’सोपा’ उपाय ??

’फुकट ते पौष्टिक’ च्या ’पिपा’सेला आळा घालणारा ’सोपा’ उपाय.

कथा - कारखान्यातले भूत

भुतांच्या अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणार्‍या मुलाची कथा

महानगर
मी जिथे राहतो
ते एक महानगर आहे..
इथल्या व्याख्या वेगळ्या आहेत..
इथली परिमाणं वेगळी आहेत..


इथे उंची ब्रॅंड्स मध्ये मोजली जाते 
आणि श्रीमंती, स्क्वेअर फूट मध्ये..
खोली लक्षात येते सरकारी कचेऱ्यांत..
आणि झेप, मिळणार्‍या पॅकेजमध्ये..


इथे व्यक्तीस्वातंत्र्य लक्तरांमध्ये मिरवतं..
कधी फसफसतं  आणि मग फुटपाथवर हसतं.


इथल्या रात्री आगळ्या आहेत..
काही अंग थिरकत असतात
आणि काही कुडकुडत असतात..
काही पाय लटपटत असतात..
आणि काही लगबगत असतात..
काही हात शिवशिवत असतात..
आणि काही विनवणत असतात.इथले दिवससुद्धा गमतीदार आहेत.
सकाळ झाली रे झाली..
की  रस्त्यांवर घड्याळे धावतात...
सिग्नलवर थांबलेली घड्याळे..
लाल दिव्याखालच्या आकड्यागणिक
कॅल्कुलेटरमध्ये बदलतात..
एखादा कॅल्कुलेटर घाईघाईत घड्याळ बनतो..
मग एखादी घड्याळ अचानक बंद पडते, कायमची..
काळ-काम-वेगाचे गणित सोडवतांना..
माणूस कधी वजा केला जातो, कळतंच नाही..इथे गुलामगिरी आहे..
गगनचुंबी इमारती, मॉल्स आणि झगमगते रस्ते म्हणजे
सावज हेरायला बनवलेला आधुनिक सापळा आहे..
घंटांची किणकिण..
बागेतला चिवचिवाट..
हास्याचा खळखळाट..
म्हणजे मुक्तीसाठी केलेला आक्रोश आहे..


 
हे महानगर म्हणजे एक मोठे ऑक्टोपस आहे..
जे काही त्याच्या कवेत येईल ते तो गिळतो..
आणि छोट्या ऑक्टोपसांना जन्म देतो..
आणि चक्र चालत राहतं..

( पूर्वप्रकाशित : शब्दगारवा २०११ )
बेंगळुरु,  
१८ डिसेंबर, २०११

द ग्रीन फ़्लाय
            तो म्हातारा शेतकरी गावातला सर्वात श्रीमंत माणूस, अगदी आजारी, मृत्युच्या दारी उभा होता.देवाच्या दरबारी त्याचा न्यायनिवाडा केला जात होता, त्याच्याकडे बोट दाखवून देवाने सार्‍या मानवजातीला उदाहरण दिले : " जॉन गॅलकडे बघा. तुम्ही मर्त्य जीव समजता काय स्वतःला ? तुम्ही खिजगणतीलासुद्धा नाहीत. आता, जॉन गॅल खरंच कोणीतरी आहे. जिल्ह्याचा न्यायाधीशसुद्धा त्याची भेट घेतो वेळप्रसंगी. गावच्या पाटलीणबाई येतात आणि त्याची भेट घेतात. तो सर्वाधिक श्रीमंत माणूस आहे.तरी मी त्याच्यावर आघात करू शकतो.त्यासाठी मला एखादा भुकेला लांडगा पाठवायची गरज नाही की, एखादा मोठा देवदार त्याच्यावर पाडून त्याला चिरडून टाकायची पण गरज नाही. एक छोटी माशी पुरेशी आहे. "


अगदी हेच घडले होते. एक माशी त्याच्या हाताला चावली. हाताला सूज येऊ लागली आणि त्याचे हात अधिकाधिक लाल-काळे होऊ लागले.


पुजार्‍याने आणि पाटलीणबाईंनी त्याला डॉक्टरला बोलवायला सांगितले.


एखादा साधा शल्यचिकित्सक बोलावणे त्यालासुद्धा चालणारे होते, पण ती मंडळी बुडापेस्टला तार करून विशेष‍ज्ञाला बोलावण्याचा आग्रह करत होती. डॉ. बिर्लींची निवड झाली. एका भेटीचे ३०० फ़्लोरिन्स पडले असते, पण ते वसूल होण्याची खात्री होती.


" मूर्खपणा आहे नुसता ! " म्हातारा म्हणाला, " ती छोटीशी माशी मला ३०० फ़्लोरिन्स किंमतीचे नुकसान करू शकत नाही. "


पण पाटलीणबाई आग्रही होत्या. त्यांनी डॉक्टरचे बिल स्वतःच भरण्याचा प्रस्ताव मांडला. मी मात्रा अचूक लागली. जॉन गॅल स्वाभिमानी शेतकरी होता. तार पाठवण्यात आली आणि एक तरुण, सडपातळ आणि चष्मिष्ट- अगदीच प्रभावहीन व्यक्तिरेखेचा- त्याला घेण्यास स्टेशनवर पाठवलेल्या घोडागाडीतून उतरला.
गॅलबाईने- म्हातार्‍याच्या तरुण बायकोने त्याने फ़ाटकावर स्वागत केले.


" आपणच बुडापेस्टचे ते प्रसिद्ध डॉक्टर ना ? " तिने विचारले, " तुम्ही लवकर चला आणि माझ्या नवर्‍याला बघा जरा. त्या माशी चावलेल्या हातावरून ते एवढा गोंधळ घालत आहेत ना की , जणू त्यांना हत्तीच चावलाय. "
हे ढळढळीत खोटे होते. जॉन गॅल एका शब्दानेही बोलला नव्हता, त्याला विचारेपर्यंत त्याने त्याबद्द्दल सांगितलेसुद्धा नव्हते आणि त्यानंतरसुद्धा तो अतिशय अलिप्त होता. तो आपल्या बिछान्यावर शांत, निर्विकार पडून होता. डोके मेंढीच्या कातडीच्या उशीवर टेकवलेले आणि तोंडात पाईप धरलेला.


" काय समस्या आहे म्हातारबुवा ? " डॉक्टरांनी विचारले, " तुम्हाला एक माशी चावली असे कळले. "


"हो, एवढेच " दातखीळ न उघडला म्हातारा उत्तरला.


" माशी कशा प्रकारची होती ? "


" एक हिरवी माशी ", तो शांतपणे म्हणाला.


" तुम्ही त्यांना प्रश्न विचारा डॉक्टर" , बाईसाहेब मध्येच बोलल्या. " ओवनमध्ये नऊ ब्रेड आहेत. "


" ठीक आहे आई, " अनवधानाने डॉ. म्हणाला.


अचानक काहीतरी डसल्यासारखे ती त्याच्याकडे वळली, आणि कंबरेवर हात ठेवून म्हणाली,
" का ? तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात ! " थोडीशी नाराजीत आणि थोड्या मिश्किल स्वरात म्हणाली, " कदाचित तुमच्या डोळ्यांवर चढवलेल्या त्या दोन खिडक्यांतून तुम्हाला नीट दिसत नसावे. "


ती गर्रकन वळली आणि अल्लड वार्‍याप्रमाणे स्कर्ट लहरत तारुण्याची जाणीव करून देत ती बाहेर पडली.
डॉक्टर तिच्याकडे रोखून पाहत राहिला. ती अप्रतिम देखणी होती, डॉक्टरपेक्षा बरीच लहान आणि अर्थातच नवर्‍याहून खूपच लहान होती. तो दिलगिरी दाखवणार होता पण त्याने काही म्हणायच्या आधीच ती निघाली होती.


" चला, जरा हात तपासूया. दुखतंय ? "


" बरंच " उत्तर आले.


डॉक्टरने सुजलेले हात तपासले आणि चेहर्‍यावर गंभीर भाव तराळले.


" वाईट सुजलेय. नक्कीच विषारी माशी असावी."


