पोस्ट्स

कथा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भाषांतरित कथा: म्हणी वि. म्हणी(मूळ बंगाली कथा "कॉथा vs कॉथा"चे भाषांतर)

दिव्य मराठीच्या मधुरिमा दिवाळी विशेषांकात छापून आलेली ही एक भाषांतरित कथा. मूळ कथालेखक बंगाली भाषेतील सुप्रसिद्ध लेखक शीर्षेन्दु मुखोपाध्याय हे आहेत. कथा वाचण्यासाठी इथे टिचकी मारा .

द ग्रीन फ़्लाय

            तो म्हातारा शेतकरी गावातला सर्वात श्रीमंत माणूस, अगदी आजारी, मृत्युच्या दारी उभा होता.देवाच्या दरबारी त्याचा न्यायनिवाडा केला जात होता, त्याच्याकडे बोट दाखवून देवाने सार्‍या मानवजातीला उदाहरण दिले : " जॉन गॅलकडे बघा. तुम्ही मर्त्य जीव समजता काय स्वतःला ? तुम्ही खिजगणतीलासुद्धा नाहीत. आता, जॉन गॅल खरंच कोणीतरी आहे. जिल्ह्याचा न्यायाधीशसुद्धा त्याची भेट घेतो वेळप्रसंगी. गावच्या पाटलीणबाई येतात आणि त्याची भेट घेतात. तो सर्वाधिक श्रीमंत माणूस आहे.तरी मी त्याच्यावर आघात करू शकतो.त्यासाठी मला एखादा भुकेला लांडगा पाठवायची गरज नाही की, एखादा मोठा देवदार त्याच्यावर पाडून त्याला चिरडून टाकायची पण गरज नाही. एक छोटी माशी पुरेशी आहे. " अगदी हेच घडले होते. एक माशी त्याच्या हाताला चावली. हाताला सूज येऊ लागली आणि त्याचे हात अधिकाधिक लाल-काळे होऊ लागले. पुजार्‍याने आणि पाटलीणबाईंनी त्याला डॉक्टरला बोलवायला सांगितले. एखादा साधा शल्यचिकित्सक बोलावणे त्यालासुद्धा चालणारे होते, पण ती मंडळी बुडापेस्टला तार करून विशेष‍ज्ञाला बोलावण्याचा आग्रह करत होती. डॉ. ब...

एक दिवस फुग्गोबाचा......

लेखकु म्हणे :             साबणाचे फुगे सर्वांनीच आपल्या लहानपणी उडवले असतील. तासनतास साबणाचे फुगे उडवण्यात घालवले असतील, आई-बाबांच्या शिव्या खाल्ल्या असतील. पण आपण फुगे बनवायला जे मिश्रण वापरतो त्याच्यावर कधी प्रयोग केलेत का तुम्ही ? तुम्ही त्या मिश्रणात कधी शाम्पू मिसळून बघितलाय ? दोन-तीन वेगवेगळे साबण वापरले तर कसे फुगे बनतील ? आपला फुगा किती काळ टिकायचा ? काही सेकंद फक्त ! किती मोठा असायचा ? काही सेमी फक्त ! हो ना ? पण एक मुलगा होता, होमर. त्याने ह्या मिश्रणावर प्रयोग केलेत आणि भला-थोरला फुगा फुगवला. त्याची ही कथा ! मूळ इंग्रजी कथा लिहिली आहे जेम्स ए. स्मिथ ह्यांनी. मूळ कथेचे नाव - "The Day of the Bubble ." त्या कथेचे हे मराठी भाषांतर. " ज्याने आशेचे बीज पेरले " या कथेप्रमाणे ही कथादेखील मी ७वी-८वीत असतांना हिंदीत वाचली होती. ( त्या वर्षी भरपूर छान - छान कथा वाचनात आल्या होत्या, सगळ्या हिंदी किंवा हिंदीत अनुवादित. ) हिंदी अनुवाद श्री. अरविंद गुप्ता सरांनीच केला होता.अर्थात मला आवडली होतीच. ही बाल-विज्ञानकथा आहे म्हटले तर...

ज्याने आशेचे बीज पेरले

एक फ्रेंच कथा आहे -  " L'homme qui plantait des arbres  " ( The  Man Who  Planted  Trees   ).   लेखक   आहेत - ज्योँ गिओनो .  ही  कथा मी लहानपणी साधारणतः ७ वी -८ वीत   असतांना हिंदीत वाचली होती. कथेचे नाव होते,  " जिसने उम्मीद के बीज बोये " , अनुवाद श्री. अरविंद गुप्ता ह्यांनी केला होता. ह्या कथेने मी तेव्हा प्रचंड प्रभावित झालो होतो. पुढे माहित झाले  की मीच नव्हे तर जगात शेकडो लोक ह्या कथेने प्रभावित झाले आहे, झाडे लावत सुटलेत. मी ह्या कथेचा मराठी अनुवाद करायचे तेव्हाच ठरवले होते, पण लहानपणी ठरवलेल्या सारयाच गोष्टी आपण अमलात आणत नाही ना ? पण ह्या कथेची जादूगारीच अशी की मी कधीच ही  कथा  विसरु शकलो नाही. डिसेम्बर, २०१० ला मी ही कथा  जालावर शोधली  आणि  अनुवाद करायला घेतले. प्रत्यक्ष अनुवादाला सुरुवा...