एक पाडलेली कविता-बाबा बोंगाळे महात्म्य !

आता या ६ तारखेला, जाम बोर मारत होतं.मग सौरभला पिंग टाकली. त्याला  सहजच म्हटले ," एखादा विषय सुचव, मग त्यावर मी कविता पाडतो. " पठ्ठ्याने विषय सुचवला " सौरभ महात्म्य !" हा स्वतःची महती वाचायला उत्सुक होता तर !! मी विचार केला, "कविता तर "पाडायचीच" आहे, मग विषयाचे काय tension घ्यायचे ! यमकाला यमक जुळवून पाडायला सुरुवात करू या की ! तसेही  उसाच्या I .T . मळ्यात काम करणारया आपल्या या मित्राबद्दल चार ओळी खरडायचे मनी होतेच. मग काय, लागलो आम्ही  कविता पाडायला!!!(हा शब्द आला की मला उगाचच एका "सुगंधी पार्श्वक्रियेची" आठवण येते.)१२ मिनटात कविता टायपून तयार !!!

इशारा :-
 
 १. ही कविता निखळ मनोरंजनाच्या हेतूने जाणीवपूर्वक "पाडलेली" आहे, उगाचच साहित्यिक मूल्य वगैरे शोधण्याच्या भानगडीत पडू नये.
२ .इथे व्यक्त केलेल्या मताशी कवी सहमत असेलच असे नाही. इथे ओळी फक्त पाडल्या आहेत, कवीच्या भावना,मत वगैरे संवेदनशील गोष्टींना यात थारा नाही.
३. ही कविता सौरभच्या अनुमतीने प्रकाशित करण्यात येत आहे. चारित्र्यहनन वगैरे झाले म्हणून सौरभच्या वतीने स्वतःच अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा दीडशाहाणपणा करू नये. सौरभला हरकत नाही तर मग तुम्हाला कशाला असायला पाहिजे.    कुठेतरी, कुणाचेतरी  हरवलेले  निरागस  पोर ....  घाबरतो  समोर  दिसताच  भलामोठा  ढोर....
आर्त  स्वर  त्याचा  ऐकुनी , "बाबा , बाबा " ....धावत  येतो  तोची  बोंगाळे  बाबा ||१||

  कुठे  अडकलेली  शोडशवर्षी  ललना ..  गावगुंडांनी  त्रस्त  ती , कुणी  तिची  मदत  करेना ... करते  ती  धावा, "ये  ये  दादा " ..   धावत  येतो  तोची  बोंगाळे   बाबा ||२||
  काय  लीला  वर्णू  मी  ती  ..  आणि  गावी  किती  महती ..  सर्व  कुमारींचा  दादा  अन  सर्व  अनाथ  बालकांचा  बाबा ..  सद्गुणाची  खाण  तोची  बोंगाळे  बाबा ||३||
  माचाफुकोचा  दोस्त  तो  ...  बघा  कसा  दात  काढून  हसतो ..  मौक्तिकपंक्ती  विको  वज्रदंती  ची  आठवण  देती ..... आणि  झुळूक  श्वासाची  डास -चिलटे  मारती ||४||
  
 महात्म्य  जयाचे  सरता  सरेना ....  वर्णन्यास्तव  आता  शब्द  उरेना .... गावे  जयाचे  स्तोत्र  निशिदिनी, काशी ते काबा ..  स्वामी बाबाकांत  तोची सौरभ बोंगाळे  बाबा  ||५||


जाहिरात :- 
                         कवी  ता. पाडे & सन्स कवितावाले
       (उत्कृष्ट पाडलेल्या कविता अगदी वाजवी दरात, ताबडतोब मिळण्याची एकमात्र जागा  !! )

इथे मागणीप्रमाणे कविता पाडून मिळेल. वैयक्तिक, वैश्विक, सामाजिक, असामाजिक, आर्थिक,पारमार्थिक, वैज्ञानिक, आध्यात्मिक,   मार्क्सवादी, भांडवलवादी , डाव्या, उजव्या, भगव्या, लाल, हिरव्या, निळ्या सर्व प्रकारच्या कविता पाडून मिळतील, तत्काळ सेवेची हमी. 

सुचना :-
 
१. प्रत्येक कविता पाडण्याचे दर निश्चित आहेत. घासाघीस करण्याचा चिकटपणा करू नका.उगाचच  वेळ खाऊ नका. आमचा वेळ अमूल्य आहे, तुमचा नसला तरी !
२. सांगितलेल्या वेळेतच कविता मिळेल. आधीच कविता मागण्याची घाई करू नका. आम्हाला रिकामटेकडे समजू नका. कामं आम्हालाही असतात, फक्त तुम्हालाच नाही.
४. एकदा पाडलेली कविता परत घेतली जाणार नाही. तेव्हा विचार करून order द्या. देवाने डोके विचार करण्यासाठी दिले आहे,धडावर शोभून दिसते म्हणून नव्हे.
५. आमची शाखा कुठेही नाही.
 ६. सकाळी १० - ६  या वेळेत कविता पाडण्याची order स्वीकारली जाणार नाही.