" असेल कदाचित, " जॉन निर्विकार चेहर्‍याने म्हणाला, " मी सांगू शकतो की, ती साधारण माशी नव्हती. "
" ती मृतदेहावरून आलेली माशी होती. "


ह्या माहितीवर जॉनने मनातल्या मनात एक शिवी हासडली.


" मी वेळेवर आलो हे नशीब समजा. आपण अजूनही काहीतरी करु शकतो. उद्या बराच उशीर झाला असता. अहो, तुम्ही या जगात नसता. "


" विचित्र आहे," चिलमीत अंगठ्याने तंबाखू भरत म्हातारा म्हणाला.


" विषबाधा वेगात पसरते, अजून वेळ गमवायला नको. मनाची तयारी करायला हवी. म्हातारेबुवा, आता तुमचा हात कापावा लागेल."


" माझा हात ? " तो आश्चर्याने उद्गारला. त्या स्वरात थोडी थट्टा होती आणि बरीच निराशा होती.


" हो, हे तर करायलाच हवे. "


जॉन गॅल काहीच बोलला नाही, त्याने फक्त डोके हलवले आणि चिलीम ओढू लागला.


" हे बघा, “ डॉक्टर मन वळवण्याच्या प्रयत्नात म्हणाला, " तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. मी तुम्हाला बेशुद्ध करेन आणि जेव्हा तुम्हाला जाग येईल तेव्हा तुम्ही बचावलेले असाल. नाहीतर, उद्या याच वेळेला तुम्ही ठार मेलेले असाल. देवसुद्धा वाचवू शकणार नाही. "


"ओ SS मला एकटे सोडा, " बोलून खूप दमल्यासारखे तो बोलला, भिंतीकडे वळला आणि आपले डोळे बंद केले.
डॉक्टरने अशा जिद्दीपणाची अपेक्षा केली नव्हती. तो खोलीतून बाहेर पडला आणि म्हातार्‍याच्या बायकोशी बोलायला गेला.


" ते कसे आहेत ? " ती कोणतेही भाव न आणता म्हणाली आणि डॉक्टरांना त्यांच्याविषयीचा तिरस्कार दाखवायला म्हणून आपले काम करतच राहिली.


" वाईट परिस्थिती आहे. मला त्यांनी हात कापायची परवानगी द्यावी म्हणून त्यांचे मन वळवायला तुम्ही मदत करावी, हेच विचारायला आलोय."


" अरे बापरे ! " पांढरीफ़टक होत ती उद्गारली, " हे करायलाच हवे का ? "


" हो, नाहीतर येत्या २४ तासांत ते मरतील. "


तिचा चेहरा लालबुंद झाला आणि तिने डॉक्टरांचा हात धरून त्यांना ओढतच ती रुग्णाच्या खोलीत घेऊन आली आणि कंबरेवर हात ठेवत म्हणाली, " अपंगाची बायको म्हणून समाधानाने जगणारी बाई वाटते का मी तुम्हाला ? मी शरमेने मरेन. तिकडे ! फ़क्त बघा त्यांच्याकडे ! " ती आपल्या नवर्‍याकडे वळली आणि जवळजवळ ओरडलीच, " त्यांना तुमचा हात कापायची परवानगी अजिबात देऊ नका , जॉन. त्यांचे अजिबात ऐकू नका. "
म्हातार्‍या शेतकर्‍याने तिच्याकडे मैत्रीपूर्ण नजरेने पाहिले.


" काळजी करू नकोस , क्रिस्का, " त्याने तिची खात्री पटवली, " इथे कसलीही काटछाट होणार नाही. मला तुकड्यांत मरायचे नाहीये. "


डॉक्टर म्हातार्‍याशी मृत्यूच्या भयानकतेबद्दल आणि जीवनाच्या सौंदर्याबद्दल बोलला, पण ते सारे वाया गेले. वाड्यातून पाटलीणबाईंना बोलावले, आणि पुजार्‍याला आणि गावातल्या सार्‍याच संभाषणचतुर वाक्यपटुंना बोलावले पण काहीच फायदा झाला नाही. जॉन गॅल ठाम राहिला. हात कापायला त्याने नकारच दिला.
म्हातारा ज्याप्रकारे मृत्य़ूला शरण जात होता, कटुतेविना, प्रतिकाराविना आणि व्यर्थ अश्रू न ढाळता, ते त्याच्या शांत चेहर्‍यात आणि बोलण्यात दिसत होते. त्याला मृत्यूचे भय नव्हते. जर आता त्याची वेळ आली असेल, तर तो त्याच्या वडलांप्रमाणे, आजोबांप्रमाणे जायला तयार होता.


म्हातार्‍याला स्वतःला वाचवण्याचे कितीही आवाहन केले तरी काही फायदा झाला नसता हे आता निश्चितच होते. पण वैतागलेल्या डॉक्टरला आपल्याबद्दल खरंच काहीतरी वाटतंय हे त्या म्हातार्‍या शेतकर्‍याला जाणवले. त्याला डॉक्टरची तळमळ बघून दया आली. हा एवढा दुःखी आहे याचे त्याला वाईट वाटले आणि थोड्या उपहासाने , थॊड्या तिरस्काराने जॉन डॉक्टरचे सांत्वन करू लागला.


अचानक डॉक्टरला आठवले की खेडूतांच्या बाबतीत पैशाचा मुद्दा चमत्कार करू शकेल, म्हणून तो म्हणाला " मी तुमचा हात कापो अथवा न कापो, तुम्हाला माहीतच आहे की, तुम्हाला मला ३०० फ़्लोरिन्स द्यायचे आहेत. जर शल्यक्रिया झाली नाही तर ते पैसे वाया घालवणे होईल. फक्त पाचच मिनटे लागतील.


" ठीक आहे, जर तुम्हाला तुमची फ़ीस कमवायचीच आहे तर एखादे मलम लिहून देऊ शकता. " जोड्यांच्या दुकानात भाव केल्यासारखा शांत चेहर्‍याने म्हातारा म्हणाला.


ह्याचासुद्धा मुळीच फायदा झाला नाही. वैतागलेला आणि निराश, डॉक्टर तिथून बाहेर पडला आणि पुन्हा विचार करायला आणि गावातल्या काही समजूतदार माणसांसोबत ह्या समस्येबद्दल चर्चा करायला निघाला. त्याला थोडेफार चांगले सल्ले मिळाले, पण न्यायाधीशाला रुग्णाच्या बाजूला उभे करणे तितकेच व्यर्थ होते. ती तरुण स्त्री डॉक्टरची कोणतीही ’दुष्ट’ योजना उढळून लावायला तिथे होतीच आणि आपल्या नवर्‍याचा दावा मजबूत करायला मध्येच एक-दोन शब्द बोलायची संधी ती अजिबात सोडत नव्हती. डॉक्तर पिन्हापुन्हा तिच्याकडे डोळे वटारायचा आणि एकदा तो तिच्यावर ओरडला देखील.


" जेव्हा चार माणसं बोलत असतील तेव्हा तुम्ही जिभेवर ताबा ठेवा. "


" तुमच्या लेखी बायका म्हणजे नवर्‍याची उष्टी खाणारीच ना , " तिने लगेच प्रत्युत्तर दिले.


जॉन गॅलने भांडण टाळायला लगेच हस्तक्षेप केला.
" जास्त गोंधळ घालू नकोस, क्रिस्का. पाहुण्यांकरिता वाईन आण बघू. "


" कोणत्या पिंपातली ? " तिने विचारले.


" दोन-हेक्टर पिंपातली. पण माझ्या मरणाच्या जेवणाला मात्र तीन-हेक्टर पिंपातले वापर. ती आंबू लागलीये. "
तो मृत्यूच्या कल्पनेला पार शरण गेला होता. पाहुणे वाईन प्याले आणि त्याला त्याच्या मर्जीवर सोडून निघाले.


अंगणात डॉक्टर बिर्ली घरगड्याला भेटला - तरुण , बलदंड, हरकाम्या.


