आझाद काश्मीर आणि अरुंधती रॉय

         बहुसंख्य भारतीयांना वाटते की सगळे जम्मू-काश्मीर राज्य म्हणजेच काश्मीर.त्यामुळे कुणी जम्मू किंवा लडाखला जाऊन आला की म्हणतो, सध्या तर काश्मीरात शांतता आहे.चूक, शांतता लडाख आणि जम्मूत आहे, काश्मीरात नाही.जम्मू आणि काश्मीर राज्य मुळात तीन वेग-वेगळ्या प्रदेशांचे आहे- जम्मू (हिंदू-६६%), लडाख(बौद्ध -५०%,मुस्लिम-४६%) आणि काश्मीर(मुस्लिम-९७%). आझाद काश्मीरची चळवळ चालू आहे काश्मीर खोर्‍यात; जम्मू आणि लडाखची जनता भारतासोबत खूष आहे.ते स्वतःला भारतीय मानतात. मात्र आझाद काश्मीरची चर्चा करतांना असे चित्र उभे केले जाते(मिडियात तर हमखास!) की सगळ्या राज्याला स्वातंत्र्य हवंय. फ़ुटीरतावादी नेतेसुद्धा शिताफीने काश्मीर खोर्‍याचा प्रश्न सगळ्या राज्याला लावतात आणि सगळे राज्यच पेटत असल्याचे चित्र आपल्य़ा डोळ्यासमोर उभे राहते.
    
     काश्मीर खोरे नेमके कोणते:- 
          काश्मीर खोर्‍याचा एकूण आकार 4700 sq. km आहे, १३० किमी लांब आणि ३२ किमी. रुंद(संदर्भ- विकीपिडीया), म्हणजे जम्मू-काश्मीर राज्याचा २.१% फक्त. सगळ्या समस्यांचे मूळ इथे आहे. या छोट्याशा भूभागामुळे सार्‍या देशात वाद होतोय, गैरसमज पसरवले जातात,मानवाधिकारवाले भारत आणि सैन्याविरुद्ध गरळ ओकतात.

