पोस्ट्स

मन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मन वढाय वढाय...

बहिणाबाईंनी किती समर्पक शब्दांत मनाचे वर्णन केलंय..     मन वढाय वढाय     उभ्या पिकातलं ढोर     किती हाकला हाकला     फिरी येतं पिकावर     मन मोकाट मोकाट     याच्या ठाई ठाई वाटा     जशा वार्‍य़ानं चालल्या     पान्यावरल्या रे लाटा (तमिळ कवी ऊदक्कडु वेंकटसुब्रमण्य अय्यर यांनीसुद्धा मनाला लाटांची उपमा दिलीय.. अलईपायूदे, कण्णा, एन मनम अलईपायूदे . ( माझे मन उचंबळणार्‍या लाटांप्रमाणे आहे.)     मन एवढं एवढं     जसा खाकसंचा दाना     मन केवढं केवढं ?     आभायात बी मायेना     मन नेमके असते कुठे हो? मेंदुच्या कुठल्यातरी कोपर्‍यात दडून बसलेलं ?? आणि क्षणभरही तिथं न थांबणारं !! मेंदू म्हणजे सतत विचार करणारी यंत्रणा. तरीसुद्धा आपण म्हणत असतो, "मी विचार नाही केला... मनात आलं ते केलं. " आणि हा पठ्ठा मन तर मेंदुतच लपून बसलेला!!     मनाचे प्रकार किती ??... चेतन, अवचेतन, अर्धचेत...