पोस्ट्स

विनोदी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

विडंबन - या भवनातील शीत पुराणे

हे विडंबन देताना कोणाकोणाची माफ़ी मागावी कळले नाही.  या भवनातील शीत पुराणे रवाळ, कडवे खूप, पाजू द्या -  आज येथले सूप माजशक्तीची चाबुक गाथा खरा शूर हो नमवील माथा जुने सूप अन् जुने घराणे हवा नवा तो कूप --- स्वामी संकेतानंद नवी दिल्ली,  ३एप्रील , २०१४ 

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

हलवा माझे आवडते पक्वान आहे. तसे ते अनेकांचे आहे, पण माझे विशेष आहे. आता विशेष म्हणजे खास आहे. खास ह्या शब्दातच ’खा’ असल्याने हलवा जास्तच खाल्ला जातो. हलवा अनेक प्रकारचा असतो.मला गाजराचा जास्त आवडतो. तसा तो अनेक मोठ्या हिरोंना पण आवडतो. हिरोला त्याची आई खूप आवडत असते. मात्र हिरोची आई हलवा विशेष प्रसंगी बनवते. पण आमची आई कधीही हलवा बनवते, म्हणून मला माझी आई हिरोच्या आईपेक्षा जास्त आवडते. हलव्याचे दागिने बनतात. मला हलव्याचे दागिने आवडतात.आईला मात्र सोन्याचेच दागिने जास्त आवडतात. बाबांसाठी आईच एक दागिना आहे. ताईचे दागिने विचित्र असतात. संस्कृतच्या गुरुजींनी, ’लज्जा हा स्त्रीचा दागिना आहे’ ह्या अर्थाचे सुभाषित शिकवले होते. ’म्हणजे ’लज्जा’ हा तस्लिमा नसरीनचा पण दागिना आहे का गुरुजी?’ हा प्रश्न विचारल्याबद्दल मला बाकावर का उभे केले गेले ह्याचे उत्तर मात्र गुरुजींनी दिले नाही.मात्र तरीही मला गुरुजी आवडतात कारण संस्कृतमध्ये खूप मार्क मिळतात. मात्र गुरुजींना गणिताच्या अवचट बाई आवडतात.गणित मला नाही आवडत कारण बाई नेहमी ’समजा तुमच्याकडे १०० रुपये आहेत, दहा सफरचंदे आहेत’, असे म्हणत असते, पण प्रत्य...

पाडाडी- विडंबनासाठी कच्चा माल- भाग १

माझ्या काव्यरसिक मित्रहो, विसरलांत तर नाही ना ? प्रदीर्घ कालानंतर परत सार्वजनिक जीवनात येत आहे म्हणून विचारले. जे विसरले त्यांना माझी ओळख करून द्यावयाचा विचार आहे. तर मी कवी स.दा.हितकरे. हो, हो तेच ते कविता पाडण्याची रेसिपी लिहून ज्यांनी होतकरू नवकवींवर अनंत उपकार केले आहेत आणि ज्यांच्या कृपाप्रसादामुळे आज प्रत्येक दुसर्‍या व्यक्तीस कविता प्रसवू लागली आहे तेच ते काव्यभूषण, काव्यकलानिधी, काव्यकुसुमरत्नाकर, काव्यपंडित, काव्यशिरोमणी, काव्यसम्राट कवीश्रेष्ठ स.दा.हितकरे. तसे मला ह्या पदव्या नावापुढे जोडायला आवडत नाही,पण काव्यरसिक चाहत्यांनी इतक्या प्रेमाने हा बहुमान दिला आहे त्याचा अव्हेर करता येत नाही. आता माझ्या काव्यरसिक काव्यप्रेमींपुढे प्रश्न पडला असेल की मी अचानक असा अज्ञातवासात कसा गेलो आणि कसा प्रकटलो. मागील वर्षी एका काव्यसंमेलनात काव्यवाचन करत असतांना माझ्या काव्यतृषार्त श्रोत्यांनी मजवर जो ’प्रेमाचा वर्षाव’ केला त्याचा स्वीकार करून अज्ञातवासात जाण्याचे प्रयोजिले जेणेकरून माझ्या काव्यसाधनेस व्यत्यय येऊ नये. आज अचानक माझ्या सर्व काव्यरसिक काव्यप्रेमींच्या दारावर काकपक्षी कोक...