     काश्मीर खोरे आकाराने अतिशय लहान आहे आणि जर ते स्वतंत्र झाले तरी फार काळ टिकू शकणार नाही याची जाणीव गिलानीला(फ़ुटीरतावादी नेता) आहेच. म्हणून तो आझाद काश्मीरची मागणी करतांना जम्मू आणि लडाखच्या लोकांचे काय मत आहे ते जगासमोर येऊ देत नाही, तसेच एकदा काश्मीर स्वतंत्र झाले की त्याला पाकिस्तानसोबत जोडायचे हा त्याचा hidden agenda आहे. तो जाणीवपूर्वक काश्मीरींमधे आझादीचे बीज पेरतोय. आझादीला विरोध नसावा, पण ते स्वातंत्र्य खरंच टिकणार का?त्याने राहणीमान चांगले होणार का? शांतता राहील का? या सर्व बाबींचा विचार काश्मीरी जनतेने करावा.जर तसे होणार नसेल, स्वतंत्र झाल्यावर पाकचे बाहुले बनणार असेल तर या आझादीला अर्थ नाही.
    काश्मीर जर वेगळा करायचाच आहे तर फ़क्त "काश्मीर खोर्‍याला" करा. त्यांची मते जम्मू आणि लडाखच्या लोकांवर लादू नका.काश्मीर खोर्‍यात जर जनमत चाचणी घेतली आणि ती आझादीच्या पक्षात असली तर ते मत फक्त काश्मीर खोर्‍यातल्या लोकांचेच असेल; जम्मू आणि लडाखचे नाही. जनमत चाचणी घ्यायचीच असेल तर ती जम्मू, लडाख आणि काश्मीर अशी वेगळी घ्यायला हवी. फक्त काश्मीर खोरे तेवढे आझादीच्या बाजूने जाईल.
     हा सगळा घोटाळा दूर करण्याचा एक सोपा उपाय आहे - जम्मू आणि लडाखचे वेगळे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनवा.(लडाखच्या लोकांची केंद्रशासित प्रदेशाची मागणी आहेच आणि जम्मूच्या लोकांनापण वेगळे राज्य हवे.) तिथल्या लोकांचा भारतीयांना विरोध नाहीना? मग ते article 370 वगैरे त्या प्रदेशातून काढून टाका.त्या प्रदेशांचा जोमाने विकास होऊ द्या. ते स्वतःला भारतीय समजतात मग काश्मीरी (आझादी मागण्यार्‍या)मुस्लिमांच्या बंडाची शिक्षा त्यांना का मिळावी? काश्मीरचे वेगळे राज्य असू द्या. काश्मीरला आता ज्या सुविधा मिळताहेत त्या तशाच राहू द्या.त्यांना grater autonomy द्यायलापण हरकत नसावी. शेजारचे जम्मू-लडाख विकास करत आहेत, शांत आहेत हे बघून आझादीचे तुणतुणे वाजवणार्‍या काश्मीरींना जराशी अक्कल येईलच. आपण ह्या गिलानी-फिलानींच्या नादी लागून स्वतःच्या पोरांच्या भविष्याचे वाटोळे करत आहोत हे त्यांच्या लक्षात येईल. आझाद काश्मीर फ़ार काळ तग धरून राहू शकत नाही हे त्यांच्या लक्षात यायला हवे.सामान्य काश्मीरींना "आझाद काश्मीर" हवाय, पाकिस्तानची कशी वाट लागलीय त्यांना माहीत आहे, त्यामुळे आता त्यांना पाकिस्तानात जाण्यात रस नाही. मात्र गिलानी वगैरे केवळ पाकिस्तानी आहेत.ते आझादीचे फक्त गाजर दाखवत आहेत या लोकांना.
     जर समजा काश्मीर वेगळा झालाच तर तो एक अतिशय छोटा देश असेल(भूटानच्या दशमांश). सम्पूर्ण जम्मू आणि काश्मीर राज्याच्या फ़क्त २.१% .. असा हा चिमुकला देश, एका बाजूने पाकिस्तान गिळायला टपलेला,किती काळ सार्वभौम राहू शकतो ?? कश्मिरी लोकांना कळत कसे नाही की जर ते स्वतंत्र झालेच तरी फ़ार काळ "सार्वभौम" राहू शकणार नाहीत... आणि आझादीचे गाजर गिलानी एका विशिष्ट हेतूने दाखवतोय. POK तल्या लोकांचे जिणे पाहा. मानवाधिकाराचे जेवढे उल्लंघन POK मधे होतंय त्यामानाने भारतातल्या जम्मू-काश्मीर राज्यांत काहीच होत नाही. भारतात लाख पटीने चांगले जीवन आहे पाकपेक्षा.. 

