पोस्ट्स

आठवणी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जी ढूँढता हैं....

जी ढूँढता हैं फिर वोही फुरसत के रात दिन... हिवाळ्यात कोवळ्या उन्हात.. अंगणात बसून चटईवर... बेकंबे घोकणे,बाराखडी कोरणे मग उग्गाच थोडे लोळणे.. आईने केस विंचरून दिले की.. शाळेला पळत सुटणे दप्तर टाकून पाठीवर.. जी ढूँढता हैं फिर वोही... उन्हाळ्यात पेंगुळलेल्या दुपारी.. छपरांतून डोकावणारे कवडसे.. ते कासव टाकीतले इवलेसे.. किती गार गार वाटायचं.. हात लावलं त्याला की ते बेटं अंग चोरायचं.. तळाला जाऊन लपत असे.. जी ढूँढता हैं फिर वोही... पावसाळ्यात डबक्यात.. शाईची कलाकारी.. भेपकी उडवणे.. अन्‌ ’त्या’ तळ्यात माझा पाय ’खपणे’... उधाणलेल्या वार्‍यात फिरवलेली चकरी.. जी ढूँढता हैं फिर वोही... पावसाळी नदीतल्या कागदी होड्या.. भिंतीवरून मारलेल्या रेतीत उड्या.. कैर्‍या तोडणे..लाखोळी चोरणे.. गुरांच्या मागे धावत जाणे.. टोपलं घेऊन शेण गोळा करणे.. चाक ’पजवत’ गावात भटकणे अन्‌ भातुकलीत राजा-राणीच्या जोड्या.. जी ढूँढता हैं फिर वोही फुरसत के रात दिन... - १८ एप्रिल, २०१२ ,  पुणे 

आता फक्त आठवणी......

मिन्नले या तमिळ चित्रपटात( हिंदी :- "रहना हैं तेरे दिल में " ) एक पिटुकले पण सुंदर गाणे आहे, " इरु विळी उनद. " हे गाणे हिंदीमध्ये नाही. फक्त ह्या गाण्याची धून तेवढी वाजते.( प्रसंग आठवा :- अनुपम खेर सैफुला भेटून सांगतो की बेटा, हे लग्न करू नकोस कारण दिया आणि माधवन दोघे एकमेकांवर प्रेम करतात.) दोन मिनिटांहून कमी लांबीचे हे गाणे, पण हॅरिस जयराजने अतिशय सुंदर संगीत दिलेय. तामरई ने गीत लिहिलेय. व्यक्तीशः मला संगीतच जास्त आवडले. पण पहिल्या ४ ओळी अगदीच सुरेख आहेत. मागे कधीतरी मी अनुवाद करावा म्हणून बसलो होतो. पहिल्या चार ओळींचा केला आणि त्यानंतर मला जे सुचत गेले ते लिहित सुटलो, अनुवाद राहिला बाजूला ! ;) एक कविता तयार झाली होती. ती बझ्झवर टाकली, आणि बर्‍याच वाचकांना पसंतही पडली होती. प्रेरणा मात्र मूळ गाणे असल्याने काही साम्यस्थळे नक्कीच असतील. सरतेशेवटी मी मूळ गाण्याचेदेखील अनुवाद पूर्ण केले आहे.वैरामुत्तू सरांव्यातिरिक्त एखाद्या दुसर्‍या गीतकाराचे गीत प्रथमच अनुवादित करतोय. माझी कविता आणि मूळ कविता दोन्ही देतोय. आधी मूळ गाण्याचा अनुवाद(गाणे जसे आहे,तसाच अनुवाद दे...