पुनर्जन्माचा प्रथम वर्धापनदिन

रास्कल* हो, माइंड इट  !!     वाढदिवस वगैरे ऐकले असतील, ही पुनर्जन्माच्या वाढदिवसाची काय भानगड आहे असा प्रश्न पडला असेलच. तर आजपासून बरोब्बर एक वर्षापूर्वी माझ्या मेलेल्या ब्लॉगने रजनीदेवाच्या कृपेने नवा जन्म घेतला.       तसा मी ब्लॉग सुरु केला होता १९ नोव्हेंबर ,२००९ ला. आरम्भशुराप्रमाणे २ लेख पटापट लिहिलेसुद्धा. पण तेव्हा रजनीदेवाची माझ्यावर कृपादृष्टी नसल्याने ब्लॉगचा अकाली मृत्यू झाला. मी फार चिंतीत होतो. मला काही सुचेनासे झाले होते. मग एके दिवशी मला आकाश गुप्ते भेटला. त्याने मला रजनीदेवाविषयी सांगितले. तेव्हापासून माझे जगच बदलले. तो म्हणाला तू रजनीकांत ची आरती लिही.बघ तुझे मराठी ब्लॉग विश्वात कसे नाव होईल. मग मी त्याच दिवशी रजनीदेवाची हिंदी आरती लिहिली आणि ब्लॉगवर टाकली. नतीजा बेहद चौंकानेवाला था. मला त्याचे लगेच परिणाम दिसले. बऱ्याच लोकांनी ती आरती सश्रद्ध वाचली. कमेंट्स आल्यात. हा रजनीनामाचा महिमा होता. आता रजनीदेवाच्या कृपेने दुसऱ्या दिवशी मराठी आरतीसुद्धा आली. ब्लॉग धावू लागला. पाठीराखे बनलेत. ब्लॉगचा नवा जन्म झाला होता. रजनीनामाचा महिमाच असा की...

विडंबन - सांग सांग भोलानाथ

कविवर्य श्री. मंगेश पाडगावकरांची मनापासून माफी मागून आणि ज्यांनी ही  कविता लिहिण्याची प्रेरणा दिली त्या सर्वांना मनसोक्त शिव्या घालून "सांग सांग भोलानाथ " ह्या आपल्या सर्वांच्या लाडक्या बालगीताचे आय टी कामगाराच्या " फ्रस्टेशनगीतात" विडंबन करतोय.  सांग सांग भोलानाथ, क्लाएंट चिडेल काय ? प्रोजेक्ट कचर्‍यात जाऊन, रिलीज मिळेल काय ? भोलानाथ मॅनेजर दया दाखवेल काय ? माझे काम स्वतः उरी घेईल काय ? भोलानाथ, भोलानाथ, खरे सांग एकदा  आयटीत डेडलाईन, पाळली जाते कितीदा ?  भोलानाथ उद्या आहे,क्लाएंन्टसोबत मिटींग.. सिक लीवची माझ्या, होईल का रे सेटिंग ? भोलानाथ भोलानाथ हाईक मिळेल काय ? ३५-४० टक्क्यांचा पाउस पडेल काय ? भोलानाथ माझ्या कॉम्प ऑफ्स देशील काय ? भोलानाथ मनासारखे काम मिळेल काय ? एक गरीब बिचारे पिडलेले कोकरू, आर्त, काळजाला पिळवटणार्‍या स्वरात भोलानाथला म्हणाले, " भोलानाथ पुण्याला, जायला मिळेल काय ?  भोलानाथ मॅनेजरचे, हृदय पाझरेल काय ? " आकाशवाणी झाली, " भगवान के घर...

विडंबन - नागपुरात

बंगळुरात  लिहून झाले .. आता नागपुरात .. प्रेरणास्रोत मागे  सांगितले आहेच, पुन्हा एकदा सांगतो >> आदी जोशीची " कोंकणात " ही  कविता..  ही कविता मी "बंगळुरात" च्या सुरातच लिहिली आहे. मुद्दाम नागपुरी मराठी वापरली आहे. आनंद घ्यावा..  नागपुरात   मोठ्ठाल्ले रस्ते.. ट्राफिकले हसते .. ढोरं बसते.. नागपुरात.. डी पी ची हिरवळ नागनाल्याचा चिखल उन्हाळ्यात तळमळ नागपुरात नागपुरीचा थाट हिंदी बम्बाट इंग्लिशलेबी वाट नागपुरात के सी पार्कचा पोहा पहाटे चारले चहा उधारीच वाहा नागपुरात माहोल पोट्टे रिकामचोट्टे संत्र्याचे कट्टे नागपुरात मिहानची भरारी लफडे भारी दिल्लीची वारी नागपुरात बी इ करी बेरोजगारी पुण्याची वारी नागपुरात मस्तीत चित्त पाहुणचार मस्त फॅमिली संग नागपुरात  -------------------------------------- बम्बाट = भरपूर . विदर्भात "बम किंवा  बम्बाट " हा शब्द बराच कॉमन आहे.. "अबे,बम मजा आली बे .." एकदम सहज निघणारा उद्गार ! माहोल = हा "भारी /लै भारी" चा समानार्थी..आणि इतरही अनेक अर्थ सुचवतो हा शब्द .. म्हणजे बघा ," क्या...