" घोडागाडी तयार ठेव. मी अर्ध्या तसात निघेन, "  तो गड्याला म्हणाला, " आणि गॅलबाईंना सांग की, मी रात्री जेवणाला थांबणार नाही. "


काय करावे याचा विचार करतच तो फाटकाबाहेर थांबला. फाटकाच्या फटीतून त्याने गड्याला गॅलबाईंकडे जाताना पाहिले आणि तिने गड्याला दिलेला नखरेल कटाक्ष लक्षात येणे तो टाळू शकला नाही आणि गड्याच्या देहबोलीतून जाणवणारा बदलदेखील ! ते दोघे आगीशी खेळत होते हे निश्चितच होते आणि दोघांमध्ये काहीतरी नक्कीच शिजत होतं. आता त्याला ह्या विषयाची थोडी अधिक माहिती तेवढी मिळवायची होती. गावातल्या सार्‍या प्रेम-प्रकरणांची माहिती ठेवणारी प्रेमात पाडणारे प्रेम-काढे बनवणारी एखादी म्हातारी चेटकीण गावात नक्कीच असावी. मुन्सफ़ला नक्कीच माहीत असावे. त्याला माहीत होते.


" म्हातारी चेटकीण रिबेक, " तो म्हणाला, " गॅल्सच्या दोन घरांपलिकडेच ती राहते."
डॉक्टरने त्याच्या हातावर दोन फ़्लोरिन्स ठेवले.


" मी एका स्त्रीच्या प्रेमात पडलोय, आणि मला असे काहीतरी हवेय की तीसुद्धा माझ्यावर प्रेम करेल," तो म्हणाला.


" अरे, हे शक्य नाही बाळा. तू शेतातल्या बुजगावण्यासारखा दिसतोस, आणि त्या तुझ्यासारख्यांच्या प्रेमात पडत नाहीत. "


" मान्य आहे, माई; पण मी तिला हवी तेवढी वस्त्राभुषणे देऊ शकतो आणि उधळायला वाट्टेल तितका पैसा.... "
" आणि कोण आहे ती ? "


" सौ. जॉन गॅल. "


" तू सर्व गुलाब खुडू शकतोस, पण जे आधीच खुडले गेलेत ते नाही. "


डॉक्टरला हेच तर माहीत करायचे होते.


" आणि तो दुसरा माणूस कोण आहे ? " त्याने विचरले.


" पॉल नेगी, घरगडी. ते नक्कीच त्याच्या प्रेमात पडली असावी. कारण ती बरेचदा प्रेमाच्या काढयाकरता इथे येते.  त्याच्या वाईनमध्ये मिसळायला नुकतेच काही चेटूक दिलेय मी. "


" आणि जॉन गॅलला संशय आला नाही ? "


" तो हुशार असला , तरी तिची चलाखी त्याला नेहमीच मात देते. "


डॉक्टर गॅलच्या वाड्यात परतला आणि पाहिले की दोघेही अजून गप्पा करतच आहेत. गड्याने डॉक्टरांना स्टेशनवर न्यायला घोडे तयार केले होते. तिने डॉक्टरला बोलावले. डॉक्टर आल्यावर तिने ३०० फ़्लोरिन्स काढून त्याच्या हातात ठेवले.


" तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल, डॉक्टरसाहेब, " त्याला पैसे देत ती म्हणाली.


"  ठीक आहे," डॉक्टर म्हणाला, " पण हे तुमच्या विवेकावर अवलंबून आहे, कारण मला ह्यांची गरज नाही. "
" तुम्ही काळजी करू नका. माझे मन हे ओझे वाहील. "


" उत्तमच ! गाडीत माझे सामान ठेवा, तोपर्य़ंत मी तुमच्या नवर्‍याचा निरोप घेतो. "


जॉन गॅल ज्या स्थितीत त्याला सोडले होते अगदी तसाच पहुडला होता. चिलीम विझलेली होती, त्याचे डोळे बंद होते जसे काही तो डुलकी घेतोय. दार उघडल्यावर त्याने वर पाहिले आणि एक डोळा किलकिला केला.


" मी फक्त तुमचा निरोप घ्यायला आलोय, मि. गॅल." डॉक्टर म्हणाला.


" तुम्ही जाताय ? " त्याने शांतपणे विचारले.


" इथे थांबायला काही कारण उरलेले नाही. "


" तिने तुम्हाला पैसे दिले ? "


" हो. तुम्हाला चांगली बायको मिळाली आहे, मि. गॅल. अहो, ती किती सुंदर आहे ! "


आपला चांगला हात डॉक्टरंना देत त्याने दुसरा डोळाही उघडला आणि बोलला, "हो ना ? "


" तिचे सुंदर ओठ चेरीसारखे आहेत. "


" हो तर, आहेतच. " त्याच्या चेहर्‍यावर एक आनंदी स्मित पसरले होते.


" लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण ह्या लफंग्या पॉलचा तिच्यासोबत मस्त वेळ जाईल. "


म्हातारा कावराबावरा झाला आणि त्याने वर पाहिले.


" तुम्ही हे कशावरून बोलताय डॉक्टर ? "


डॊक्टरने अचानक आपले ओठ बंद केले जणू काही तो अनवधानाने न बोलण्यासारखे काही बोलून गेला होता.
" नॉनसेन्स. ह्याच्याशी माझे काही घेणेदेणे नाही. तुमच्यापाशी डोळे असतात, डोके असते आणि तुम्ही गोष्टी बघता आणि त्या गोष्टींची सांगड घालता. ज्या क्षणी तिने तुमचा हात कापण्यास नकार दिला तेव्हाच मला शंका आली होती. तुम्हाला शंका आली नाही का ? पण आता मी समजलोय. अर्थातच...अर्थातच... "


ह्या क्षणी आपल्या दोन हातांपैकी एक सुजला आहे हे विसरून जॉन गॅलने आपल्या दोन्ही मुठी आवळल्या तो वेदनेने कळवळला.


" आSSS ! माझा हात, माझा हात ! आता एका शब्दानेही बोलू नका डॉक्टर. "


" नाही बोलणार. " डॉक्टर म्हणाला.


आपल्या उजव्या हाताने डॉक्टरचा हात पकडल्यावर त्याच्या छातीतून खोलवर कळा उठल्या.


" कोणता पॉल डॉक्टर ? कोणता पॉल म्हणायचा आहे तुम्हाला ?  कोण आहे तो ? "


" तुम्हाला खरंच म्हणायचं आहे की तुम्हाला माहीत नाहे ? पॉल नेगी, तुमचा घरगडी. " म्हातार्‍या शेतकर्‍याचा चेहरा पांढरा पडला. त्याचे ओठ थरथरत होते आणि हृदयात रक्त उसळ्या घेऊ लागले होते. आता त्याचे हात त्याला त्रास देत नव्हते. त्याने अचानक कपाळावर हात मारला आणि वर पाहिले, " काय मूर्ख होतो मी. मला आधीच शंका यायला हवी होती. ती बाई तर विषारी नागिण निघाली ! "


" त्या बाईला दोष देऊन काही उपयोग नाही, मि. गॅल, तिच्यापाशी तिचे तारुण्य आहे, ती स्वस्थ आहे आणि तिच्यापुढे तिचे संपूर्ण आयुष्य पडले आहे. ती अजूनही कदाचित निर्दोष असेल, पण तुम्ही गेल्यावर तिला लग्न करावेच लागेल..... आणि तुम्ही तर जाणारच.... "


म्हातारा शेतकरी प्रयत्नपूर्वक हलला आणि डॉक्टरकडे वळला ज्याने आपले बोलणे सुरूच ठेवले होते.


" तुम्ही गेल्यावर जर तिने एखाद्या तरूणाशी लग्न केले तरी तुमच्यापाशी गमवण्यासारखे काहीच असणार नाही. मातीत मिसळल्यावर तुम्हाला ह्यातले काही माहीतदेखील होणार नाही.  तसेही, तुम्हाला तर आनंद व्हायला हवा की तिला नवरा म्हणून एक देखणा माणूस भेटेल, सुंदर तरूण पॉल ! "


म्हातारा दातओठ खाऊ लागला. दोन सुळे एकमेकांशी टकरावल्यासरखा आवाज येत होता.


