पोस्ट्स

रजनीकांतची आरती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पुनर्जन्माचा प्रथम वर्धापनदिन

रास्कल* हो, माइंड इट  !!     वाढदिवस वगैरे ऐकले असतील, ही पुनर्जन्माच्या वाढदिवसाची काय भानगड आहे असा प्रश्न पडला असेलच. तर आजपासून बरोब्बर एक वर्षापूर्वी माझ्या मेलेल्या ब्लॉगने रजनीदेवाच्या कृपेने नवा जन्म घेतला.       तसा मी ब्लॉग सुरु केला होता १९ नोव्हेंबर ,२००९ ला. आरम्भशुराप्रमाणे २ लेख पटापट लिहिलेसुद्धा. पण तेव्हा रजनीदेवाची माझ्यावर कृपादृष्टी नसल्याने ब्लॉगचा अकाली मृत्यू झाला. मी फार चिंतीत होतो. मला काही सुचेनासे झाले होते. मग एके दिवशी मला आकाश गुप्ते भेटला. त्याने मला रजनीदेवाविषयी सांगितले. तेव्हापासून माझे जगच बदलले. तो म्हणाला तू रजनीकांत ची आरती लिही.बघ तुझे मराठी ब्लॉग विश्वात कसे नाव होईल. मग मी त्याच दिवशी रजनीदेवाची हिंदी आरती लिहिली आणि ब्लॉगवर टाकली. नतीजा बेहद चौंकानेवाला था. मला त्याचे लगेच परिणाम दिसले. बऱ्याच लोकांनी ती आरती सश्रद्ध वाचली. कमेंट्स आल्यात. हा रजनीनामाचा महिमा होता. आता रजनीदेवाच्या कृपेने दुसऱ्या दिवशी मराठी आरतीसुद्धा आली. ब्लॉग धावू लागला. पाठीराखे बनलेत. ब्लॉगचा नवा जन्म झाला होता. रजनीनामाचा महिमाच असा की...

रजनीकांतची आरती - मराठी

प्रात:स्मरणीय आदरणीय रजनीकांतदेव तमिळप्रांतीय चित्रपट-उद्योगाद्वारे आपल्या लीला दाखवून मर्त्य मानवास धन्य जरी करत असले तरी ते मूळचे आपले मराठे माणूसच (हो हो.. शिवाजीराव गायकवाडच..), त्यांचा भक्तवर्ग हा मराठी मुलुखातदेखील असल्याची जाणीव या पामरास आहे, म्हणूनच आम्ही रजनीकांतदेवजींची आरती मराठीमध्ये लिहावयास घेतली.. रजनीकांतदेवजींच्या प्रेरणेनेच ही आरती लिहीली जात आहे..हा त्यांचाच कृपाप्रसाद.... गोड मानून घ्या..   आरती रजनीकांता, महातेजस्वी संता, रक्षिले भक्तगण, असा तू अरिहंता आरती रजनीकांता ॥१॥ सिगरेट भिरकावली, ओठी अलगद झेलली, गॉगल्सची केली भिंगरी, दुष्टांची त्रेधा उडाली ॥२॥ आरती रजनीकांता... सहस्त्र गुंड भारी, एका बोटाने मारी, यमाला मात दिली, तू आमचा कैवारी ।३॥ आरती रजनीकांता... सोकावले सिनेतारे, चैतन्यमय तू उभा रे, तरुणांचा आदर्श आणि, पिडीतांचा अण्णा रे ॥४॥ आरती रजनीकांता... चित्रपट तुझे बघावे, दु:ख घरी ठेवावे, तुझेच नाम ओठी, ध्यानीमनी जपावे ॥५॥ आरती रजनीकांता... सांगावी किती आता, तुझी पराक्रम गाथा, संकेत भक्त तुझा, चरणी ठेवितो माथा ॥६॥ आरती रजनीकांता, महातेजस्वी संता, र...

रजनीकांतची आरती - हिंदी

आकाशने रजनीकांतच्या आरतीची मागणी केली..निमित्त होते रजनीकांत बसवण्याचे.. जसे आपण गणपती बसवतो ना तसेच रजनीकांत बसवायचा.  आरती मराठीत लिहिणार होतो मात्र एका मैत्रिणीसोबत चाललेल्या chat दरम्यान तिला हि कल्पना सांगितली आणि तत्क्षणी  अगदी सहजपणे आरतीचे धृपद सुचले, ती हिंदी असल्याने आरतीपण हिंदीमध्येच लिहायला घेतली. तिला धृपद आवडले  आणि मग  मी आरती पूर्ण करायला बसलो.  आकाशराव सुद्धा प्रकट झालेत आणि त्यांच्या प्रोत्साहनाने १-१ कडवे लिहित गेलो. अवघ्या १० मिनिटांत संपूर्ण आरती तयार झाली.. आपण वाचून बघा आणि आपले मत कळवा. आरती गाऊन झाल्यावर आपण जशी हाळी देतो ना उदा. "गणपती बाप्पा मोरया " तशी हाळी रजनीकांतच्या नावाने द्यायचे सुद्धा ठरले आणि लगेच एक हाळी सुचली.. ती हाळी अर्थातच आरतीनंतर . मराठी आरतीसुद्धा लिहीली आहे. मराठी आरती इथे वाचता येईल .. जयदेव  जयदेव  जय  रजनीकांता | गुंडों  का  तू  फोड़े  हैं  माथा .. जयदेव  जयदेव ||१ || दस  गुंडों  को  तुने  एक  ऊँगली  से  धो  डाला गरीबो...