विडंबन - बंगळुरात

आदी जोशीच्या " कोंकणात " या  कवितेवरुन सुचलेले हे विडंबन ... होसुरची वाट ट्राफिक दाट डोक्याची वाट बंगळुरात फोरमची हिरवळ.. सुगंधी दरवळ     जीवाला कळ बंगळुरात गजर्‍याचा घमघमाट चोरांचा सुळसुळाट खिश्याला चाट बंगळुरात मराठीला काट हिंदीला लाथ कानडी बरसात बंगळुरात आय टी ची भरारी माणूस करारी एकटेपणा मारी बंगळुरात विचलित चित्त चित्त अतृप्त सावली संग बंगळुरात   ( " सुगंधी दरवळ "  इथे आधी  "ब्रिगेडरोडची वर्दळ " हा शब्द होता :) पण मी तो काढला.(कारण विचारू नये ..हेहे ) ही कविता आधी मीमराठी या संकेतस्थळावर प्रकाशित केली होती.तेथे वाचक म्हणाले ," यार बंगळूरावर कविता लिहितोयस आणि ब्रिगेड रोड मिसिंग ?? ".. तर मित्रांनो ,तुम्हाला योग्य ती ओळ वाचावी ;)  )

माउस पाहावे चोरून !

अभियांत्रिकीला येणार्‍या सगळ्याच विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान असतेच असे नाही. काही दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी कधी संगणक पाहिलादेखील नसतो. असाच एक दुर्गम भागातून आलेला मुलगा माझ्या शाखेत (c.tech ) होता. बेट्याने पहिल्यांदाच संगणक बघितलेला, वर त्याच्या दादाने त्याला वापरायला म्हणून ल्यापटॉप घेऊन दिला. आता मित्र जे सांगतील ते तो करायचा. एक म्हणाला, "अरे ल्यापटॉप खूप नाजूक असतो, कीबोर्ड आणि माउस लवकर बिघडतात. तू वेगळे कीबोर्ड-माउस घे." त्याचे रुमीज महाचोर वगैरे प्रकारातले होते. त्यांनी सल्ला दिला, " अरे आपण माउस कॉलेजातून आणूया. कीबोर्ड आणता येणार नाही म्हणून नाईलाज आहे. तो तू विकत घे." झालं, पठ्ठ्याने ह्या कामी माझी मदत घ्यायचे ठरवले, कारण मी त्याचा चांगला मित्र होतो. मी: अबे १५०-२०० येते  माउस, चल धंतोली,आणू आपण आताच. तो: अबे आपल्या ल्याबमधून कोणी-न-कोणी माउस चोरतच राहतो. काही मोठी गोष्ट नाही. कायले पैसे खर्च करू मी? उद्या आणू ल्याबमधून ढापून. आपण प्रॅक्टिकल संपले, सगळे गेले की एक माउस चोरू. मी: अबे, कोणी पाहिले तर वांदा होईल ना बे . तो:...

पाडाडी - कैपाक(कैच्याकै पाडलेली कविता)

