पोस्ट्स

rajinikanth's vrat लेबलसह पोस्ट दाखवत आहे

१२ रजनीचित्रपट व्रतकथा - प्रस्तावना

                                    ॥ श्री रजनीकांताय नमः ॥ आमच्या असे निदर्शनास आले आहे की, स्वामी संकेतानंद महाराजरचित या अद्भुत व्रताची महती बहुश्रुत असूनदेखील आणि लाखो भक्तांना याची प्रत्यक्ष अनुभूती आली असतांनादेखील कित्येक नास्तिक ह्या व्रताच्या सत्यतेवर शंका करतात. अशा नास्तिक व या भूलोकी राहण्यास अपात्र अशा मंडळींसाठी आम्ही या व्रताच्या १२ दिवसांच्या १२ कथा प्रकाशित करण्याचे योजिले आहे. ह्या कथा म्हणजे भाकडकथा नसून ज्या भक्तांनी हे व्रत यशस्वीपणे व पूर्ण श्रद्धेने केले त्यांनी स्वामी संकेतांनंदाना प्रत्यक्ष येऊन सांगितलेले अनुभव होत.     एका दिवसाला एक याप्रमाणे १२ दिवसांच्या व्रतकालावधीमधे ह्या कथांचे चित्रपट संपल्यावर देवाजींच्या पूर्णाकृती पोस्टरसमोर बसून आरतीअगोदर पठण करायचे आहे.उपस्थित इतर भाविकांनी श्रद्धापूर्वक श्रवण करावे.      पुढील पानापासून आम्ही कथा प्रकाशित करु.             ...

१२ रजनीचित्रपट व्रत-महात्म्य

                                               ॥ श्री रजनीकांताय नमः ॥          अभिनेताशिरोमणी, प्रातःस्मरणीय श्री रजनीकांतदेवजींच्या स्वामी संकेतानंद रचित अद्भुत व शिघ्रफलदायी अशा "१२ रजनीचित्रपट व्रताचे" महात्म्य वर्णनातित आहे. तरीही भक्तांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही आमच्या अल्पमतीप्रमाणे या व्रताचे महात्म्य वर्णन करण्याचे धारिष्ट्य करित आहोत.        भाविकांनी लक्षात घ्यावे की, येथे वर्णिलेले महात्म्य म्हणजे हिमनगाचे टोक होय. ह्या व्रताची यशस्वी सांगता केल्यावर तसेच ह्या व्रतकालावधीमध्येसुद्धा आपल्याला या दिव्य व्रताची अनुभूती येईलच. ती अनुभूती इथल्या वर्णनापेक्षा वेगळीसुद्धा असू शकते. तो देवाजींचा प्रसाद समजून ग्रहण करावा.          आता आम्ही स्वामी संकेतानंद महाराज आणि इतर भक्तांच्या निदर्शनास आलेले " १२ रजनीचित्रपट व्रत " महात्म्य वर्णित आहोत. भाविकांनी श्रध्दापूर्वक तो ...

"१२ रजनीचित्रपट व्रत" - विधी

प्रस्तावना : -        "१२ रजनीचित्रपट व्रत" हे रजनीकांतदेवांचे परमभक्त स्वामी संकेतानंद महाराज ह्यांच्या अनेक वर्षांच्या दिव्य साधनेचे फळ होय. हे व्रत अतिशय सिद्ध व तत्काळ परिणाम दाखवणारे आहे.हे व्रत श्रद्धेने पूर्ण केल्यास रजनीकांतदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या काही लीला करण्याची क्षमता सामान्य माणसात अंगी येते.        समस्त भूलोकीच्या मर्त्य मानवांना या व्रताचा लाभ व्हावा या उदात्त हेतूने ह्या व्रताची सम्पूर्ण विधी स्वामी संकेतानंद महाराज ह्यांनी प्रस्तुत अनुदिनीलेखकास सांगितलेली आहे. ह्या व्रताची अचूक व परिणामकारक विधी फ़क्त याच अनुदिनीवर असून भाविकांनी इतर खोट्या व्रत-अनुदिनींपासून सावध रहावे तसेच अनुदिनीस भेट देण्याआधी http://manmanjusha.blogspot.com या संकेतस्थळाची खात्री करुन घ्यावी. इतर अनुदिनींमधे सांगितलेली व्रत-विधी परिणामकारक नाही याची श्रद्धाळूंनी नोंद घ्यावी. तसेच हे व्रत कॉपीराइट केलेले असल्याने ह्या व्रताची नक्कल व चोरी करण्याचे पातक करु नये. रजनीकांतजी आपल्या गॉगलआडून सगळे बघत असल्याची चोरट्यांनी नोंद घ्यावी ...