीला दाखवून मर्त्य मानवास धन्य जरी करत असले तरी ते मूळचे आपले मराठे माणूसच (हो हो.. शिवाजीराव गायकवाडच..), त्यांचा भक्तवर्ग हा मराठी मुलुखातदेखील असल्याची जाणीव या पामरास आहे, म्हणूनच आम्ही रजनीकांतदेवजींची आरती मराठीमध्ये लिहावयास घेतली.. रजनीकांतदेवजींच्या प्रेरणेनेच ही आरती लिहीली जात आहे..हा त्यांचाच कृपाप्रसाद.... गोड मानून घ्या..   आरती रजनीकांता, महातेजस्वी संता, रक्षिले भक्तगण, असा तू अरिहंता आरती रजनीकांता ॥१॥ सिगरेट भिरकावली, ओठी अलगद झेलली, गॉगल्सची केली भिंगरी, दुष्टांची त्रेधा उडाली ॥२॥ आरती रजनीकांता... सहस्त्र गुंड भारी, एका बोटाने मारी, यमाला मात दिली, तू आमचा कैवारी ।३॥ आरती रजनीकांता... सोकावले सिनेतारे, चैतन्यमय तू उभा रे, तरुणांचा आदर्श आणि, पिडीतांचा अण्णा रे ॥४॥ आरती रजनीकांता... चित्रपट तुझे बघावे, दु:ख घरी ठेवावे, तुझेच नाम ओठी, ध्यानीमनी जपावे ॥५॥ आरती रजनीकांता... सांगावी किती आता, तुझी पराक्रम गाथा, संकेत भक्त तुझा, चरणी ठेवितो माथा ॥६॥ आरती रजनीकांता, महातेजस्वी संता, रक्षि

रजनीकांतची आरती - हिंदी

आकाशने रजनीकांतच्या आरतीची मागणी केली..निमित्त होते रजनीकांत बसवण्याचे.. जसे आपण गणपती बसवतो ना तसेच रजनीकांत बसवायचा.  आरती मराठीत लिहिणार होतो मात्र एका मैत्रिणीसोबत चाललेल्या chat दरम्यान तिला हि कल्पना सांगितली आणि तत्क्षणी  अगदी सहजपणे आरतीचे धृपद सुचले, ती हिंदी असल्याने आरतीपण हिंदीमध्येच लिहायला घेतली. तिला धृपद आवडले  आणि मग  मी आरती पूर्ण करायला बसलो.  आकाशराव सुद्धा प्रकट झालेत आणि त्यांच्या प्रोत्साहनाने १-१ कडवे लिहित गेलो. अवघ्या १० मिनिटांत संपूर्ण आरती तयार झाली.. आपण वाचून बघा आणि आपले मत कळवा. आरती गाऊन झाल्यावर आपण जशी हाळी देतो ना उदा. "गणपती बाप्पा मोरया " तशी हाळी रजनीकांतच्या नावाने द्यायचे सुद्धा ठरले आणि लगेच एक हाळी सुचली.. ती हाळी अर्थातच आरतीनंतर . मराठी आरतीसुद्धा लिहीली आहे. मराठी आरती इथे वाचता येईल .. जयदेव  जयदेव  जय  रजनीकांता | गुंडों  का  तू  फोड़े  हैं  माथा .. जयदेव  जयदेव ||१ || दस  गुंडों  को  तुने  एक  ऊँगली  से  धो  डाला गरीबो  की  ज्योति  और  जुल्मियो  की   ज्वाला तेरे  जलवे  से  कोई  नहीं  बच  पाता ||२|| जयदेव  जयदेव..... जयद