     आम्ही यापूर्वी आपणांस यपाक व गपाक या दोन पाडकृती कृतीसकट दिलेल्या आहेत.तसेच यपाकपासून सायपाक कसे तयार करावे तेदेखील सांगितले.आता आम्ही ज्या पाडाडीची ओळख करून घेणार आहोत तिचे नाव आहे "कैपाक" म्हणजेच "कैच्याकै पाडलेली कविता" .      कैपाक हा तसा बर्‍यापैकी लोकप्रिय असलेला प्रकार आहे. कैपाक करण्यात अगदीच पारंगत असलेले एक कैपाडे म्हणजे " मन्नू चलिक" हे होत. आपल्या कैपाकाने ते सातत्याने श्रोत्यांचे मनोरंजन करत असतात. मात्र त्यांनी कैपाकाची ही दीक्षा आमच्याकडूनच घेतली आहे हे आम्ही नमूद करू इच्छितो. अजून दुसरे  कैपाडे म्हणजे मर्‍हाटी मुलुखात गाजत असलेले हास्य-द्रुतवाहनाचे कवीराज होत.हे आमच्या नकळतच कैपाक बनवत असल्याचे आमच्या ध्यानात आले आहे. कदाचित त्यामुळेच त्यांचे कैपाक तितकेसे प्रभावी नसतात.त्यामुळे तुम्हालादेखील कैपाडे बनावयाचे असल्यास आमच्याकडे दीक्षा घेणेच योग्य ठरेल.    कैपाक ही यपाकचेच छेटे रूप आहे. इथेसुद्धा यमकाचे नियम कटाक्षाने पाळावे लागतात. मात्र यपाक आणि कैपाकमधे काही मूलभूत फ़रक आहेत. १. कैपाक ही कितीही ओळींची, कुठल्याही विष...

पाडाडी - कविता कशा पाडाव्या ??

       "पाडकृती" किंवा ज्याला सामान्यजन "पाडाडी" म्हणतात अशा वर्गीकृत केलेले अनेक जिन्नस आहेत .बुंदी पाडणे, विटा पाडणे, मुख्यमंत्री पाडणे, मंत्री पाडणे,आमदार- खासदार पाडणे,सरकार पाडणे, प्रेमात पाडणे , ब्लॉ ग पाडणे,लेख पाडणे, शब्द पाडणे(ही कृती आमचे  मित्र श्री. सत्यवान वटवटे उत्कृष्ट पाडतात. ते सातत्याने नवीन शब्द पाडत असतात.उदाहरणांसाठी त्यांचा  ब्लॉ ग तपासावा. ) अशा अनेक पाडाडी लोकप्रिय आहेत.पण कविता पाडणे ही नाविन्यपूर्ण पाडकृती आम्ही सर्वप्रथम निर्मिली. आमच्या स्नेह्यांना आम्ही ही पाडकृती चाखायला दिल्यावर अनेकांना प्रचंड आवडली. त्यांपैकी एक स्नेही कवी ता. पाडे यांना आम्ही त्याची कृतीही लिहून दिली.मग त्यांनी कविता पाडण्याचा स्वतंत्र व्यवसाय चालू केला जो छान चालतही आहे.त्यांच्या या व्यवसायाला आमच्या शुभेच्छादेखील आहेत.      मात्र कविता पाडण्याचा मक्ता आमच्याकडेच आहे आणि ते trade secrete आम्ही कुणाला देणार नाही अशी एक भावना त्यांच्यात बळावत आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे. तसेच आमच्या पाडलेल्या कविता सर्वोत्कृष्ट अ...

एक पाडलेली कविता-बाबा बोंगाळे महात्म्य !

आता या ६ तारखेला, जाम बोर मारत होतं.मग सौरभला पिंग टाकली. त्याला  सहजच म्हटले ," एखादा विषय सुचव, मग त्यावर मी कविता पाडतो. " पठ्ठ्याने विषय सुचवला " सौरभ महात्म्य !" हा स्वतःची महती वाचायला उत्सुक होता तर !! मी विचार केला, "कविता तर "पाडायचीच" आहे, मग विषयाचे काय tension घ्यायचे ! यमकाला यमक जुळवून पाडायला सुरुवात करू या की ! तसेही  उसाच्या I .T . मळ्यात काम करणारया आपल्या या मित्राबद्दल चार ओळी खरडायचे मनी होतेच. मग काय, लागलो आम्ही  कविता पाडायला!!!(हा शब्द आला की मला उगाचच एका "सुगंधी पार्श्वक्रियेची" आठवण येते.)१२ मिनटात कविता टायपून तयार !!! इशारा :-    १. ही कविता निखळ मनोरंजनाच्या हेतूने जाणीवपूर्वक "पाडलेली" आहे, उगाचच साहित्यिक मूल्य वगैरे शोधण्याच्या भानगडीत पडू नये. २ .इथे व्यक्त केलेल्या मताशी कवी सहमत असेलच असे नाही. इथे ओळी फक्त पाडल्या आहेत, कवीच्या भावना,मत वगैरे संवेदनशील गोष्टींना यात थारा नाही. ३. ही कविता सौरभच्या अनुमतीने प्रकाशित करण्यात येत आहे. चारित्र्यहनन वगैरे झाले म्हणून सौरभच्या वतीने स...