एक पाडलेली कविता-बाबा बोंगाळे महात्म्य !
आता या ६ तारखेला, जाम बोर मारत होतं.मग सौरभला पिंग टाकली. त्याला सहजच म्हटले ," एखादा विषय सुचव, मग त्यावर मी कविता पाडतो. " पठ्ठ्याने विषय सुचवला " सौरभ महात्म्य !" हा स्वतःची महती वाचायला उत्सुक होता तर !! मी विचार केला, "कविता तर "पाडायचीच" आहे, मग विषयाचे काय tension घ्यायचे ! यमकाला यमक जुळवून पाडायला सुरुवात करू या की ! तसेही उसाच्या I .T . मळ्यात काम करणारया आपल्या या मित्राबद्दल चार ओळी खरडायचे मनी होतेच. मग काय, लागलो आम्ही कविता पाडायला!!!(हा शब्द आला की मला उगाचच एका "सुगंधी पार्श्वक्रियेची" आठवण येते.)१२ मिनटात कविता टायपून तयार !!! इशारा :- १. ही कविता निखळ मनोरंजनाच्या हेतूने जाणीवपूर्वक "पाडलेली" आहे, उगाचच साहित्यिक मूल्य वगैरे शोधण्याच्या भानगडीत पडू नये. २ .इथे व्यक्त केलेल्या मताशी कवी सहमत असेलच असे नाही. इथे ओळी फक्त पाडल्या आहेत, कवीच्या भावना,मत वगैरे संवेदनशील गोष्टींना यात थारा नाही. ३. ही कविता सौरभच्या अनुमतीने प्रकाशित करण्यात येत आहे. चारित्र्यहनन वगैरे झाले म्हणून सौरभच्या वतीने स...