पोस्ट्स

एन्दिरन स्तोत्र - ३ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एन्दिरन स्तोत्र - ३

   -----भाग २ पासून पुढे ----                                                                          भाग १ इथे वाचा                    शांतीचा संदेश जरी चिट्टी  वदला । परी तो न कुणा पटला ॥ जगी कायदाच हा भला । निश्चीत असे ॥१०६ ॥ वसीगरनचा पारा चढला । चिट्टीसी घेऊनी आला ॥ बोल बहु  लाविला ।  रागाच्या भरात ॥१०७॥ प्रेम करण्याची केली याचना ।  आणिक जगू देण्याची याचना । परि वसी ऐकेचना । चिट्टीची विनंती ॥१०८॥ जग हे अमानुष खरे । प्रेम करणार्‍याला म्हणती भले-बुरे ।शरण न येती जोवरे । प्रेममार्गी ॥१०८॥ प्रेमाची ही न्यारी किमया । विरोध करते जरी दुनिया ।। प्रसंगी अपुला जीव देऊनिया । प्रेम अमर करती ॥१०९॥ चिट्टीच्या प्रेमाग्रहाने त्रासुनी । वसी आणिक ती तरुणी ।। थकुनि गेले समजावुनी । चिट्टीस त्या ॥११०॥ वसीने निर्वाणीचे निर्णय घ्रेतले । चि...