पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Rajinikanth's Law of Conservation of Energy

conventioal Law of Conservation of Energy :- the energy can neither be created nor destroyed but can be transformed from one form to another... Rajinikanth's Law of Conservation of Energy :- " Rajinikanth can create as well as destroy energy "!!

जॉनी ऍपलसीड

    लहान असतांना "The Wonderworld of Science" या पुस्तकाचे मराठी अनुवाद "विज्ञानाचे नवलपरीचे जग" वाचले होते,नक्की कोणता भाग ते आठवत नाही.हे पुस्तक मला जाम आवडायचे. कित्येकदा पारायणे केली असतील. खरं तर मी लिहिणे-वाचणे शिकल्यावर वाचलेल्या पहिल्या ५ पुस्तकांतले एक म्हणजे हे पुस्तक.लहान मुलांना लक्षात ठेवूनच लिहिलेले असल्याने विज्ञानाच्या छोट्या छोट्या गोष्टी, सिद्धांत सोप्या भाषेत समजावल्या होत्या.खूप उदाहरणे होती.या पुस्तकामुळे विज्ञानाची गोडी अगदी लहान वयातच निर्माण झाली आणि का? व कसे? यांचे समाधान लहान वयातच झाले. १९४०-५० च्या दशकात ते पुस्तक लिहिलेले होते. मराठी अनुवाद कुणी केला होता ते आता आठवत नाही पण हे पुस्तक मूळ इंग्रजी असेल अशी शंकाही न येण्याइतका सुरेख अनुवाद होता.      या पुस्तकात असलेल्या अनेक छोट्या कथांपैकी एक म्हणजे जॉनी ऍपलसीडची कथा.अठराव्या शतकाच्या सुमारास हा भटक्या एकहाती सफरचंदाचे बगीचे उभारत भटकायचा.डोक्यावर टीनाचे टोप आणि खांद्यावर एक काठीला टांगलेली सफरचंदाच्या बियांची पिशवी असे एक रेखाचित्रही होते. याने जेथे सफरचंदाच्या बागा ल

देवबाप्पा सचिन निवृत्तीनंतर (कल्पनाही करवत नाही !)

     काही वर्षांपूर्वी (जास्त दूर जायची गरज नाही, ३-४ च झाली असतील) ,नेमेची यायचा  क्रिकेट सिझन आणि नेमेची चर्चा व्हायची देवबाप्पाच्या निवृत्तीची. "शेर अब बुढ़ा हो गया हैं !"   थोबाडीत मारलीये सचिनने त्यांच्या. आता बघा ना ; २००६ ला  एक  बोका सचिनच्या जखमांवर मीठ चोळत होता. आता मात्र कसे त्याचे दात त्याच्या घशात गेलेत. जखमांनी त्रासलेल्या सचिनला मानसिक आधार देण्याऐवजी हा 'सिक' बोका " मेरी बिल्ली मुझीसे म्याऊ" म्हण सार्थ करत होता .अरे , तुझ्या अवेळी संपलेल्या कारकिर्दीचे खापर सचिनच्या हेल्मेटवर कशाला फोडतोस ? त्याने तेव्हाच hellशी आपली meeting निश्चित केली! मग २००७ ला सचिनवर ऑस्ट्रेलियातून एक चप्पल भिरकावली गेली, "सचिनने आता निवृत्त व्हावे . तो आपल्याच खेळाची सावली बनलाय आता. " त्याच्या भावाने पण त्याच्या चपलेवर चप्पल ठेवत देवबाप्पाच्या प्रामाणिकतेवरच  शंका घेतली .अरे , तू कोचिंग करायचे पैसे घेतले होतेस कि टीम फोडण्याचे ? न्यूझीलंड विरुद्ध ८०-८१ मध्ये आपल्या भावाला underarm टाकायला लावून खिलाडूवृत्तीचे मस्त दर्शन घडवले होतेस !! किती म्हणू

केला होता करार जरी

केला होता  करार जरी मी, नियतीने कधीच पाळला नाही रात्रच अशी भयाण काळी होती, सूर्य देखील उगवला नाही दिवस नवा उजाडता, फक्त स्वप्नांचीच लक्तरे ढगांनीच नेहमी बरसावे, नियम बनला नाही हातावरच्या रेषा माझ्या,वळत्या हो कुणी केल्या मार्ग असा नागमोडी,सावलीपण सोबतीला नाही अस्वस्थ मनाचे हुंदके, सरणावरच अखेर थांबले अस्थी गोळा करायला, कुणीच कसा थांबला नाही पापण्या मिटल्या म्हणे, फक्त स्वप्नांच्याच ओझ्याने पण सूर्य निजलेला दिवसा, मला कधीच दिसला नाही

