केला होता करार जरी

केला होता  करार जरी मी, नियतीने कधीच पाळला नाही
रात्रच अशी भयाण काळी होती, सूर्य देखील उगवला नाही

दिवस नवा उजाडता, फक्त स्वप्नांचीच लक्तरे
ढगांनीच नेहमी बरसावे, नियम बनला नाही

हातावरच्या रेषा माझ्या,वळत्या हो कुणी केल्या
मार्ग असा नागमोडी,सावलीपण सोबतीला नाही

अस्वस्थ मनाचे हुंदके, सरणावरच अखेर थांबले
अस्थी गोळा करायला, कुणीच कसा थांबला नाही

पापण्या मिटल्या म्हणे, फक्त स्वप्नांच्याच ओझ्याने
पण सूर्य निजलेला दिवसा, मला कधीच दिसला नाही

५ टिप्पण्या:

  1. मस्त रे.... कविता करण्यातही तु एकदम निपुन आहेस....

    उत्तर द्याहटवा
  2. धन्स रे सौरभ !!! असाच आशीर्वाद राहू दे पाठीशी !! :-D

    उत्तर द्याहटवा
  3. देवेनदा, धन्स !!!! निपुण वगैरे नाही रे, खरडतो सहजच चार ओळी !!! आणि "निपुन" पण धावेल.. "मिट्टी की खूशबू" काय म्हणतात ती येते रे !!

    उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More