पोस्ट्स

लेख लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एक ऐतिहासिक विजय

एप्रिलमध्ये लिहीलेला हा लेख आता इथे प्रकाशित करतोय. बातमी एव्हाना अगदीच शिळी झाली आहे,  पण त्याला इलाज नाही.  :D  ---संकेत  --------------------------------------------------------------------         २७ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारतासह आग्नेय आशियाला पोलियो मुक्त जाहीर केले व यासोबतच भारताने दरवर्षी हजारो मुलांना पंगू करणार्‍या एका भयावह रोगावर सुमारे २० वर्षे चाललेल्या लढ्यात एक ऐतिहासिक विजय मिळवला. जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया गटातली इतर राष्ट्रे पोलियो मुक्त झालेली असताना भारतामुळे आग्नेय आशिया गटाला अद्याप प्रमाणपत्र जाहीर झाले नव्हते. भारत पोलियो मुक्त करणे हे सर्वात मोठे आव्हान मानले जात होते.             भारताने पोलियो लसीकरण मोहीम हाती घेण्यापूर्वी दरवर्षी हजारो मुले पोलियो ग्रस्त होत, कायमची लुळीपांगळी होत किंवा मृत्यूमुखी पडत. आरोग्याच्या पुरेशा सोयींचा अभाव, दुर्गम वस्त्या, रोजगारासाठी स्थलांतर करणारी कुटुंबे, लसीकरणा विषयीचे गैरसमज अशी अनेक गंभीर आव्हाने भारतापुढे होती....

बोलीले जित्ता ठेवा, मराठीले जित्ता ठेवा

मराठी भासेची खासबात काये जी ? असा तुमाले कोनी विचारलनच तं सांगजाल का इच्या बोल्या ! अजी एखाद्या भासेच्या ४२ बोल्या मंजे तुमाले मज्याक वाट्ते का जी ? असी बोल्याइच्या बारेत अमीर भासा मराठीच आये, हिंदी बी नसे अना बंगाली-तमिल-तेलुगु बी नसे. मंग आप्ल्याले अभिमान पायजे का नाई ? अखिन बोल्याइमंदी बी पोटबोल्या आयेतंच.. आता आमच्या झाड़ीबोलीचाच घ्या ना जी. म्हनावाले गेला तं इनमिन ४ जिल्ल्यात बोलतंत, पर असी अमीरी आये भाऊ का , का सांगू तुमाले. भंडार्‍याची(  मराठीतला पयला ग्रंथ, ’विवेकसिंधु’ मुकुंदराजाने भंडार्‍यातच ’आंभोरा’ गावी संगामावरच्या पहाडीवर बसून लिखला. ) अलग, गोंदियाची अलग ,चंद्रपुराची अलग अन गड़चिरोलीची अलग. पर आये झाड़ीबोलीच. तेच मिठास; जरा सब्द अलग, जरा बोलाचा ढंग अलग आये तं का झाला ? पर काही कम-अकलीच्या मानसाइले वाट्ते का झाड़ीबोली मतलब गावठी लोकायची बोली. मराठीत लमड़ीचे हिंदी घुसाडून बोलतंत. मंग आमाले बी वाटत रायला का हंव भाऊ, हे सिकले-सवरले सयरातले लोकं मन्तेत तं सहीच बात असंल. मंग आमी बी कायले झाड़ी बोल्तो जी ? ते घरी अना दोस्तभाइसंगच बोलावाले वापरतो. पुन्यात गेलो तं आमची अखी...