विडंबन - सांग सांग भोलानाथ
कविवर्य श्री. मंगेश पाडगावकरांची मनापासून माफी मागून आणि ज्यांनी ही कविता लिहिण्याची प्रेरणा दिली त्या सर्वांना मनसोक्त शिव्या घालून "सांग सांग भोलानाथ " ह्या आपल्या सर्वांच्या लाडक्या बालगीताचे आय टी कामगाराच्या " फ्रस्टेशनगीतात" विडंबन करतोय.
सांग सांग भोलानाथ, क्लाएंट चिडेल काय ?
सांग सांग भोलानाथ, क्लाएंट चिडेल काय ?
प्रोजेक्ट कचर्यात जाऊन, रिलीज मिळेल काय ?
भोलानाथ मॅनेजर दया दाखवेल काय ?
माझे काम स्वतः उरी घेईल काय ?
भोलानाथ, भोलानाथ, खरे सांग एकदा
आयटीत डेडलाईन, पाळली जाते कितीदा ?
भोलानाथ उद्या आहे,क्लाएंन्टसोबत मिटींग..
सिक लीवची माझ्या, होईल का रे सेटिंग ?
भोलानाथ भोलानाथ हाईक मिळेल काय ?
३५-४० टक्क्यांचा पाउस पडेल काय ?
भोलानाथ माझ्या कॉम्प ऑफ्स देशील काय ?
भोलानाथ मनासारखे काम मिळेल काय ?
एक गरीब बिचारे पिडलेले कोकरू, आर्त, काळजाला पिळवटणार्या स्वरात भोलानाथला म्हणाले,
" भोलानाथ पुण्याला, जायला मिळेल काय ?
भोलानाथ मॅनेजरचे, हृदय पाझरेल काय ? "
आकाशवाणी झाली,
" भगवान के घर देर हैं, अंधेर नही..
लेकिन तेरा केस भगवान के पास नहीं.. "
ऑफिस खूप मनावर घेतलं आहे तुम्ही स्वामी...
उत्तर द्याहटवाकाळजी घ्या :) :)
सुझे,
उत्तर द्याहटवाकाळजी घेतोय रे.. शक्य तितके वर्च्युअल जगतोय. :) :) तेवढाच दिलासा !!
स्वामी, तात्पर्य एकच.. बॉस/क्लायंट हा बैल असतो ;)
उत्तर द्याहटवाGood one.. mast lihili ahe.
उत्तर द्याहटवाSuper Like!
उत्तर द्याहटवाहेरंब :) :)
उत्तर द्याहटवाबैल असतो ++ >> बैलासारखी ताकद , बैलासारखीच शिंगे मारत चाल करेल, बैलाएवढेच डोके.. आणि सोबतीला " बैल जैसी ताकद के साथ बैल जैसी जिम्मेदारी भी आती है " हे पालुपद !!! :D :D
काका , धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत !!
उत्तर द्याहटवाश्रियाताई , सुपरधन्यवाद !! :)
उत्तर द्याहटवास्वामी विडंबन एकदम झक्कास जमलय...भापो.. काळजी घ्यावी ...
उत्तर द्याहटवाधन्स देवेन... काळजी घेतोय.
उत्तर द्याहटवाखूपच चान वाचून मजा आली
उत्तर द्याहटवाधन्यवाद !ब्लॉगवर स्वागत आहे..
हटवा