पोस्ट्स

एक दिवस फुग्गोबाचा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एक दिवस फुग्गोबाचा......

लेखकु म्हणे :             साबणाचे फुगे सर्वांनीच आपल्या लहानपणी उडवले असतील. तासनतास साबणाचे फुगे उडवण्यात घालवले असतील, आई-बाबांच्या शिव्या खाल्ल्या असतील. पण आपण फुगे बनवायला जे मिश्रण वापरतो त्याच्यावर कधी प्रयोग केलेत का तुम्ही ? तुम्ही त्या मिश्रणात कधी शाम्पू मिसळून बघितलाय ? दोन-तीन वेगवेगळे साबण वापरले तर कसे फुगे बनतील ? आपला फुगा किती काळ टिकायचा ? काही सेकंद फक्त ! किती मोठा असायचा ? काही सेमी फक्त ! हो ना ? पण एक मुलगा होता, होमर. त्याने ह्या मिश्रणावर प्रयोग केलेत आणि भला-थोरला फुगा फुगवला. त्याची ही कथा ! मूळ इंग्रजी कथा लिहिली आहे जेम्स ए. स्मिथ ह्यांनी. मूळ कथेचे नाव - "The Day of the Bubble ." त्या कथेचे हे मराठी भाषांतर. " ज्याने आशेचे बीज पेरले " या कथेप्रमाणे ही कथादेखील मी ७वी-८वीत असतांना हिंदीत वाचली होती. ( त्या वर्षी भरपूर छान - छान कथा वाचनात आल्या होत्या, सगळ्या हिंदी किंवा हिंदीत अनुवादित. ) हिंदी अनुवाद श्री. अरविंद गुप्ता सरांनीच केला होता.अर्थात मला आवडली होतीच. ही बाल-विज्ञानकथा आहे म्हटले तर...