" तुम्ही लोभीपणा दाखवू नका, गॅलसाहेब. तिचा आकर्षक देह उपभोगाविना वाया जाऊ देणे हे वाईटच होईल. पॉल मूर्ख नाही. तो तिच्यासारख्या स्त्रिला थोडी चवही न घेता जाऊ देणार नाहीच. तसेही तिच्यापाशी तुमचा सर्व पैसा, सगळी शेती असेल. आणि तिलासुद्धा जगायला आवडेल.  ह्या सगळ्यामध्ये जर कोणी मूर्ख असेल तर तुम्हीच, गॅलसाहेब.  "


तो शेतकरी पुन्हा कळवळला आणि घामाने त्याचे कपाळ ओथबले. त्याच्या हृदयातला कटूपणा, तिरस्कार आता भरून वाहणारच होता.


" हे बघा, मि. गॅल, काहीच न मिळवण्यापेक्षा तिला एका हाताने कवटाळणे जास्त चांगले राहील. "


आता हे त्या म्हातार्‍यासाठी अतीच झाले होते.


त्याने उडी मारली आणि अपला सुजलेला हात डॉक्टरकडे करत म्हणाला,


"   तुमचा चाकू घ्या हातात डॉक्टर, आणि कापून फेका ह्याला ! "


( समाप्त )
( मूळ हंगेरिअन लघुकथेचा  मराठी अनुवाद
 लेखक : Kalman Mikszath )


पूर्वप्रकाशित : - मी मराठी दिवाळी अंक २०११


कथा - कारखान्यातले भूत

कोणे एके काळी भंडारा जिल्ह्यात विड्या वळण्याचा उद्योग भरभराटीस होता.स्वस्त आणि मुबलक मनुष्यबळ,जंगलात मोठ्या प्रमाणात उगवणारी तेंदूची झाडे आणि विडी कारखान्याला असणारे पोषक वातावरण, ह्यामुळे बर्‍याच उद्योजकांनी बिडी कारखाने चालवले होते.  सिगारेटींचे एवढे प्रस्थ नव्हते; गावोगावी, चौकाचौकांत विड्याच फ़ुंकल्या जात. एकूणच विडी कारखान्यांना भरभराट होती, नफ्याचा उद्योग होता.


           काळ बदलला. विड्या ओढणे गावंढळपणा झाला. सिगारेटी ओढणे 'फॅशन' म्हणवू लागली. आता गावागावांत, चौकाचौकांत तरुण पोरं सिगारेटी ओढत 'स्टाईल' मारु लागली . विड्यांची विक्री दिवसेंदिवस मंदावत होती. नक्षलवाद्यांच्या वाढत्या त्रासामुळे जंगलातून तेंदूपत्ता आणणे जिकीरीचे होऊ लागले. तेंदूपत्ता महाग झाला. विडी कारखान्यांना ओहोटी लागली.  गावोगावचे छोटे कारखाने बंद पडले. मोठे कारखाने कसेबसे तग धरून होते, पण बरेचसे नतमस्तक झाले.


    असाच एक विडी कारखाना एका छोट्याशा गावात टिकण्याची धडपड करत होता. पण घर फिरले की घराचे वासेही फिरतात. जेमतेम टिकून असलेल्या या कारखान्याला एके दिवशी आगीने कवेत घेतले.( गावात अजूनही लोक कुजबुजतात की, आग मालकानेच लावली आणि विम्याची रक्कम खिशात घातली. ) कारखाना सार्‍या मुद्देमालासकट भस्मसात झाला. मातीच्या भिंती आणि वरचे कौलारू छप्पर तेवढे टिकून राहिले. आग विझवण्याच्या प्रयत्नात दोन कामगार मात्र बळी पडले.


        कारखान्याच्या कंपाउंडबाहेर कामगारांसाठी मालकाने २०-२१ घरांची एक वसाहत बनवली होती. कारखाना बंद झाल्यावर ती कुटुंबं नव्या रोजगाराच्या शोधात इतरत्र पांगली. मालकाने चाळ भाड्याने चढवली. गावात बदली होऊन येणार्‍या नोकरदार वर्गासाठी ती चाळ सोयीची होती.


        कारखान्याच्या भव्य लोखंडी फाटकाला मोठे कुलुप चढवून आणि गावातला आपला बंगला विकून मालक शहरात रहायला गेला.


        वर्षामागून वर्षे गेली. जळक्या भिंती आणि फुटक्या कौलांचे छप्पर घेऊन कारखाना एकाकी उभा होता. आवारातल्या सुंदर बागेचे रुपांतर रानात झाले. लोखंडी फाटकाला गंज चढला. चाळीला कारखान्यापासून वेगळी करणारी कंपाउंड मोडकळीस आली. अशा इमारतींसोबत भुतांच्या गोष्टी जोडल्या गेल्या नाहीत तरच नवल. आगीत बळी गेलेल्या त्या दोन कामगारांचा भूत म्हणून पुनर्जन्म झाला होता. कारखान्यासोबत अनेक भूतकथा जोडल्या गेल्या. चाळीत एखादे नवे कुटुंब रहायला आले की , त्यांना ह्या कथा सांगून खबरदार केले जाई. मुलाने जास्त मस्ती केली की, त्याला कारखान्यातल्या भुतांचे भय दाखवले जाई. ' अभ्यास कर नाहीतर कारखान्यात नेऊन सोडेन' म्हणण्याचा अवकाश , मुलगा लगेच अभ्यासाला बसे !


              एके दिवशी चाळीत नवे कुटुंब रहायला आले. नवरा-बायको आणि दोन मुले असे छोटेखानी कुटुंब होते. घरप्रमुखाची बॅंकेची फिरतीची नोकरी, २-३ वर्षांत बदली व्हायची. शेजारी आले, विचारपूस केली, गावाबद्दलची माहिती दिली आणि शेजारधर्म पाळत कारखान्याचीही सविस्तर माहिती दिली.


            हळूहळु ते कुटुंब चाळीत, गावात चांगलेच रुळले. जवळच असलेल्या शाळेत मुले जाऊ लागली. शेंडेफळ थोडे उनाड होते. त्याचे नाव पंकज,एकदा तो कंपाउंडवरून उडी मारून कारखान्यात जाण्याचा प्रयत्न करू लागला. आईने पाहिले आणि त्याला ओढतच परत आणले. अर्थात उनाडक्या करणार्‍या मुलाला वठणीवर कसे आणायचे हे सर्वच आयांना ठाऊक असते. आईने त्याला तिखट-मीठ लावून कारखान्यातल्या भुतांच्या गोष्टी सांगितल्या. खरे तर तिचा भुतांवर विश्वास नव्हता, पण ह्याने पुन्हा पुन्हा कारखान्याकडे जाऊ नये हा त्यामागचा हेतू  होता. बर्‍याच वर्षांपासून बंद असलेल्या कारखान्यात साप-विंचवांचा धोका होता. रान माजले होते. अशा जागी ती माउली आपल्या लेकराला कसे जाऊ देईल ?


          पंकजने आईवर विश्वास ठेवला. मनात कुठेतरी भूत घर करून बसले. आता संध्याकाळी संधीप्रकाशात, रातकिड्यांच्या किर्र-किर्र आवाजात कारखान्याकडे लक्ष गेले की, त्याच्या उरात धडकी भरायची. कंपाउंडवरून उडी मारण्याचा विचार मन त्याच्या स्वप्नातही आला नाही.


            वर्गात पंकजचा एक चांगला मित्र बनला होता, अमोल. अमोल चुणचुणीत आणि हुशार मुलगा होता. दोघांची चांगलीच गट्टी जमली. दोघे एकाच बाकावर बसायचे, एकत्र डबे खायचे आणि खेळायचे.


