पोस्ट्स

कण्णत्तील मुत्तमिटाल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

श्वेतसुमनांसाठी......

   हे गीत आहे, युद्धात होरपळल्या जाणार्‍य़ा मुलांसाठी. युद्ध होतात, कुणाच्या राजकीय फायद्यासाठी, कुणाच्या खोट्या अस्मितेच्या नावावर. मात्र एक पिढी गुदमरली जाते. युद्धग्रस्त भागात बघा, मुलांना त्यांचे बालपण सुद्धा उपभोगता येत नाही. काश्मिरातल्या मुलांचे बालपण ते काय असणार, AK-47 च्या सावलीत जाणारं! गोळीबाराचा आवाज हेच त्यांचे अंगाईगीत."आज कर्फ्यू है " हे त्यांचे बोबडे बोल. त्यांचे बालपण हरवत असते. आणि आपण "युद्धस्य कथा रम्य" म्हणत असतो. सगळ्या युद्धग्रस्त भागात थोड्याफार फरकाने हीच स्थिती असते.         महान तमिळ गीतकार/कवी वैरामुथु यांनी हे गीत "कण्णत्तील मुत्तमिटाल "  या मणीरत्नम यांच्या चित्रपटासाठी लिहीले. तमिळ वाघांच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर एका मुलीच्या भावविश्वाचे चित्रण म्हणजे हा सिनेमा. संगीत रहमान सरांचे आहे.हे गाणे त्यांनीच गायले आहे. या चित्रपटाच्या गाण्यांकरता दोघांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत. मला हे गाणे खूप आवडते म्हणून मी मराठी अनुवाद करायला घेतला. अगदीच शब्दशः नाही.वैरामुथु सरांना अभिप्रेत असलेल्या भावना पकडण्याचा प्...