पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विडंबन-- पडून आहे सार्त्र अजुनी

पडून आहे सार्त्र अजुनी भावड्या निजलास का रे? एवढ्यातच त्या कम्यूवर तू असा थकलास का रे? अजुनही रचल्या न थप्पी रँडतैच्या पुस्तकांच्या अजुन ’भू’ खचली कुठे रे? हाय! तू खचलास का रे? सांग, ह्या बाख्तीनदाच्या भाविकाला काय सांगू? नच कळे आम्हास ते जे आणि तू रुसलास का रे? बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा फ़्रांत्स काफ़्का, ’रातपारीला बनूनी कीट वळवळलास का रे?’ उगवती डोक्यात माझ्या ’जागतिक’च्या पायवाटा तू बिचार्‍या वाचकांना एवढा  छळलास का रे? -- स्वामी संकेतानंद, १४ नोव्हेंबर,२०१४, नवी दिल्ली

कंपूची लक्षणे

समास पहिला: कंपूलक्षण ॐ नमोजी आंजानरा | लक्ष-लक्ष तारस्वरा | कृपादृष्टी जालवीरा । अवलोकावें ||१|| तुज नमूं गमभन | श्रीबराहा भक्तगण | गुगल इमे तो अन| तुझी रूपे ||२|| वंदून गुगलचरण | करून विकीस्मरण | लाभार्थ कंपूलक्षण | बोलिजेल ||३|| येक कंपू येक ट्रोजनकंपू | उभय लक्षणीं झोडपू | श्रोतीं सादर थोपू | केला पाहिजे ||४|| ट्रोजनकंपूचे लक्षण | पुढिले समासीं निरूपण | सावध होऊनि विचक्षण | परिसोत पुढें ||५|| आतां प्रस्तुत विचार | लक्षणें सांगतां अपार | परि कांहींयेक तत्पर | होऊन ऐका ||६|| जे जालवीर जन | जयांस नाहीं सभाज्ञान | जे केवळ विद्वान | त्यांचीं लक्षणें ||७|| आपुली भुमिका खरी| दाखवोनि विचारी |परकी ती झिडकारी | तो येक कंपू ||८|| देऊन सर्व स्रोत | गुगलून विकी फ़क्त |म्हणवे प्रज्ञावंत| तो येक कंपू||९|| परायडीशी डूख धरी | खवतून उद्धार करी | कमेंट देई विखारी | तो येक कंपू ||१०|| कंपूवीराशी पंगा | घेता करी दंगा | उधळी नाना रंगा | तो येक कंपू ||११|| एकमेकां करे स्तुती |हापिसे भोगी विपत्ति | सांगे कंपूची कीर्ती | तो येक कंपू ||१२|| गंभीर चर्चेवरी | धाग्याचा काश्मीर करी | चालवे टवाळखोरी | तो येक कंप