          शाळेमागे थोडे अंतर चालत गेले की शेतातून तळ्याकडे जाणारी एक पायवाट होती. तिथे एक मोठे चिंचेचे झाड होते. दूर कारखान्याची मागची बाजू दिसायची. लांबच लांब काळपट लाल भिंत आणि थोड्या-थोड्या अंतराने असलेल्या लोखंडी गजाच्या मोठ्या खिडक्या. बरेचदा दोघेही सुटीत त्या झाडाखाली येऊन बसत. हे त्या दोघांचे छोटेसे विश्व होते. निवांत बसून गप्पा मारायची जागा होती. इथे वर्गातला, पटांगणावरचा गोंधळ नव्ह्ता. होता तो पक्ष्यांचा मंजुळ ध्वनी आणि कुठुनतरी येणारा बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा किणकिण स्वर.  वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायची ती हक्काची जागा होती.


      त्या दिवशी दोघे असेच गप्पा मारत चिंचेखाली बसले होते. अचानक त्या कारखान्याकडे लक्ष जाऊन पंकज बोलला,


     " तुले का वाटते बे, अम्या, कारखान्यात भूत असल ? "


     " ह्या ss !!  काहीच का बे ! आपन अश्या फाल्तू गोष्टीवर विश्वास नाही ठेवत. "
      " अबे, पर सबच जन तं म्हनतंत ? "


     " सबच जन म्हनतत म्हनून का झाला, खरा थोडीच असल . मले भुतावर विश्वास नाही. दिसला तं मानीन. आमच्या बाजूच्या घरात अमरभाऊ रायते. तो सांगते का, तो कारखान्यात गेल्ता तं त्याले भूत नाही दिसला. तो म्हन्ते का भूत नाय आहे . आपला भरोसा आहे त्याच्यावर. एकदम डेरिंगबाज मानूस आहे तो. "


    " हव ? "


   " नाइ तं का. खोटा थोडीच सांगून रायलो. आता मले सांग, लोक म्हन्तेत का चिचेच्या झाडावर देवाल रायते. आता आपन तं रोजच या झाडाखाली बसतो का नाही ? कधी कधी सायंकाळी सात वाजेवरी बसून रायलो, पर तुले दिसली आहे ? कधी का आपल्या आंगावर चढली ? नाही नं ? असती तं दिसली नसती का ? " अमोल विजयी मुद्रेत पंकजकडे पाहत बोलला.


     पंकजला उगीच ओशाळल्यासारखे झाले.  ह्या वयात मुलांची मानस्थिक स्थिती विचित्र असते. एखादा मित्र आपण जे करू शकत नाही ते करत आहे म्हणजे काहीतरी अचाट पराक्रम करत आहे असे वाटत असते. घरची बंधने आणि आपल्या मित्राच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण अशा कात्रीच तो सापडतो. मित्रासमोर आपली प्रतिमा भागुबाईची होऊ नये असे त्यांना वाटत असते. मग तो मनातली भीती लपवतो, सारवासारव करण्याचा प्रयत्न करतो. आपण अगदीच बावळट नाही हे दाखवण्याची धडपड सुरू होते. पंकजने तेच केले.


      " आपन बी भुताले काही भेवत नाही, पर विश्वास ठेवाले का जाते ? जगात चांगला आहे तं वाईट बी असलच . देव आहे तं भूत बी असलच ! "
   " तू ठेव विश्वास, आपन नाही ठेवत. "


   " अनं तुले का वाटते, त्या कारखान्यातल्या विहीरीत पाह्यला तं मानूस साप बन्ते अनं तिच्यात पडते, खरा असल ? "


   " तुले कोनं सागंलन ? "


    " नाही.....असाच इखनाल-तिखनाल ऐकलाओ... "


     खरे तर त्याला ही गोष्ट त्याच्या आईनेच सांगितली होती, पण अजूनही आपण आईने सांगितलेल्या गोष्टींवर पटकन विश्वास ठेवतो , हे अमोलसमोर स्वीकार करायची त्याला लाज वाटली. तो पुन्हा आपले हसे उडवेल अशी भीती होतीच.


    " ते सब झूट आहे बे पक्या . असा कधी होऊ शकते का ? वाटल्यास तूच त्या विहीरीत डोकावून पाह्य. "


    खरे तर तेव्हा पंकज " नाही भाऊ, मी कायले रिस्क घेऊ ? " म्हणणार होता , पण स्वतःला सावरून तो म्हणाला, " हव बे, जाऊन पाहावा लागल एखाद-दिवशी. "


    " अबे, उद्याच जाउन जा. "


     " हव."


    घंटा झाली. दोघे उठले आणि वर्गाकडे जायला निघाले. वर्गात पंकजच्या डोक्यात तोच विषय घॊळत होता आणि शाळा सुटल्यावर घरी जातांनाही त्याच्या डोक्यातून कारखान्यातले भूत काही जात नव्हते. रात्री झोपतांना पडल्यापडल्या त्याने विचार केला  की एकदा खरंच कारखान्यात जायला हवे.  भूत खरंच आहे की नाही बघायला हवे. त्याचे विचारचक्र सुरू झाले,


   " मी जाईन, पूरा कारखाना फ़िरीन. भूत आहे का नाही पाहून येईन. पर विहीरीत नाही पाहीन. समजा विहीरीत पाह्यलो अनं साप होऊन विहीरीत पडलो तं ? बाहेर कसा येईन ? बाहेर आल्यावर आईले का सांगीन ? पर सापाच्या रुपात आई मले ओळखल का ? अनं बाहेर येताच नाही आला तं ? मंग तं आई परेशान होऊन जाईल. अनं मी साप बनून का करीन ? शाळेत कसा जाईन ? छी... भेपका अनं उंदरं खावा लागल. यक्क थू ! नाही, आपन विहीरीत नाही पाहावाचा. पर कारखान्यात जाईन. भूत दिसलाच तं त्याले 'अगा मामा, अगा दादा ' करून पटवीन म्हंजे तो मले सोडून टाकल. काही नाही करल. उद्याच जाऊ का ? हव, उद्याच जातो.. नाही, नाही... उद्या नाही, मंग कई आरामात जाईन."  असा सगळा विचार करत त्याला कधी झोप लागली हे कळलेच नाही.


     दुसर्‍या दिवशी वर्गात अमोलने त्याला विचारलेच, " का पक्या ? का म्हनतेस ? जाशील का बे कारखान्यात ? "


     "  हव जाईन नं बे. कावून नाही जाईन ? मी घाबरतो थोडीच ! "


    आता जायचे तरा ठरवले आहे, तसे अमोलला सांगितले पण, पण जायचे कधी हा प्रश्न पंकजच्या मनात होता. पुढचे एक-दोन दिवस अमोल त्याला 'कधी ?' विचारायला आणि हा 'लवकरच' असे उत्तर द्यायचा. हळूहळू गप्पांमध्ये नवे विषय आले आणि हा विषय मागे पडला. पण कारखाना तर रोजच पंकजच्या नजरेस पडायचा. त्यामुळे हा विषय त्याच्या डोक्यातून तरी जात नव्हता. ' कधीतरी आपन कारखान्यात जाउन पाहायचे' अशी त्याने मनाशी खूणगाठ बांधली असली तरी तो दिवस काही उजाडत नव्हता.


      त्यांच्या ह्या चर्चेला सुद्धा आता वर्ष होत आले होते. एके दिवस त्याच्या आईला सामानाची आवराआवर करतांना पाहिले. हे दृश्य त्याच्या ओळखीचे होते. बाबांची पुन्हा बदली झाल्याचे त्याच्या लक्षात आले,  त्याने आईने विचारता उत्तर आले की या रविवारी निघायचे आहे. त्याला कारखान्यातल्य़ा भूताबद्दल केलेला निश्चय आठवला. म्हणजे त्याच्या हाती फक्त ४ दिवस होते. मनाचा हिय्या करून कारखान्यात भूताच्या शोधात जायचे आणि ह्या प्रकरणाचा निकाल लावायचा असे त्याने ठरवले.


