पोस्ट्स

मार्च, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

झाडीबोली कविता- लाल

पहाडावरची लाल माती एक दिवस खसली खसत खसत जाऊनस्यानी सयरामंदी पोचली वावरावरची लालमाती माट्यासंग उडली उडत उडत जाऊनस्यानी सयरामंदी बसली सयर झाले लाललाल सप्पाच्या सप्पा लाल लाल रंग परसाच्या फुलाईचा जंगलाच्या विस्तूचा लाल रंग उगोत्या सूर्याचा जरत्या निव्याचा खोकलून खोकलून छाती होते लाल पायाले काटा गडते माती होते लाल लाल रंग धमनीच्या पान्याचा जवसाच्या घान्याचा लाल रंग तिखट बुकनीचा कपार कुकवाचा हा सप्पायचा सप्पाय लालरंग सयरात असा जाऊन बसला घरात घुसला, नळात धसला रस्त्यात वायला, गाडीत परला सयरावर लाललाल कापन बसून रायली दिवस का रात बी लाल होऊन रायली काऊन विचारता, 'मंग का झाला?' रंगारंगाचा सयर लालरंग झाला हाच त जी बोहोत होऊन गेला --------------------------------- खसली= खचली माट्या= वावटळ बुकनी= तिखट आणखी काही शब्द कळले नसल्यास विचारणे. प्रो टीप:- य च्या जागी ह आणि र च्या जागी ळ वाचल्यास बरेचसे अर्थ लागू शकतात. -संकेत