एन्दिरन स्तोत्र - ३

   -----भाग २ पासून पुढे ----                                                                          भाग १ इथे वाचा                    शांतीचा संदेश जरी चिट्टी  वदला । परी तो न कुणा पटला ॥ जगी कायदाच हा भला । निश्चीत असे ॥१०६ ॥ वसीगरनचा पारा चढला । चिट्टीसी घेऊनी आला ॥ बोल बहु  लाविला ।  रागाच्या भरात ॥१०७॥ प्रेम करण्याची केली याचना ।  आणिक जगू देण्याची याचना । परि वसी ऐकेचना । चिट्टीची विनंती ॥१०८॥ जग हे अमानुष खरे । प्रेम करणार्‍याला म्हणती भले-बुरे ।शरण न येती जोवरे । प्रेममार्गी ॥१०८॥ प्रेमाची ही न्यारी किमया । विरोध करते जरी दुनिया ।। प्रसंगी अपुला जीव देऊनिया । प्रेम अमर करती ॥१०९॥ चिट्टीच्या प्रेमाग्रहाने त्रासुनी । वसी आणिक ती तरुणी ।। थकुनि गेले समजावुनी । चिट्टीस त्या ॥११०॥ वसीने निर्वाणीचे निर्णय घ्रेतले । चिट्टीचे अंगविच्छेद केले ॥ मन गहिवरून जाते अपुले । दृष्य बघुनी ॥१११॥ अंग अंग वेगळे होतांना। प्रेमाचीच करी याचना ॥ विट्टीची ही वेदना । पाहवत नाही ॥११२॥ फ़ेकुनि देतो कचर्‍यात । अपुल्या हस्ते निर्मीत ।चिट्टीची ती गत । हेलावणारी ॥११३॥ चिट्टीचा हा अंत नसे खरा । दुष्ट तो ड

ग़ज़ल - कुछ ज़ख़्म हमारे ....

कुछ ज़ख़्म हमारे यूँ गहरे हो गये मरहम लगाया फिर भी हरे हो गये    दोस्त साथ ना दें तो कोई ग़म नहीं दुश्मन अब जाँ से भी प्यारे हो गये नाता तोड़ चुकें  बरसात से भी हम घर में आसुँओं के फ़वारे हो गये रेत के महल थे, ढह गये तो क्या ग़म सूरज की तपन के नज़ारें हो गये हिसाब भी क्या रखना बिती यादों का कुछ पल मेरे कुछ तुम्हारे हो गये तन्हाईयों से दूर भागते रहे ’संकेत’ अब उसी के सहारे हो गये

एन्दिरन स्तोत्र - २

------ भाग १ पासून पुढे ------ दोन विनोदी नर । जे चिट्टीला वारंवार ॥ करण्यासाठी बेजार । प्रयत्नरत ॥५२॥ परि चिट्टी नाही बधला । दोघां धडा  शिकविला ॥ तयांसी बेजार केला । मारूनी पैजारा ॥५३॥ पहा या घटनेतून । मनी घ्या ठासून ॥ कुणा विनोद करून । खिजवू नका ॥५४॥ ते सहकारी राहिले । म्हणून वसीने क्षमा केले ॥ दयाभाव दाखविले । त्या दोघांप्रत ॥५५॥ पहा वसीच्या चित्ती । आहे कणवाळू वृत्ती ॥ हीच खरी शक्ती । मानवाची ॥५६॥ आता चिट्टीच्या लीला । अनुभवी ती बाला ॥ अभ्यास तिज करविला । वैद्यकशास्त्राचा ॥५७॥ देवीच्या नामे गोंधळ । करती जन सकळ ॥ थांबविला तात्काळ । चिट्टीने बघा ॥५८॥ अभ्यास हा प्रथम । मग आले देव-धर्म ॥ हेची खरे मर्म । विद्यार्थ्यांचे ॥५९॥ इतरांना त्रास देउन । ध्वनीप्रदूषण करून ।। देवी ती प्रसन्न । होइल का ॥६०॥ इथे एक संदेश दिला । ध्वनीप्रदूषण करणार्‍याला । धडा शिकविला । देवीरूप दाखवून ॥६१॥ परीक्षा उत्तीर्ण करायला । मदतीचा हात दिला ॥ म्हणूनच ती बाला । उत्तीर्ण झाली ॥६२॥  चिट्टी खोटे नाही बोलला । मनुष्यस्वभाव हा भला ॥ कधीच न कळला । भावनाहीन चिट्टीस ॥६३ ॥ मग रेल्वेगाडीच्या करामती । त्या वर्णू मी किती

