पोस्ट्स

नोव्हेंबर, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रोमन लिपीत भारतीय भाषा

सध्या sms, e-mail आणि social networking च्या युगात आपण आपल्या मातृभाषेत लिहायला रोमन लिपीचा सर्रास वापर करतो.जवळपास सर्व भारतीय भाषा या उच्चारानुसार लिहिल्या जातात. त्यामुळे आपण रोमन लिपीत लिहिताना आपल्या भाषेतील उच्चारांप्रमाणेच लिहीत असतो. किमान मराठी,हिंदी आणि गुजराती भाषा तरी हा संकेत पाळत असतात.     रोमन लिपीत लिहितांनाचे काही अलिखित नियमच बनलेले आहेत. उदा.- bha-- भ, ta --- त/ट, la -- ल/ळ, d -- द/ड, th-- थ/ठ, dh -- ध/ढ, इ.     वरील नियम मराठी, हिंदी व गुजराती भाषिक म्हणजेच जवळजवळ ५०% भारत पाळत असल्याने संपूर्ण भारतात याच पद्धतीने लिहीले जात असेल असा समज न झाल्यास नवलच.     मात्र कित्येक भारतीय भाषांमध्ये काही शब्द लिहिण्याची वेगळीच पद्धत पाळली जाते. ती आपल्याला माहित नसल्याने अशा भाषेतील मजकूर किंवा नाव किंवा त्या भाषिक व्यक्तीने पाठवलेला संदेश वाचताना बरेचदा आपली गफलत होते. ती टाळण्यास मदत करावी हा या लेखाचा हेतू आहे.     पहिले उदाहरण आहे बांग्ला/बंगाली भाषेचे.         बांग्लामध्ये ’भ’ करिता  ' v ' लिहितात. आपण मात्र ’ व ’ करिता 'v' वापरत असतो. बांग्ला

मन वढाय वढाय...

बहिणाबाईंनी किती समर्पक शब्दांत मनाचे वर्णन केलंय..     मन वढाय वढाय     उभ्या पिकातलं ढोर     किती हाकला हाकला     फिरी येतं पिकावर     मन मोकाट मोकाट     याच्या ठाई ठाई वाटा     जशा वार्‍य़ानं चालल्या     पान्यावरल्या रे लाटा (तमिळ कवी ऊदक्कडु वेंकटसुब्रमण्य अय्यर यांनीसुद्धा मनाला लाटांची उपमा दिलीय.. अलईपायूदे, कण्णा, एन मनम अलईपायूदे . ( माझे मन उचंबळणार्‍या लाटांप्रमाणे आहे.)     मन एवढं एवढं     जसा खाकसंचा दाना     मन केवढं केवढं ?     आभायात बी मायेना     मन नेमके असते कुठे हो? मेंदुच्या कुठल्यातरी कोपर्‍यात दडून बसलेलं ?? आणि क्षणभरही तिथं न थांबणारं !! मेंदू म्हणजे सतत विचार करणारी यंत्रणा. तरीसुद्धा आपण म्हणत असतो, "मी विचार नाही केला... मनात आलं ते केलं. " आणि हा पठ्ठा मन तर मेंदुतच लपून बसलेला!!     मनाचे प्रकार किती ??... चेतन, अवचेतन, अर्धचेतन, वेडे मन( जाने क्या चाहे मन बावरा...), उधळलेले मन, मराठी मन..... ???     मन हे नेमके काय रसायन आहे??.... मेंदुच्या कुठल्यातरी cell मधे दडलेला data आणि त्यावर परिस्थितीजन्य hormones & enzymes य