            मनाची तयारी करण्यातच पुढचे दोन दिवस गेले. शुक्रवारी शाळेत जाताना शाळेतून परतून कारखान्यात जायचे असे त्याने ठरवले. मात्र  त्य़ाने ही गोष्ट अजून अमोलला सांगितली नव्ह्ती. आपण अजूनपर्यंत कारखान्यात गेलेलो नाही हे त्याला कळले तर तो आपली उडवेल, असे त्याला वाटले. त्यापेक्षा उद्या शाळेत आपण सांगायचे असा त्याने विचार केला.


        शुक्रवारी शाळेतून तो लगबगीने परतला. हिवाळ्याचे दिवस होते. अंधार लवकर पडतो तेव्हा घाई करणे गरजेचे होते. त्याने कपडे बदलले आणि आईचे लक्ष नाही हे बघून तो कंपाऊंडकडे गेला. विटांच्या भिंतीत असलेल्या खाचांमध्ये पाय रोवत तो भिंतीवर चढला.  भिंतीवरून त्याने कारखान्यावर नजर फ़िरवली. हिवाळ्याचे दिवस, संध्य़ाकाळचे पाच वाजले असावेत. प्रकाश मंदावला होता. बागेतली बेछूट वाढलेली झाडे, तण , झुडूप आणि तो पडका कारखाना. सारेच दृश्य मनात भीती निर्माण करणारे होते. तो भिंतीवरून खाली उडी मारणार तेवढ्यात त्याचे लक्ष झाडीत दडलेल्या विहीरीकडे गेले आणि काळजाचा ठोका चुकला. पण आता माघार घ्यायची नाही असे त्याने ठरवले होते. "जय बजंरग बली, तोड़ दे दुश्मन की नली " म्हणत त्याने भिंतीवरून उडी मारली. मनात " भूत पिशाच निकट नहीं आवें...." सुरू झाले होते आणि तो सगळीकडे भिरभिरती नजर ठेवत एक-एक पाऊल टाकत होता. अचानक चर्र.. असा आवाज झाला आणि त्याने भिंतीकडे धूम ठोकली. पण, भिंतीवर चढतांना त्याने मागे वळून पाहिले, तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो पाचोळ्यावर पाय पडल्याचा आवाज होता. " ह्या ss  आपन बिनफ़ुकट घाबरलो, "त्याने मनात म्हटले. तो परत वळला आणि आता सरळ कारखान्याकडे जाऊ लागला. पण वारंवार त्याचे लक्ष त्या विहीरीकडे जात होते. कोण जाणे, पण त्या विहीरीत एक विचित्र आकर्षण होते. पण आपण विहीरीत डोकावलो तर विहीर आपल्याला साप बनवून आत ओढेल आणि साप बनलो तर मग आई काय म्हणेल हा विचार त्याच्या डोक्यात यायचा आणि तो विहीरीकडे जाणे टाळायचा. आता तो कारखान्याच्या अगदी समोर उभा होता. त्याच्या डोळ्यासमोर पोपडे उडालेल्या जळक्या काळपट भिंती होत्या. सगळीकडे कोळ्याच्या जाळ्यांचे साम्राज्य होते आणि खाली फ़रशी पाल्यापाचोळ्याने झाकली गेली होती. तो कारखान्यात शिरला. दोन्ही बाजूंना छोट्या छोट्या खोल्या होत्या. तो त्या खोल्यांत शिरला. फ़ुटक्या कौलांतून प्रकाश अंधार दूर सारत होता. तो एकेका खोलीत जाऊन फ़ेरी मारून यायचा. अजून त्याला भूत दिसले नव्हते. आता त्याची भीती बरीच कमी झाली. तो शेवटच्या खोलीत शिरला.लांबच लांब खोली होती. थोड्या-थॊड्या अंतरावर लोखंडी गजांच्या अनेक  मोठ्या खिडक्या होत्या.  हे कदाचित गोदाम असावे, असा त्याने अंदाज बांधला आणि तो खरादेखील होता. ते गोदाम होते. चिंचेच्या झाडाखालून आपल्याला हीच खोली दिसले हेदेखील त्याच्या लक्षात आले. त्याने चौफ़ेर नजर फ़िरवली. खाली फ़ुटक्या कौलांचा खच होता, पालापाचोळा, कोळीष्टके होतीच. तो खिडकीबाहेरून कसे दृश्य दिसते हे बघायला खिडकीपाशी गेला.चिंचेच्या झाडाखाली त्याला एक आकृती दिसली. अंधूक प्रकाशात चेहरा नीट दिसत नसला कपड्यांवरून आणि एकंदर शरीरयष्टीवरून हा अमोलच असल्याचे त्याच्या लक्षात आले. अमोल कधीकधी शाळा सुटल्यावरदेखील चिंचेच्याझाडाखाली बसून चिंतन का मनन, अमोलच्याच भाषेत, " विचार करतो विश्वाचा" वगैरे अलाना-फलाना करत असतो हे त्याला माहीत होते.


        अचानक पंकजच्या मनात एक विचार आला.


    "समजा आपन अमोलले उद्या सांगितला की कारखान्यात जाऊन आलो तरी त्याचा विश्वास बसन्याची शक्यता कमीच राह्यल. आज तो आपल्या डोळ्यानं पाह्यल तं त्याचा विश्वास पन बसून जायल. "


    आणि तो खिडकीपाशी जाऊन अमोलला हातवारे करू लागला. मोठ्याने हाका मारू लागला. पण अमोलचे काही लक्ष जाईना. एव्हाना अंधारू लागले होते. कदाचित ह्यामुळे असेल, असे वाटून तो अधिकच मोठमोठ्याने हातवारे करू लागला. खिडकीतून हात बाहेर करून आपल्याकडे बोलवू लागला. पण अमोल खाली मान घालून कुठल्या विश्वात गुंग झाला होता देव जाणे. तो जणू तिथेच थिजला होता, काहीच प्रतिसाद देत नव्हता. शेवटी कंटाळून पंकजने तो प्रयत्न सोडला आणि खिडकीतून परत वळला. मग त्याने उग्गाच खेळ म्हणून खोलीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत उड्या मारत धाव घेतली. मग पुन्हा एकदा प्रयत्न करावा म्हणून खिडकीपाशी गेला तर अमोल तिथे नव्ह्ता.  तो घरी परतला असावा. इकडे कारखान्यात पंकजची भिड पुरती चेपली होती. तो आता कारखान्यात " अगा भूत भाऊ, भूत काका, भूत मामा, सामोर ये गा .." असे मोठ्याने ओरडत हिंडत होता. तो आता कारखान्यातून बाहेर पडला.त्याचे लक्ष पुन्हा विहीरीकडे गेले.


" आता भुताची कहानी खोटी आहे म्हंजे सापाची पन खोटीच असल.. " त्याने विचार केला.


तो हळूहळु विहीरीकडे जाऊ लागला. पण त्याच्या डोक्यात पुन्हा विचार आला,


" अनं सापाची गोष्ट खरी राह्यली तं ? मंग त मी साप बनून जाईन. मग आई का म्हनल ? भुताले तं पटवता पन येउन जायल, पर सापाचा मानूस कसा बनीन ? " आणि तो परत विहीपासून दूर झाला.


" कारखान्यात भूत नाही आहे इतका माहीत झाला तोच बहोत आहे, आता जास्ती मस्ती नाही करावले पाइजे , " असा विचार करत तो कंपाउंडपाशी आला आणि भिंतीवर चढला.


 एव्हाना चांगलेच अंधारले होते, पण तो आता अंधाराला घाबरत नव्हता. त्याने पुन्हा एकदा कारखान्यावर नजर फ़िरवली आणि अगदी आनंदाने खाली उतरला.


     घराकडे परत जातांना त्याला खूप हलके वाटत होते. एक ओझे उतरले होते. कारखान्यात भूत नाही हे त्याला कळले होते.  उद्या अमोलला हे सारे सांगायचे हे ठरवले. आज त्याला अतिशय शांत झोप आली.


