पोस्ट्स

The man who planted trees marathi translation लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ज्याने आशेचे बीज पेरले

एक फ्रेंच कथा आहे -  " L'homme qui plantait des arbres  " ( The  Man Who  Planted  Trees   ).   लेखक   आहेत - ज्योँ गिओनो .  ही  कथा मी लहानपणी साधारणतः ७ वी -८ वीत   असतांना हिंदीत वाचली होती. कथेचे नाव होते,  " जिसने उम्मीद के बीज बोये " , अनुवाद श्री. अरविंद गुप्ता ह्यांनी केला होता. ह्या कथेने मी तेव्हा प्रचंड प्रभावित झालो होतो. पुढे माहित झाले  की मीच नव्हे तर जगात शेकडो लोक ह्या कथेने प्रभावित झाले आहे, झाडे लावत सुटलेत. मी ह्या कथेचा मराठी अनुवाद करायचे तेव्हाच ठरवले होते, पण लहानपणी ठरवलेल्या सारयाच गोष्टी आपण अमलात आणत नाही ना ? पण ह्या कथेची जादूगारीच अशी की मी कधीच ही  कथा  विसरु शकलो नाही. डिसेम्बर, २०१० ला मी ही कथा  जालावर शोधली  आणि  अनुवाद करायला घेतले. प्रत्यक्ष अनुवादाला सुरुवा...