पोस्ट्स

जुलै, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हिरव्या कुरणांबाहेर

हिरव्या कुरणांबाहेर बसले आहेत अजस्र देहाचे अक्राळविक्राळ चौकीदार भालेबंदुकातोफा घेऊन हिरव्या कुरणांबाहेर बुभुक्षित गुरांचा आशाळभूत कळप माती उकरून सुकलेल्या गवतांच्या मुळ्या खात आहे हिरव्या कुरणाला आहे  उंचच उंच गंजलेले लाल काटेरी कुंपण गंजलेल्या कुंपणावर चढण्याचा प्रयत्न करत आहेत गुराखी सोलवटलेल्या कातडीने हिरव्या कुरणांत आपसूकच खत वाहत येत असते आणि हिरवी कुरणे हिरवीकंच होत असतात -संकेत

स्वामींचे अभंग-२

पाशवी पाशात। अडकला पक्षी। लालेलाल नक्षी। भूमीवर।।१।। किती तडफडे। किती कळवळे। तरी नच फळे। यत्न त्याचे।।२।। करी धडपड। सुटण्याची किती। परी झोळी रीती। राही त्याची।।३।। युगानुयुगांची। विफल साधना। विसरे यातना। अखेरीस।।४।। पाशवी पाशाच्या। प्रेमात पडला। पक्षी अडकला। कायमचा।।५।। बदलला सूर। राहून पाशात। आता गाई गीत। बंधनांचे।।६।। स्वामी म्हणे पाश। कसा सोडवावा। कसा मुक्त व्हावा। पक्षी देवा।।७।। -स्वामी संकेतानंद