       दुसर्‍या दिवशी शनिवार, सकाळची शाळा, पण पंकजला जाग आली नाही. आईनेही त्याला धपाटे घालून उठवले नाही. जेव्हा जाग आली , तेव्हा सकाळचे १० वाजले होते. त्याची शाळा सुटली होती. त्याने आईला विचारले तर तिने सांगितले की, आपण आजच जात आहोत. म्हणून तुला उठवले नाही. काल अचानक जाण्याचा दिवस बदलला. तुझ्या शाळेचे सगळे काम झालेच आहे. तिने त्याला पटकन आवरून तयार व्हायला सांगितले.  तो अमोलला भेटू शकत नव्हता. भूत नाही हे त्याचे म्हणणे पटले आहे हे सांगू शकत नव्हता. अमोलने त्याच्या जीवनात किती मोठे स्थान बनवले आहे हे सांगू शकत नव्हता. आणि शेवटचे चिंचेच्या झाडाखाली बसून पोटभर गप्पा करू शकतनव्हता. एक गळाभेट पण घ्यायची होती.


" आई, मी शाळेत जाऊन येऊ ५ मिन्टं ? " त्याने विचारले.


" अरे , आता कसा जाशील ? वर्ग चालू असतील आणि आपली सगळी तयारी झाली आहे. गाडी बाहेर वाट बघत आहे. आवर पटकन."


 उगाच त्याच्या मनावर मळभ दाटले. गाडीत बसून जातांना इथली ३ वर्षें डोळ्यांसमोर येऊ लागली; आणि कारखान्यातले चित्र तर वारंवार डोळ्यांपुढे यायचे. कालचा दिवस त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस होता. मनातल्या मनात तो म्हणाला,
" अम्या, दोस्ता, तू सही होतास. आपला आता बिल्कुल विश्वास बसला आहे. भूत नावाची गोष्ट या जगात रायतच नाही...... "
---------------------------------------------------------------------------------


    आज अमोल शाळेत अंमळ लवकरच आला. वर्गात त्याची नजर भिरभिरली. मग तो आपल्या जागी जाऊन बसला. पण त्याची सारखी चुळबुळ सुरु होती. प्रार्थना संपली, वर्ग सुरु झाले तरी त्याच्या बाजूची जागा रिकामीच होती. पंकज आला नव्हता. त्याने पंकजच्याच चाळीत राहणार्‍या मित्राला विचारले, त्याने सांगितले की , ते लोक आजच जाणार होते, गेले असतील.


   " पन तो तं उद्या जानार होता ? "


  " हव, पन काल रात्री त्याची आई माझ्या आईले भेटाले आली होती तं माहीत झाला का ते आजच चाल्ले म्हनून. "


  " हट बे यार... त्याले एक मोठी गोष्ट सांगावाची होती बे.. कालचा दिवस जबरदस्त होता बे..


    पक्या, दोस्ता, तू सही होतास, आपला आता बिल्कुल विश्वास बसला आहे. भूत नावाची गोष्ट या जगात रायतेच..... "


  (समाप्त)पूर्वप्रकाशित : दीपज्योती दिवाळी अंक २०११

त्रिवेणी (हिंदी ) -- क्र. १-४

त्रिवेणी क्र. १ >>>बारिश की बुंदे भी कितनी बेईमान होती है.
बस कुछ लम्हो की यहाँ मेहमान होती है..
.
.
.
.
ये आंसू मुझसे बेईमान क्यू नही होते ??
     
पुणे,
६ मार्च, २०११ 

--------------------------------------------------------------------------------
त्रिवेणी क्र. २ >>>

कहते हैं आदमी पढेगा, तो उन्नत होगा, विचारों का दायरा बढेगा..
सोच बदलेगी, सरहदें मिटेगी, दिल-से-दिल मिलेंगे..
.
.
.
.
.
.
हम तो अब फेसबुक पर भी ग्रुप्स में जीने लगे हैं


--------------------------------------------------------------------------------

त्रिवेणी क्र. ३ >>>

आज पापा घर जरा देर से पहुँचे..
मोबाइल का नेटवर्क जॅम था..
.
.
.
.
.
वजह वोही थी, बस 'तारीख' नयी थी

--------------------------------------------------------------------------------


त्रिवेणी क्र. ४  >>>एक ही गाडी  में बैठे  हम दोनों , मंजिल की तरफ बढ़ रहे थे..
और बंद खिड़की के बाहर खुबसूरत नजारों का सिलसिला चला.
.
.
.
.
.
अक्सर ऐसे रास्तों पे ही तो हादसे हुआ करते हैं..
बंगुलुरु,
१८ सितम्बर ,२०११ 

पुनर्जन्माचा प्रथम वर्धापनदिन

रास्कल* हो, माइंड इट  !!
    वाढदिवस वगैरे ऐकले असतील, ही पुनर्जन्माच्या वाढदिवसाची काय भानगड आहे असा प्रश्न पडला असेलच. तर आजपासून बरोब्बर एक वर्षापूर्वी माझ्या मेलेल्या ब्लॉगने रजनीदेवाच्या कृपेने नवा जन्म घेतला.
      तसा मी ब्लॉग सुरु केला होता १९ नोव्हेंबर ,२००९ ला. आरम्भशुराप्रमाणे २ लेख पटापट लिहिलेसुद्धा. पण तेव्हा रजनीदेवाची माझ्यावर कृपादृष्टी नसल्याने ब्लॉगचा अकाली मृत्यू झाला. मी फार चिंतीत होतो. मला काही सुचेनासे झाले होते. मग एके दिवशी मला आकाश गुप्ते भेटला. त्याने मला रजनीदेवाविषयी सांगितले. तेव्हापासून माझे जगच बदलले. तो म्हणाला तू रजनीकांत ची आरती लिही.बघ तुझे मराठी ब्लॉग विश्वात कसे नाव होईल. मग मी त्याच दिवशी रजनीदेवाची हिंदी आरती लिहिली आणि ब्लॉगवर टाकली. नतीजा बेहद चौंकानेवाला था. मला त्याचे लगेच परिणाम दिसले. बऱ्याच लोकांनी ती आरती सश्रद्ध वाचली. कमेंट्स आल्यात. हा रजनीनामाचा महिमा होता. आता रजनीदेवाच्या कृपेने दुसऱ्या दिवशी मराठी आरतीसुद्धा आली. ब्लॉग धावू लागला. पाठीराखे बनलेत. ब्लॉगचा नवा जन्म झाला होता. रजनीनामाचा महिमाच असा की तेव्हा जिकडे तिकडे रजनीभक्तीचा प्रसार होऊ लागला. आकाश, मी ,सौरभ साऱ्यांच्याच ब्लॉगवर रजनी; आणि आंतरजालावर रजनीमहती कथन करणाऱ्या लेखांची रेलचेल. मला नवी ओळख मिळाली, मी स्वामी संकेतानंद या नावाने ओळखला जाऊ लागलो.
         वर्धापनदिनानिमित्त काय लिहावे असा प्रश्न पडलाच नव्हता. कारण रजनीदेवाच्या आरतीने मिळालेल्या पुनर्जन्माचा वाढदिवस रजनी-स्तुतीनेच करायचा , नाही का ? तर रास्कल हो, स्वामींनी रजनी-संकीर्तन लिहिले आहे. आज दिवसभर रजनीनामाचा गजर होईल. अगदी मोठ्याने
रजनीनामाचा गजर करायचा, तल्लीन व्हायचे. देवाजींची जशी माझ्यावर कृपा झाली तशी तुमच्यावरही होईल. आजच सुरुवात करा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या.

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

तूच गुरू, तूच सखा, तुझ्याच सारे भजनी

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी
बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

तुझ्याच कृपेने चषक जिंकला यंदा धोनी

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी
बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

झूझू सुद्धा तुझीच नक्कल करतो बेमानी

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी
बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

सारे विग लावती, तूच टकलाशी इमानी

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी
बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

३३ कोटी स्वर्गात, भूतळी सचिन आणि रजनी

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी
बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी
बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी
बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

रजनीनामाचा गजर होऊ द्या 

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी
बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी बोला रजनी, रजनी बोला, बोला रजनी-रजनी

रजनीकांतच्या नावाने.....  MIND IT  अण्णा  !!!