            अरुंधती रॉय खरेच विचारवंत आहे? :-


          ठीक आहे मी मान्य करतो की कश्मिरी लोकांना स्वातंत्र्याच्या गाजराची बाग दाखवून भडकवत आहेत, पण हे आपले so called विचारवंत(बुद्धीजीवी म्हणतात हिंदीत- कदाचित स्वतःचीच बुद्धी खाऊन जगत असल्याने बुद्धीजीवी! बुद्धी खाऊन संपली यांची) यांना तर समजायला हवं. म्हणे कश्मिर तहामुळे भारतात आला!! अरे भारत मुळातच संस्थानांत पसरलेले देश होते. लोहपुरुषांनी सगळी संस्थाने विलीन केलीत.अशाने तर सगळ्या प्रदेशांनी भारतातून वेगळे व्हावे. भारत हा सीमारेषेने,धर्माने बांधलेला देश नाही तर तो एका सांस्कृतीक वारशाने बांधलेला देश आहे. सध्याचा भारत हाच फ़क्त भारत नाही तर पाकिस्तान,बांग्लादेश आणि नेपाळ पण भारतच आहे.(श्रीलंका सुद्धा कदाचित). नेपाळ वेगळे राष्ट्र बनले कारण तो भाग कधीच ब्रिटिशांच्या ताब्यात आला नाही.तिथे राजेशाही अबाधित राहिली. जर तो भाग ब्रिटिशांखाली आला असता तर ४७ नंतर नेपाळसुद्धा भारतात आले असते.(धर्म,संस्कृती, लिपी,भाषागट सगळे सारखेच). त्यामुळे कश्मिरात मुस्लिम राहतात म्हणून त्याने वेगळा व्हावे, तो त्यांचा हक्क आहे, तो कधी भारताचा भाग नव्हताच मुळी म्हणणे म्हणजे जिनाचा वारसा चालवणे आहे. अरुंधती रॉय जिनाचीच री ओढतेय. आणि तिला support करणारे इतर विचारवंत मूर्खच.. भारतीय मुस्लिम अरेबियातून आलेले नाहीत( ५% आले असतील फारतर), ते इथलेच, हीच त्यांची मातृभूमी, मग त्यांनी ’तिकडे’ loyalti दाखवणे मूर्खपणाचेच( सगळेच मुस्लिम तसे नाहीत. मी आझादीवाल्यांची गोष्ट करतोय). जपान -चीनमधे बौद्ध आहेत म्हणून काय ते भारताशी सलगी करतात काय? (चीन तर भारताचा शत्रू !!).जम्मू आणि लडाखप्रमाणे कश्मिर हाही भारताचाच घटक आहे, कारण सांस्कृतिक वारसा एक आहे. हे सगळे मुद्दे त्या अरुंधतीला आणि आझादीवाल्यांना सांगा रे कुणीतरी..... 

       बरेचसे आझाद काश्मीरवाले "काश्मीर" हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहील अशी ग्वाही देतात आणि काश्मिरी पंडितांना(KP) परत येण्याचे आवाहन करतात.कुणीही काश्मीरी पंडित परतला नाही ह्यावरुनच यांच्या आवाहनाचा बेगडीपणा दिसून येतो. जर यांना KP परत काश्मीरात आणायचे आहे तर त्यांना हाकलून कसे काय लावले बुवा ? धर्मनिरपेक्ष आझाद काश्मीरची ग्वाही देणे तर निव्वळ हास्यास्पद आहे.जगात धर्मनिरपेक्ष मुस्लिम राष्ट्र किती आहेत?? १-२-३??(मला माहीत नाही, कृपया सांगा) आणि धर्मनिरपेक्ष मुस्लिम राष्ट्र नेमके किती "धर्मनिरपेक्ष" आहेत?
    धर्म हा देश बनवणारा मुद्दा बनू नये तर संस्कृती बनावी.. वाईट वाटते की आपल्या सांस्कृतिक बंधांपेक्षा धर्माला जास्त महत्त्व देउन देशाचे तुकडे पाडत आहेत. कैलास यात्रेला जातांना आता विसा लागतो, कदाचित अमरनाथ यात्रेलापण लागेल...   
       भारताने एकदा माघार घेतली की यांची हाव वाढत जाईल यात शंकाच नाही.पण कधी-कधी वाटते की देशात शांतता आणण्यासाठी काश्मीर खोर्‍याला जाऊ द्यावे.मग त्यांना त्यांची चूक लक्षात येईलच.ते रडत बसतील.पण बाकी आपल्या देशाची ह्या वादापासून सुटका तर होईल.(अर्थात हे उद्गार हतबलतेचे आहेत, सरकार काहीच तगडे पाऊल उचलत नाही आहे ना !  ) ह्या देशद्रोह्यांविरुद्ध सरकार काहीच कारवाई कशी करत नाही?
        काश्मीर खोरे(& not jammu-ladakh) जर वेगळे झाले तर ते एक failed state आणि पाकिस्तानच्या हातचे बाहुले असेल.आता त्यांना जी "आझादी " भारतात मिळत आहे ती "आझाद काश्मीरातपण" मिळणार नाही.( देव,अल्ला,god ह्यांना(आझादीवाल्यांना आणि अरुंधति वगैरे विचारवंतांनापण) सदबुद्धी देवो...) 

