पोस्ट्स

ऑगस्ट, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जी हाँ, मै एक आम आदमी हूँ..

जी हाँ, मैं एक आम आदमी हूँ अब आपको पता चल गया होगा देख के ताकद मेरे आवाज़ की अब आपका दिल जल गया होगा जी हाँ, मैं वो ही आम आदमी हूँ जो कल तक डरता-सहमता था हालात पे रोता, रोज मर के जीता था जिसकी आवाज़ सैकडों बार दबायी गई और हजारों बार जो छल गया होगा जी हाँ, मैं वो ही आम आदमी हूँ आपके घोषणापत्र में  जिसका चेहरा हैं आपके हर चुनाव में जो एक मोहरा हैं आज  मैंने भी अपनी एक चाल चली तो  आपका शतरंज हिल गया होगा जी हाँ, मैं एक आम आदमी  हूँ मैं प्रजातंत्र को बनाने वाली प्रजा  हूँ आप नहीं श्रीमान, मैं यहाँ का राजा हूँ आज मैंने अपना सिंहासन माँगा हैं तो आपका अभिमान ढल गया होगा जी हाँ, मैं एक आम आदमी  हूँ और मैं जानता हूँ ये देश मेरा हैं मुझसे ही नवनिर्माण का सबेरा हैं आप इस सूरज को छुपा नहीं सकते कोशिश में आपका हाथ जल गया होगा.. जी हाँ, मै एक आम आदमी हूँ अब आपको पता चल गया होगा.. देख के ताकद मेरे आवाज़ की अब आपका  दिल  जल गया होगा..        -- बेंगलुरू,                २७ अगस्त, २०११

अलविदा....

              कॉलेजचे शेवटचे सत्र (मराठीत ’सेमिस्टर’) म्हणजे जरा भावनिकच असते. कॅम्पसमध्ये एकंदरित धमाल असतेच. प्लेसमेंटची गडबड, प्रोजेक्टचे टेन्शन, शेवटचे वर्ष म्हणून आसमंत भरून मस्ती करायची उर्मी, आणि या सगळ्यांचा जोडीला एक हळवेपणाची किनारदेखील असते.. "हे दिवस आता परत येणार  नाहीत " ह्याची पुरेपुर जाणीव असते; आणि त्यात हा "फ़ेअरवेल " नावाचा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार असतो.. जर एखादा दगड या फ़ेअरवेलला आला तर त्याच्या आतूनसुद्धा अश्रूंचे कारंजे फ़ुटतील.. फ़ायनल ईअरच्या पोरांनी रडलेच पाहिजे अशी तजवीज हे ज्युनिअर लेकाचे या फ़ेअरवेलचे कार्यक्रम आखतांना करतात.       अस्मादिकसुद्धा कधी काळी कॉलेजला गेलेले. अस्मादिकांना त्यांच्या ज्युनिअर्सनी फ़ेअरवेल दिलेला; आणि अस्मादिक खबरदारीचा उपाय म्हणून खिशात २-२ हॅंकीज(रुमाली हो !) घेऊन गेलेले, पण मरण कुणाला चुकतंय हो ?         अजूनही तो दिवस आठवला की मन हळवे होते. फ़ेअरवेलचा दिवस होता म्हणून आमच्या ज्युनिअर्सनी आम्हाला वाट्टेल ते करण्याचे स्वातंत्र्य दिलेले..मग काय, उधळलो आम्ही.. एकदा तरी सार्वजनिक स्थळी, चार लोकांत आपला गळा स