तमिळप्रान्तस्वामी, सहस्रसूर्यप्रकाशित, कोटिहस्तबलाभुषित,सर्वयुद्धकलाविषारद, धुम्रदन्डिकाधारी, कृष्णनयनावरणउच्छालिता, अभिनयसम्राट, मनोरंजनदाता, भाग्यविधाता,तरुणातितरुण, चिरतरुण, देवाधिदेव, चित्रपटदेव, रजनिकांतदेवजीकी...... जय !!!!


 *रजनी संप्रदायात रास्कल हे अतिशय मानाचे संबोधन आहे.

जी हाँ, मै एक आम आदमी हूँ..
जी हाँ, मैं एक आम आदमी हूँ
अब आपको पता चल गया होगा
देख के ताकद मेरे आवाज़ की
अब आपका दिल जल गया होगाजी हाँ, मैं वो ही आम आदमी हूँ
जो कल तक डरता-सहमता था
हालात पे रोता, रोज मर के जीता था
जिसकी आवाज़ सैकडों बार दबायी गई
और हजारों बार जो छल गया होगाजी हाँ, मैं वो ही आम आदमी हूँ
आपके घोषणापत्र में जिसका चेहरा हैं
आपके हर चुनाव में जो एक मोहरा हैं
आज मैंने भी अपनी एक चाल चली
तो आपका शतरंज हिल गया होगाजी हाँ, मैं एक आम आदमी हूँ
मैं प्रजातंत्र को बनाने वाली प्रजा हूँ
आप नहीं श्रीमान, मैं यहाँ का राजा हूँ
आज मैंने अपना सिंहासन माँगा हैं
तो आपका अभिमान ढल गया होगाजी हाँ, मैं एक आम आदमी हूँ
और मैं जानता हूँ ये देश मेरा हैं
मुझसे ही नवनिर्माण का सबेरा हैं
आप इस सूरज को छुपा नहीं सकते
कोशिश में आपका हाथ जल गया होगा..जी हाँ, मै एक आम आदमी हूँ
अब आपको पता चल गया होगा..
देख के ताकद मेरे आवाज़ की
अब आपका दिल जल गया होगा..


       -- बेंगलुरू,
               २७ अगस्त, २०११
अलविदा....

              कॉलेजचे शेवटचे सत्र (मराठीत ’सेमिस्टर’) म्हणजे जरा भावनिकच असते. कॅम्पसमध्ये एकंदरित धमाल असतेच. प्लेसमेंटची गडबड, प्रोजेक्टचे टेन्शन, शेवटचे वर्ष म्हणून आसमंत भरून मस्ती करायची उर्मी, आणि या सगळ्यांचा जोडीला एक हळवेपणाची किनारदेखील असते.. "हे दिवस आता परत येणार  नाहीत " ह्याची पुरेपुर जाणीव असते; आणि त्यात हा "फ़ेअरवेल " नावाचा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार असतो.. जर एखादा दगड या फ़ेअरवेलला आला तर त्याच्या आतूनसुद्धा अश्रूंचे कारंजे फ़ुटतील.. फ़ायनल ईअरच्या पोरांनी रडलेच पाहिजे अशी तजवीज हे ज्युनिअर लेकाचे या फ़ेअरवेलचे कार्यक्रम आखतांना करतात.

      अस्मादिकसुद्धा कधी काळी कॉलेजला गेलेले. अस्मादिकांना त्यांच्या ज्युनिअर्सनी फ़ेअरवेल दिलेला; आणि अस्मादिक खबरदारीचा उपाय म्हणून खिशात २-२ हॅंकीज(रुमाली हो !) घेऊन गेलेले, पण मरण कुणाला चुकतंय हो ? 

       अजूनही तो दिवस आठवला की मन हळवे होते. फ़ेअरवेलचा दिवस होता म्हणून आमच्या ज्युनिअर्सनी आम्हाला वाट्टेल ते करण्याचे स्वातंत्र्य दिलेले..मग काय, उधळलो आम्ही.. एकदा तरी सार्वजनिक स्थळी, चार लोकांत आपला गळा साफ़ करण्याची इच्छा होती, बिन्दास गायची इच्छा होती. ती इच्छा आम्ही इथे पूर्ण करून घेतली. आपल्या अति-बेसूर्‍या आवाजात आम्ही समोर माईकवर "पापा कहते हैं बड़ा नाम करेगा.. " गायलो.. तो फ़ेअरवेलचा दिवस होता म्हणून आम्ही बचावलो, नायतर आमचा खूनच पाडला असता त्यांनी..गळा साफ़ करायच्या हौसेपोटी स्वतःच साफ़ झालो असतो.. पुढे परिसरातल्या श्रवणव्यंगवाल्या वैद्यांचा-डॉक्टरांचा धंदा बराच वाढला असे कळले.. मानसोपचारतज्ञांकडे पण बरीचशी गर्दी झाली होती. 

       पण एवढ्यात शांत बसतील ते स्वामी कसचे. " मौका भी हैं, दस्तूर भी हैं " याची जाणीव झाली आणि आमची उपजत काव्यप्रतिभा "काव्य -काव्य" कोकलू लागली. "मुसिबत आती हैं तो अकेली नहीं आती, अपने भाई-भतिजों को साथ लेकर आती हैं " याची आता त्या बिचार्‍यांना जाणीव होणार होती. त्या दिवशी सुदैवाने (आणि त्यांच्या दुर्दैवाने)माझ्या खिशात पेन आणि कागद होते. बस , बसल्याबसल्याच काही ओळी पाडल्या, तेवढ्यात सूत्रसंचालन करण्यार्‍या आमच्या कनिष्ठकेने (म्हणजे ज्युनिअर मुलगी हो) "आ बैल मुझे मार" केले. " If any of you wanted to say something, please come here ! "  आम्ही लागलीच कविता पूर्ण केली. उभे झालो, चष्म्याची दांडी सेट केली, (हो, काव्यवाचनाआधीची ही एक मह्त्त्वाची स्टेप आहे.) पुढ्यात जाऊन म्हणालो, " यप, आइ वॉन्टेट टू से समथिंग. आइ’व रिटन फ़्यू लाईन्स फ़ॉर दिस ऑकेज़न. आइ’ड लाइक टू शेअर देम.. " (लगीतच इन्गलिस झाली होती देवा त्या दिवसाले !).. आणि आम्ही ज्या ओळी त्या गरीब बिचार्‍यांना ऐकिवल्या, त्यांच पुढे  " अलविदा " या कवितेच्या स्वरूपात अजरामर होणार होत्या. 

       तर माझ्या प्रिय वाचक मित्रांनो,पेशे-खिदमत हैं........  " अलविदा " मंजिलों की तरफ भागते कदम..

कुछ राहें पीछे छोड़ जाएँगे..

यादों के जंगल अब और भी घने हो जाएँगेहम शायद ही रोक पाएँ
आँसुओं को बहने से..
होंट भी अब थर्राते हैं
 अलविदा कहने से..
कारवाँ बढ़ता रहेगा..
गुबार उड़ते रहेंगे..
यादों के जंगल अब और भी घने हो जाएँगे


 Assignment copies से शुरू होती कहानियाँ...
 कैंटीन में ख़त्म होती कहानियाँ....
चाय के प्यालों में बीती लम्हों सी रातें....
और हर लेक्चर जैसे कई सदियाँ..
बेरहम जिंदगी की भागदौड़ में ..
अब समय देखना भूल जायेंगे..
                       यादों के जंगल अब और भी घने हो जाएँगे


खट्टी यादें, मीठी यादें..
प्यार की, तकरार की यादें ..
होंटों पे लाएगी मुस्कुराहटें.. 
नम पलकों  के पीछे यादें..
जो अब हमें तंग करते हैं
उन्ही पलों को हम तरस जायेंगे..
यादों के जंगल अब और भी घने हो जाएँगेपल-पल साथ रहने वाले दोस्त भी
ऑरकुट और फेसबुक में नज़र आएंगे..
slambook के पन्ने भी..
अपनी कहानियाँ बयाँ करेंगे..

यादों के जंगल अब और भी घने हो जाएँगे Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More