१३ टिप्पण्या:

 1. संकेत,
  अरे काश्मीर देण्यात आपल्याला काही दुःख नाही..पण काश्मीर हा स्ट्रॅटेजिकली खूप महत्वाचा भूभाग आहे..आणि आपण तो सोडला की तो चीनच्या घशात जाणार हे नक्की! मग आपल्या सुरक्षेचा बोजवारा उडालाच..
  पुन्हा तू म्हणतोस तशागत, ही हाव इथेच थांबणार नाही...अजून अजून वाढतंच जाईल..
  बाकी..काही धर्मनिरपेक्ष मुस्लिम राष्ट्र आहेत..
  १ म्हणजे मलेशिया..पण ते फक्त नावाचंच उरलं आहे..
  पण तुर्कस्तान मात्र अजूनही धर्मनिरपेक्षता टिकवून आहे..अतातुर्क(माझीच लाल -http://thebabaprophet.blogspot.com/2010/09/blog-post_16.html) ह्या महान नेत्यामुळे!

  उत्तर द्याहटवा
 2. काश्मीर खोर्‍या बद्दलचं तुझं म्हणणं १००% खरं आहे. ही "लढाई" केवळ त्या खोर्‍यातील मुसलमान लोकं "लढत" आहेत. जम्मू आणि लडाख मधील लोकांचं ह्या लढ्याशी काडीमात्र संबंध नाही.

  आणि अरुंधती रॉय बद्दल जितकं कमी बोलावं तितकं बरं. एक बुकर पुरस्कार मिळाला की आपण कोण शहाणे झालो, असं तिला वाटतं. ती नेहमीच फुटीरवादाला साथ देत आली आहे. आणि तिचं इंग्रजी चांगलं असल्याने, तिला असल्या फुटीरवाद्यां बद्दल एक रोमॅनटिसम तयार करता येतं. सत्य त्यापेक्षा कैक पटीने वेगळं असतं, पण ते कधीच एवढ्या रोमॅनटिक भाषेत बाहेर येत नाही. ते केवळ बातमी म्हणून बाहेर येतं आणि अरुंधतीच्या रसाळ भाषेसमोर फिकं वाटतं एवढच.

  उत्तर द्याहटवा
 3. @ विभी :-
  बरोबर आहे रे .काश्मिराच्या स्थानामुळेच तो भाग महत्त्वाचा आहे.तो भाग ज्याच्या हाती असेल त्याला जम्मू, लडाखवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईलच पण सर्वात महत्वाचे म्हणजे भारतावर ह्ल्ला करणे बरेच सोपे होईल. पण काश्मिरपेक्षा जास्त महत्वाचे कदाचित कारगिल आणि सियाचिन प्रदेश आहेत.(जे लडाखमधे येतात आणि लडाखवर चीनचा डोळा आहेच.अक्साई चीन ताब्यात घेतलाच आहे त्यांनी)
  काश्मिर खोर्‍याचा प्रवास सुद्धा भारत-आझादी-पाक-चीन असा होण्याची शक्यता जास्त आहे.खरे सांगायचे तर एकूणच जम्मू-काश्मिर राज्य स्ट्रटेजिकली महत्त्वाचे आहे,फक्त काश्मिरच नव्हे.पण तो चिमुकला प्रदेश खूपच तापदायक ठरतोय रे.
  तुर्कस्तानबद्दल माहित होते मला. पण मी नमूद करायचे विसरलो बघ. माझ्या मते इतर मुस्लिम राष्ट्रांचे दुर्दैव की त्यांना केमाल पाशासारखा नेता मिळाला नाही. बाकी मलेशिया धर्मनिरपेक्ष आहे माहित नव्हतं. तिथे जी आंदोलनं होत आहेत त्यावरून वाटत होते की ते मुस्लिम राष्ट्र असावे.

  उत्तर द्याहटवा
 4. @ vinay :-
  ब्लॉगवर स्वागत !! प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!! अरुंधती रॉयच्या कित्येक भूमिकांना पाहून ही खरेच विचारवंत आहे काय अशी शंका येते..