एन्दिरन स्तोत्र - १

श्री गणेशाय नम: हे पार्वतीनन्दन । अग्रपूजा तुझा मान ।। करितो तुज वन्दन । स्वामी संकेतानन्द ।।१॥ व्यासा बुद्धी तुच दिली । तयाची लेखणी चालविली ।। म्हणूनच त्याने निर्मीली । महाभारत काव्यरचना ।।२।। आता तुज वन्दून । स्तोत्र करितो लेखण ॥ जयाचे नाव एन्दिरन । चित्रपट असे ॥३॥ श्री रजनीकांताय नमः हे देवा रजनीकांता । हे साक्षात अरिहंता ॥ करितो दूर चिंता । अपुल्या भक्तांची ॥४॥ वर्णू मी किती । अशी तव महती॥ तुझीच असे भीती । दुष्टांना ॥५॥ तू हात ठेविला ।तत्त्क्षणी उद्धार झाला ।। महिमा प्रत्ययाला । आला असे ॥६॥ तूच महामेरू । तूच कल्पतरू ॥ दुबळ्यांचा आधारू । तूची असे ॥७॥ तुझिया सिनेमाद्वारे । रजनीभक्तीचे भिनले वारे ॥ तूच तूच  कैवारे ।  आता मज ॥८॥ आता हे रजनीदेवा। तुझा करितो धावा॥ सामर्थ्य मज द्यावा । स्तवनासाठी ॥९॥ तुझा मी भक्त साचा । उदो उदो रजनीनामाचा ॥ mind it मंत्राचा । गजर असो ॥१०॥ तुझी ती संवादफेक । आणि नजर भेदक ॥ धूम्रदंडिका सूचक । तुझ्या ओठी ॥११॥ हे  देवा रजनी । असतो निशदिनी ॥  तुझ्याच चरणी । स्वमी संकेतानन्द ॥१२॥ न दवडिता वेळ । न लावता पाल्हाळ ॥ वर्णितो सकळ । एन्दिरन अवतार ॥१३॥ आले रजनीदेव ।

श्वेतसुमनांसाठी......

   हे गीत आहे, युद्धात होरपळल्या जाणार्‍य़ा मुलांसाठी. युद्ध होतात, कुणाच्या राजकीय फायद्यासाठी, कुणाच्या खोट्या अस्मितेच्या नावावर. मात्र एक पिढी गुदमरली जाते. युद्धग्रस्त भागात बघा, मुलांना त्यांचे बालपण सुद्धा उपभोगता येत नाही. काश्मिरातल्या मुलांचे बालपण ते काय असणार, AK-47 च्या सावलीत जाणारं! गोळीबाराचा आवाज हेच त्यांचे अंगाईगीत."आज कर्फ्यू है " हे त्यांचे बोबडे बोल. त्यांचे बालपण हरवत असते. आणि आपण "युद्धस्य कथा रम्य" म्हणत असतो. सगळ्या युद्धग्रस्त भागात थोड्याफार फरकाने हीच स्थिती असते.         महान तमिळ गीतकार/कवी वैरामुथु यांनी हे गीत "कण्णत्तील मुत्तमिटाल "  या मणीरत्नम यांच्या चित्रपटासाठी लिहीले. तमिळ वाघांच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर एका मुलीच्या भावविश्वाचे चित्रण म्हणजे हा सिनेमा. संगीत रहमान सरांचे आहे.हे गाणे त्यांनीच गायले आहे. या चित्रपटाच्या गाण्यांकरता दोघांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत. मला हे गाणे खूप आवडते म्हणून मी मराठी अनुवाद करायला घेतला. अगदीच शब्दशः नाही.वैरामुथु सरांना अभिप्रेत असलेल्या भावना पकडण्याचा प्रयत्न केलाय. तमिऴ अ