१२ रजनीचित्रपट व्रतकथा - २
जुनी गोष्ट आहे. एक आटपाट नगर होते.लुंगीनगर त्याचे नाव.त्या नगरात एक बस वाहक राहायचा. सगळे त्याला चिदूअण्णा म्हणायचे. खाकी सदरा, खाली पांढरी शुभ्र सुती लुंगी, गळ्यात बांधलेला लाल रुमाल, डोळ्यांवर चढवलेला काळा गॉगल ही त्याची वेशभुषा होती.तो रजनीदेवाचा भक्त होता. तो त्याच्या व्यवसायात आनंदी होता. पण त्याला सुटे पैसे परत मागणार्या प्रवाशांचा फार त्रास होता.त्यांच्यासोबत वाद घालतांना प्रकरण कसे निस्तरावे कळेनासे झाले होते. त्याचा हिशोब बरोबर लागत नसे. सुट्या पैशांची कमतरता त्याला हैरान करी. प्रवासी पण त्याचे ऎकेनात. एके दिवशी त्याला एका सहकार्याकडून "१२ रजनीचित्रपट व्रताची" माहिती झाली. सहकार्याने सांगितले की, हा व्रत केल्यास तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मग त्याने व्रताची विधी समजावून सांगितली. सोबतच त्याला एक चेतावनी दिली की, हा व्रत मनोभावे पूर्ण कर, देवाजींना विसरू नकोस. " उतू नको, मातू नको, घेतलेली dvd टाकू नको. " इतके बोलून सहकारी आपल्या मार्गाला लागला. चिदूअण्णाने ठरवले की, आपण हा व्रत करायचा. १२ जुलै ला त्याने व्रताला प्रारंभ केला. तो