पोस्ट्स

marathi ghazal लेबलसह पोस्ट दाखवत आहे

चेहरे

आश्वासनास भुलले चेहरे काळोख पीत निजले चेहरे हातात आंधळ्यांच्या, बंदुका.. रक्तात हाय, भिजले चेहरे! त्यांची नज़र ढगांना बोचली अन् वावरात रडले चेहरे मी कळवळून गातो मर्सिया अन् दाद देत बसले चेहरे लिहतोस तू कुणासाठी गझल त्यांचे कधीच थिजले चेहरे -- संकेत, नवी दिल्ली,  ३० ऑगस्ट , २०१५  -------------------------------------------------- आणि जाताजाता ग़ालिबच्या एका शेराचा अनुवाद:- सगळेच काय दडले चेहरे? काही फुलांत दिसले चेहरे मातीत काय शोधीशी अता? झाले विलीन, लपले चेहरे मूळ शेर :- सब कहाँ, कुछ लाल:-ओ-गुल में नुमायाँ हो गईं ख़ाक में क्या सूरतें होंगी, कि पिन्हाँ हो गई -- नवी दिल्ली, १९ ऑगस्ट,२०१५ 

मजला कळले नाही

पाप पुण्यात घोळ केला, मजला कळले नाही हाय हिशोब का चुकावा, मजला कळले नाही आज अशी अबोल वीणा, मलहार असा वेडा सूर कसे संपास गेले, मजला कळले नाही मी जपले सखे मनाला, धुंद रात जरी होती हा गजरा इथे कसा गे, मजला कळले नाही सात जन्मांचि गाठ होती , पहिला सरला नाही हात असा कसा कसा सुटावा, मजला कळले नाही दोनच थेंब हो रक्ताचे , तलवार असे हाती हा कसला असे पुरावा, मजला कळले नाही    मी मराठी या संकेतस्थळावर   पूर्वप्रकाशित दुवा :- http://www.mimarathi.net/node/6094

केला होता करार जरी

केला होता  करार जरी मी, नियतीने कधीच पाळला नाही रात्रच अशी भयाण काळी होती, सूर्य देखील उगवला नाही दिवस नवा उजाडता, फक्त स्वप्नांचीच लक्तरे ढगांनीच नेहमी बरसावे, नियम बनला नाही हातावरच्या रेषा माझ्या,वळत्या हो कुणी केल्या मार्ग असा नागमोडी,सावलीपण सोबतीला नाही अस्वस्थ मनाचे हुंदके, सरणावरच अखेर थांबले अस्थी गोळा करायला, कुणीच कसा थांबला नाही पापण्या मिटल्या म्हणे, फक्त स्वप्नांच्याच ओझ्याने पण सूर्य निजलेला दिवसा, मला कधीच दिसला नाही