विडंबन - सांग सांग भोलानाथ

कविवर्य श्री. मंगेश पाडगावकरांची मनापासून माफी मागून आणि ज्यांनी ही  कविता लिहिण्याची प्रेरणा दिली त्या सर्वांना मनसोक्त शिव्या घालून "सांग सांग भोलानाथ " ह्या आपल्या सर्वांच्या लाडक्या बालगीताचे आय टी कामगाराच्या " फ्रस्टेशनगीतात" विडंबन करतोय. सांग सांग भोलानाथ, क्लाएंट चिडेल काय ?
प्रोजेक्ट कचर्‍यात जाऊन, रिलीज मिळेल काय ?


भोलानाथ मॅनेजर दया दाखवेल काय ?
माझे काम स्वतः उरी घेईल काय ?


भोलानाथ, भोलानाथ, खरे सांग एकदा 
आयटीत डेडलाईन, पाळली जाते कितीदा ? 


भोलानाथ उद्या आहे,क्लाएंन्टसोबत मिटींग..
सिक लीवची माझ्या, होईल का रे सेटिंग ?


भोलानाथ भोलानाथ हाईक मिळेल काय ?
३५-४० टक्क्यांचा पाउस पडेल काय ?


भोलानाथ माझ्या कॉम्प ऑफ्स देशील काय ?
भोलानाथ मनासारखे काम मिळेल काय ?
एक गरीब बिचारे पिडलेले कोकरू, आर्त, काळजाला पिळवटणार्‍या स्वरात भोलानाथला म्हणाले,

" भोलानाथ पुण्याला, जायला मिळेल काय ?
 भोलानाथ मॅनेजरचे, हृदय पाझरेल काय ? "


आकाशवाणी झाली,

" भगवान के घर देर हैं, अंधेर नही..
  लेकिन तेरा केस भगवान के पास नहीं.. "
१२ टिप्पण्या:

 1. ऑफिस खूप मनावर घेतलं आहे तुम्ही स्वामी...

  काळजी घ्या :) :)

  उत्तर द्याहटवा
 2. सुझे,
  काळजी घेतोय रे.. शक्य तितके वर्च्युअल जगतोय. :) :) तेवढाच दिलासा !!

  उत्तर द्याहटवा
 3. स्वामी, तात्पर्य एकच.. बॉस/क्लायंट हा बैल असतो ;)

  उत्तर द्याहटवा
 4. हेरंब :) :)
  बैल असतो ++ >> बैलासारखी ताकद , बैलासारखीच शिंगे मारत चाल करेल, बैलाएवढेच डोके.. आणि सोबतीला " बैल जैसी ताकद के साथ बैल जैसी जिम्मेदारी भी आती है " हे पालुपद !!! :D :D

  उत्तर द्याहटवा
 5. काका , धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत !!

  उत्तर द्याहटवा
 6. स्वामी विडंबन एकदम झक्कास जमलय...भापो.. काळजी घ्यावी ...

  उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More