पोस्ट्स

एन्दिरन स्तोत्र - १ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एन्दिरन स्तोत्र - २

------ भाग १ पासून पुढे ------ दोन विनोदी नर । जे चिट्टीला वारंवार ॥ करण्यासाठी बेजार । प्रयत्नरत ॥५२॥ परि चिट्टी नाही बधला । दोघां धडा  शिकविला ॥ तयांसी बेजार केला । मारूनी पैजारा ॥५३॥ पहा या घटनेतून । मनी घ्या ठासून ॥ कुणा विनोद करून । खिजवू नका ॥५४॥ ते सहकारी राहिले । म्हणून वसीने क्षमा केले ॥ दयाभाव दाखविले । त्या दोघांप्रत ॥५५॥ पहा वसीच्या चित्ती । आहे कणवाळू वृत्ती ॥ हीच खरी शक्ती । मानवाची ॥५६॥ आता चिट्टीच्या लीला । अनुभवी ती बाला ॥ अभ्यास तिज करविला । वैद्यकशास्त्राचा ॥५७॥ देवीच्या नामे गोंधळ । करती जन सकळ ॥ थांबविला तात्काळ । चिट्टीने बघा ॥५८॥ अभ्यास हा प्रथम । मग आले देव-धर्म ॥ हेची खरे मर्म । विद्यार्थ्यांचे ॥५९॥ इतरांना त्रास देउन । ध्वनीप्रदूषण करून ।। देवी ती प्रसन्न । होइल का ॥६०॥ इथे एक संदेश दिला । ध्वनीप्रदूषण करणार्‍याला । धडा शिकविला । देवीरूप दाखवून ॥६१॥ परीक्षा उत्तीर्ण करायला । मदतीचा हात दिला ॥ म्हणूनच ती बाला । उत्तीर्ण झाली ॥६२॥  चिट्टी खोटे नाही बोलला । मनुष्यस्वभाव हा भला ॥ कधीच न कळला । भावनाहीन चिट्टीस ॥६३ ॥ मग रेल्वेगाडीच्या करामती । त्या वर्ण...

एन्दिरन स्तोत्र - १

श्री गणेशाय नम: हे पार्वतीनन्दन । अग्रपूजा तुझा मान ।। करितो तुज वन्दन । स्वामी संकेतानन्द ।।१॥ व्यासा बुद्धी तुच दिली । तयाची लेखणी चालविली ।। म्हणूनच त्याने निर्मीली । महाभारत काव्यरचना ।।२।। आता तुज वन्दून । स्तोत्र करितो लेखण ॥ जयाचे नाव एन्दिरन । चित्रपट असे ॥३॥ श्री रजनीकांताय नमः हे देवा रजनीकांता । हे साक्षात अरिहंता ॥ करितो दूर चिंता । अपुल्या भक्तांची ॥४॥ वर्णू मी किती । अशी तव महती॥ तुझीच असे भीती । दुष्टांना ॥५॥ तू हात ठेविला ।तत्त्क्षणी उद्धार झाला ।। महिमा प्रत्ययाला । आला असे ॥६॥ तूच महामेरू । तूच कल्पतरू ॥ दुबळ्यांचा आधारू । तूची असे ॥७॥ तुझिया सिनेमाद्वारे । रजनीभक्तीचे भिनले वारे ॥ तूच तूच  कैवारे ।  आता मज ॥८॥ आता हे रजनीदेवा। तुझा करितो धावा॥ सामर्थ्य मज द्यावा । स्तवनासाठी ॥९॥ तुझा मी भक्त साचा । उदो उदो रजनीनामाचा ॥ mind it मंत्राचा । गजर असो ॥१०॥ तुझी ती संवादफेक । आणि नजर भेदक ॥ धूम्रदंडिका सूचक । तुझ्या ओठी ॥११॥ हे  देवा रजनी । असतो निशदिनी ॥  तुझ्याच चरणी । स्वमी संकेतानन्द ॥१२॥ न दवडिता वेळ । न लावता पाल्हाळ ॥ वर्णितो सकळ । एन्दिरन अवतार ...