  उत्तर द्याहटवा
 5. काश्मीर सोडण्यात पॉइंट नाही हे माझंही मत आहे. कारण हा भाग भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. पाकिस्तानने याआधीच पाकव्याप्त काश्मीरमधील काही भाग चीनला दिलेला आहे. (हलवायाच्या घरावर तुळशीपत्र!) जर आपण काश्मीरला स्वातंत्र्य दिलं तर काही महिन्यांतच पाकिस्तान काश्मीरला गिळंकृत करेल आणि नक्कीच चीनलाही त्यातला काही भाग दे‍ईल. भारत देश एखाद्या डोकं तुटलेल्या माणसाप्रमाणे दिसेल आणि या तुटलेल्या डोक्यातून भारताच्या हृदयावर घाव घालणं सोपं जाईल.

  उत्तर द्याहटवा
 6. किंचित विस्कळीत झालेला असला तरी मुद्दे बरेचसे कव्हर झालेत आणि चांगल्या पद्धतीने. त्याबद्दल अभिनंदन..

  अरुंधती रॉय ही भारताला लागलेली एक नीच कीड आहे हे माझं आधीपासून असलेलं मत अजून ठाम होण्यास मदत केल्याबद्दल अनेक आभार. या बयेची नर्मदा आंदोलनातली थेरं वाचली असशीलच. नसशील वाचली तर नक्की वाच.. जालावर आहे सगळं

  उत्तर द्याहटवा
 7. हे सगळा आपल्याला कळतय तर मग आपल्या so called राजकारणी उर्फ़ पुढारी लोकांना का नहीं कळत? बायकां सारखे बांगड्या घालून काय बसतात ...तिथला फुतिर्वाद कायमचा का नहीं संपवत ?

  उत्तर द्याहटवा
 8. @रवींद्र,

  कसा संपवणार फुटीरतावाद? त्याच्याच बळावर तर निवडून येतात ना! दहशतवाद्यांवर किंवा फुटीरवाद्यांवर कारवाई केली तर मिळणारी एकगठ्ठा मतं कमी होतील. मग सत्ता कशी मिळायची? सत्ता महत्त्वाची, देश गेला खड्ड्यात!

  उत्तर द्याहटवा
 9. क्या बात है संकेत!! भन्नाट लिहलय्स. आणि काश्मिर प्रश्न म्हणजे राजकारण्यांची रोजीरोटी आहे रे. हा एकच असा ज्वलंत प्रश्न आहे ज्यामुळे सर्व जनता आंधळी होऊन बाकी (काश्मिर प्रश्नाहुन अधिक) महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते. आणि हाच राजकरण्यांच्या मूळ हेतु आहे. बाकी तो सब मिलीभगत है! तु मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. हेच चाल्लय.

  उत्तर द्याहटवा
 10. आपटेभाऊ, धन्यवाद ! बरोबर आहे. डोके आपल्या हातीच हवे..

  उत्तर द्याहटवा
 11. हेरंबदा, धन्स ! पोस्ट विस्कळीत झालीये माझ्या लक्षात होते,buzzवर तशी कबुलीही दिली होती आधीच(तू buzz सोडलास आणि मी चालू केलं) .. मुद्दे व्यवस्थित मांडायचा कंटाळा आला होता रे .. बाकी अरुंधतीचे सगळे कारनामे मला ठाऊक आहेतच. सध्या जे चाललाय ते भयानक आहे.

  उत्तर द्याहटवा
 12. रविन्द्रकाका, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !! तुमच्या शंकेचे उत्तर आपटेंच्या संकेतने दिलेच आहे. माझे वेगळे नाही.
  इच्छाशक्ती नाही हो फुटीरता संपवण्याची.

  उत्तर द्याहटवा
 13. सौरभ, धन्स ! काश्मीर प्रश्न पण खूप महत्वाचा आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे आणि सुरक्षेचे धिंडवडे काढतोय काश्मीर प्रश्न ! बाकी काश्मीर प्रश्न सोयीच्या वेळीच उचलला जातो, इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून, हा मुद्दा मान्य.

  उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More