पोस्ट्स

नोव्हेंबर, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

द ग्रीन फ़्लाय

            तो म्हातारा शेतकरी गावातला सर्वात श्रीमंत माणूस, अगदी आजारी, मृत्युच्या दारी उभा होता.देवाच्या दरबारी त्याचा न्यायनिवाडा केला जात होता, त्याच्याकडे बोट दाखवून देवाने सार्‍या मानवजातीला उदाहरण दिले : " जॉन गॅलकडे बघा. तुम्ही मर्त्य जीव समजता काय स्वतःला ? तुम्ही खिजगणतीलासुद्धा नाहीत. आता, जॉन गॅल खरंच कोणीतरी आहे. जिल्ह्याचा न्यायाधीशसुद्धा त्याची भेट घेतो वेळप्रसंगी. गावच्या पाटलीणबाई येतात आणि त्याची भेट घेतात. तो सर्वाधिक श्रीमंत माणूस आहे.तरी मी त्याच्यावर आघात करू शकतो.त्यासाठी मला एखादा भुकेला लांडगा पाठवायची गरज नाही की, एखादा मोठा देवदार त्याच्यावर पाडून त्याला चिरडून टाकायची पण गरज नाही. एक छोटी माशी पुरेशी आहे. " अगदी हेच घडले होते. एक माशी त्याच्या हाताला चावली. हाताला सूज येऊ लागली आणि त्याचे हात अधिकाधिक लाल-काळे होऊ लागले. पुजार्‍याने आणि पाटलीणबाईंनी त्याला डॉक्टरला बोलवायला सांगितले. एखादा साधा शल्यचिकित्सक बोलावणे त्यालासुद्धा चालणारे होते, पण ती मंडळी बुडापेस्टला तार करून विशेष‍ज्ञाला बोलावण्याचा आग्रह करत होती. डॉ. बिर्लींची निवड झाली.