                                                                    -- प्रोप्रा. कवी ता. पाडे

१२ टिप्पण्या:

 1. >>सर्व कुमारींचा दादा अन सर्व अनाथ बालकांचा बाबा
  आणि
  >>गावे जयाचे स्तोत्र निशिदिनी, काशी ते काबा
  ह्या दोन खुनी (किलर) ओळी आहेत!
  :D:D:D

  उत्तर द्याहटवा
 2. suparfast प्रतिक्रियेसाठी हज्जार धन्स रे विभिदा !!! विद्याधरबाबावर एखादी कविता पाडायची आहे का? तुझ्यासाठी विनामूल्य सेवा देईन !!

  उत्तर द्याहटवा
 3. अनघाताई, स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार !! सौरभने "आ बैल मुझे मार" म्हटले खरं तर !!

  उत्तर द्याहटवा
 4. >> सर्व कुमारींचा दादा !!!!!!!

  अरारारा.. लय वंगाळ झालं बघा सौरभभौ... आणि याबद्दल कवी ता. पाड्यांचा झा ई र्र णी शे ढ (समदे इशारे वाचले असले तरी बी) ;)

  उत्तर द्याहटवा
 5. 'बोर मारत होतं', 'पिंग टाकली', 'कविता पाडतो'... हर हर हर... अरे परमेश्वरा, काय हे मराठीचे धिंडवडे! अरे मुला, जरा व्याकरणाच्या नियमांना अनुसरून लिखाण कर की! अरे काय ही तुझी मराठी! अरे अश्या भाषेत लिहून तू चुकीच्या मराठीचा प्रसार करत आहेस रे, कसं कळत नाही तुला? शंभूमहादेवा, आज या मुलाच्या आणि त्याच्या लिखाणाच्या नावाने आंघोळ करावी लागणार आहे असं दिसतंय.

  उत्तर द्याहटवा
 6. नाही नाही नाही!!! स्वामी संकेतानंद मी तुझ्यावर सूसू करणार... i mean sue करणार. चारित्र्यहननाचा दावा ठोकणार. (त्याशिवाय का रे स्वामी म्हणुन कोणी तुला मान देईल?? :P)
  (कुजबुजकुजखुसफुसखुस) ठिक आहे. रजनीदेवांचा आदेश म्हणुन आम्ही माफ करतो. :D ;)
  १२ मिनिटात तुम्ही आमचे महात्म्य लिहले (१२ तारखेला रजनीजयंती असते. १२चा अगाध महिमा!!!) आम्ही धन्य जाहलो.
  झुळुक श्वासाची डास-चिलटे मारती!!! बाप्पा, इकडे आम्ही ठार हसलो.
  सुचना क्र. ४ हैदोस आहे. डोके विचार करण्यासाठी दिले आहे, धडावर शोभुन दिसते म्हणून नव्हे... हाsssहाsssहाsss अस्सल पुणेरी पद्धतीने थोबाडलय. =)) :))

  आणि "महामहोपाध्याय सुर्यभद्रेश्वरानंद कुंचिकुरकुंडहळ्ळीकर" (हा हा हा क्षमस्व, पण) हे नाव घेताघेता माझ्या जिभेने हाय खाल्ली हो. कसलं भारी नाव आहे!!! :))

  उत्तर द्याहटवा
 7. हो, खरंच केवढं मोठं नाव आहे! कोण आहे हा माणूस? ;-)

  उत्तर द्याहटवा
 8. @Saurabhda:-
  अरे तू सु न करण्याचे वचन दिले म्हणून आम्ही इथे लिहिले, दिलेल्या शब्दाला जागा हो !!
  तू मनावर घेतले नाहीस, एक गम्मत म्हणूनच बघितले याबद्दल अगदी मनाच्या तळापासून आभार्स रे!!
  १२ तारखेच महिमाच अगाध आहे. आमचा प्रकटदिनही १२ तारखेचाच !!

  उत्तर द्याहटवा
 9. संकेतदादा , तू खूपच खट्याळ होताहेस दिवसेंदिवस !!! आभार्स !!

  उत्तर द्याहटवा
 10. सू न करण्याचं वचन दिलं??? हाऽऽऽऽऽहाऽऽऽऽऽहाऽऽऽऽऽ..... कसली कसली वचनं देतोस रे सौरभ??

  उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More