एन्दिरन स्तोत्र - २
------ भाग १ पासून पुढे ------ दोन विनोदी नर । जे चिट्टीला वारंवार ॥ करण्यासाठी बेजार । प्रयत्नरत ॥५२॥ परि चिट्टी नाही बधला । दोघां धडा शिकविला ॥ तयांसी बेजार केला । मारूनी पैजारा ॥५३॥ पहा या घटनेतून । मनी घ्या ठासून ॥ कुणा विनोद करून । खिजवू नका ॥५४॥ ते सहकारी राहिले । म्हणून वसीने क्षमा केले ॥ दयाभाव दाखविले । त्या दोघांप्रत ॥५५॥ पहा वसीच्या चित्ती । आहे कणवाळू वृत्ती ॥ हीच खरी शक्ती । मानवाची ॥५६॥ आता चिट्टीच्या लीला । अनुभवी ती बाला ॥ अभ्यास तिज करविला । वैद्यकशास्त्राचा ॥५७॥ देवीच्या नामे गोंधळ । करती जन सकळ ॥ थांबविला तात्काळ । चिट्टीने बघा ॥५८॥ अभ्यास हा प्रथम । मग आले देव-धर्म ॥ हेची खरे मर्म । विद्यार्थ्यांचे ॥५९॥ इतरांना त्रास देउन । ध्वनीप्रदूषण करून ।। देवी ती प्रसन्न । होइल का ॥६०॥ इथे एक संदेश दिला । ध्वनीप्रदूषण करणार्याला । धडा शिकविला । देवीरूप दाखवून ॥६१॥ परीक्षा उत्तीर्ण करायला । मदतीचा हात दिला ॥ म्हणूनच ती बाला । उत्तीर्ण झाली ॥६२॥ चिट्टी खोटे नाही बोलला । मनुष्यस्वभाव हा भला ॥ कधीच न कळला । भावनाहीन चिट्टीस ॥६३ ॥ मग रेल्वेगाडीच्या करामती । त्या वर्ण...