पोस्ट्स

जून, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ठाकुरांची (आणि माझीही) कृष्णकलि

इमेज
बंगाली गीतांमध्ये रुचि घेणे सुरु केले तेव्हाची गोष्ट आहे. आबोहोमान चित्रपटातल्या ’For your eyes only ’ गाण्याबद्दल एका बंगाली फ़ोरमवर वाचले नि ते यूट्य़ूबवर ऐकले. त्या गाण्यात रबिंद्रनाथ ठाकूरांच्या ’कृष्णकलि’ आणि जीबोनानन्दो दासांच्या ’बोनोलता सेन’ ( पुढचा लेख हिच्यावरच आहे. ) ह्या दोन काव्यकन्यांचा उल्लेख येतो.  ही मयनापाड्याची मृगनयनी कृष्णकलि कोण असावी हे कुतूहल तेव्हापासूनचे. कृष्णकलि  यूट्य़ूबवर सहज सापडली आणि मी हिच्या प्रेमातच पडलो. आता ही ठाकूरांची न राह्ता माझीही झाली होती. जिंवत चित्रण करणारे काव्य आणि तेही सहजसोप्या भाषेत कसे असावे ह्याचे सुंदर उदाहरण म्हणजे ’कृष्णकलि’. मात्र हे एवढ्यावर थांबत नाही. सुमारे ११० वर्षांपूर्वी लिहीलेली ही कविता अगदी क्रांतिकारी विचारसुद्धा घेऊन आली आहे. कवी एका काळ्या मुलीच्या प्रेमात पडला आहे. मात्र तो तिच्या काळ्या रंगाकडे न बघता फक्त काळ्या, हरिणीसारख्या डोळ्यांकडे बघत आहे. तसेच काळ्या रंगांचे  आणि आनंदाच्या भारतीय संकेतांचे अद्वैत दाखवून तो म्हणतो की  तुम्हाला तिला जे म्हणायचे असेल ते म्हणा, मी तर तिला कृष्णकलिच ( एका प्रकारचे फूल )