पोस्ट्स

सप्टेंबर, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुनर्जन्माचा प्रथम वर्धापनदिन

रास्कल* हो, माइंड इट  !!     वाढदिवस वगैरे ऐकले असतील, ही पुनर्जन्माच्या वाढदिवसाची काय भानगड आहे असा प्रश्न पडला असेलच. तर आजपासून बरोब्बर एक वर्षापूर्वी माझ्या मेलेल्या ब्लॉगने रजनीदेवाच्या कृपेने नवा जन्म घेतला.       तसा मी ब्लॉग सुरु केला होता १९ नोव्हेंबर ,२००९ ला. आरम्भशुराप्रमाणे २ लेख पटापट लिहिलेसुद्धा. पण तेव्हा रजनीदेवाची माझ्यावर कृपादृष्टी नसल्याने ब्लॉगचा अकाली मृत्यू झाला. मी फार चिंतीत होतो. मला काही सुचेनासे झाले होते. मग एके दिवशी मला आकाश गुप्ते भेटला. त्याने मला रजनीदेवाविषयी सांगितले. तेव्हापासून माझे जगच बदलले. तो म्हणाला तू रजनीकांत ची आरती लिही.बघ तुझे मराठी ब्लॉग विश्वात कसे नाव होईल. मग मी त्याच दिवशी रजनीदेवाची हिंदी आरती लिहिली आणि ब्लॉगवर टाकली. नतीजा बेहद चौंकानेवाला था. मला त्याचे लगेच परिणाम दिसले. बऱ्याच लोकांनी ती आरती सश्रद्ध वाचली. कमेंट्स आल्यात. हा रजनीनामाचा महिमा होता. आता रजनीदेवाच्या कृपेने दुसऱ्या दिवशी मराठी आरतीसुद्धा आली. ब्लॉग धावू लागला. पाठीराखे बनलेत. ब्लॉगचा नवा जन्म झाला होता. रजनीनामाचा महिमाच असा की तेव्हा जिकडे तिकडे रजनीभक्ती