पोस्ट्स

विडंबनाचे अभंग लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आम्हां न मिळे ब्लॉक

आम्हां न मिळे ब्लॉक। न मिळेच बॅन। जालियाची व्हाण। न मिळे आम्हां।। कपाळाची आठी। हातातली काठी। एकमेकां पाठी। न कळे आम्हां।। रोज रोज टॅगा। हॅशटॅग आणा। रोजचा बहाणा । छळण्याचा।। स्वाम्या म्हणे बुक। गुड गुड ठेवा। आणि खावा मेवा। सर्व घरी।।  - सर्वमेळा(स्वामी संकेतानंद)