पोस्ट्स

सप्टेंबर, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

टॉरेंटगाथा

ह्या प्रकाराला ’पोस्टमॉडर्नोत्तर काव्य’ म्हणतात म्हणे. म्हटलं आपणही पाडून बघावी एक पोएम. तर काल रात्री पाडलेली ही रेसिपी चाटुनि आता बघणे.  डार्केस्ट क्लाउडी राती लैपटॉप मांडी असतो लेटेस्ट कोणती मूव्ही मी लगेच आयमडिबतो* टॉरेंट साइटी जाता मी हज़ार नावे बघतो वेचून क्लीन टॉरेंटा सीडणारि* तेची धरतो डाऊनलोडुनी घेतो बँडविड्थ सारी युझुनी रात्रीच पाहुनी मूव्ही गूगलून घेतो अजुनी पिंगूनि मित्र तो बोले ’पाहिलास मूव्ही अमका?’ देऊन आणखी लिंका आणवेल मोठा झटका ’येईल तो नवा सीझन्‌*’ ’एपिसोड आला बघ रे’ यूट्यूब वर चाले गाणी बँडविड्थ सारी विसरे डाऊनलोडण्याची ही सूटणार नाही व्यसने टॉरेंट-कुंपणी ’स्वामी’ थांबवाल आता चरणे? -- स्वामी संकेतानंद, नवी दिल्ली, १३-०९-२०१४ ------------------------------------------------------------------------------------------ आयमडिबणे = imdb.com वर सिनेमाचे रेटिंग/रिव्ह्यू/प्लॉट समरी बघणे सीडणारि = चांगला seed count असणारी टॉरेंट सीझन = इंग्रजी मालिकांचे पर्व.

पितृपक्ष स्पेशल विडंबन- आम्ही कोण

पितृपक्ष स्पेशल विडंबन सादर करत आहे. आस्वाद घेणे. आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू कावळे- देवाने दिधले असे पिंड तयें आम्हांस शीवावया विश्वी या पितराबले विचरतो चोहीकडे लीलया त्रैलोकांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया वळे सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके; काकस्पर्शच आमुचा शकतसे पिंडांप्रती द्यावया- मोक्षातिशया, अशी वसतसे जादू बिलांमाजि या; पापे वाढविता तुम्ही, बदलितो ते भाग्य आम्ही फुके! स्वर्गामाजि वसाहती वसविल्या कोणी नरांच्या बरे? नर्काला मनुलोक साम्य झटती आणावया कोण ते? ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे; ते आम्हीच पितर, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते! आम्हांला वगळा- गतप्रभ झणी होतील मोक्षांगणे आम्हांला वगळा- थकाल पितरांची फेडिता ती ऋणे! -- स्वामी संकेतानंद, नवी दिल्ली, ११/०९/२०१४

सफ़र

उसकी ख़ानाबदोशी वो हिज़्र की रातें सूरज की तपीश बेदरख़्त वीरानें उफ़क़ तक फ़ैले रेत के टीलें.. आहिस्ता आहिस्ता दीन-ओ-इमाँ की रटीं बातें जाती रहीं आँखों में रची-बसी चकाचौंध टिमटिम चाँदनी में फ़ना होती रहीं दिमाग़ी गलियारों से जज़्बातों का एक-एक पुलिन्दा राह में गिरता रहा.. वहदत-उल-वजूद की बातें मिटती रहीं बुतपरस्ती की चाहतें बुझती रहीं और फिर सारी हिकारत उसके जेहन से जाती रही.. क्या वो पशेमाँ था? जी नहीं क्या वो हैराँ था? शायद.... क्या पता? ... शायद.... - नई दिल्ली, ०४-०९-२०१४