पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

इमेज
पृथ्वीची तिरडी (एरव्ही परडी फुलांनी भरली !) जळो देवा,भली !! ...कविता संपली आणि वर्गात शांतात पसरली. 'प्रेमाचे लव्हाळे ’या कवितेचे वर्गात वाचन सुरु होते. बारावीला सगळे विषय केवळ गुणांच्या आकडेमोडीत अभ्यासले जातात. मराठी काही अपवाद नव्हे, त्यामुळे अभ्यासक्रमाला असलेल्या कवितादेखील परीक्षेनंतर लक्षात राहत नाही की मनावर परिणाम सोडत नाही. या कवितेबाबत मात्र काही वेगळे घडले. मर्ढेकर या कवीचे 'नव्याने' ओळख झाली. बाळ सीताराम मर्ढेकर नावाच्या जादूची ओळख झाली ती त्यांच्या 'गणपत वाणी बिडी पितांना' ह्या कवितेतून. पुढे अजून एक कविता वाचनात आली, ' पिपांत मेले ओल्या उंदीर'. ह्या दोन्ही कविता शाळकरी पोरवयात वाचलेल्या होत्या. तेव्हा 'आधुनिक कविता' वगैरेंची फारशी मैत्री नव्हती, बालकवी,केशवसुत, कवी बी, ह्यांच्यापलीकडे झेप घेतली नव्हती. त्यामुळे ह्या दोन्ही कविता मला कितपत कळल्या होत्या ठाऊक नाही.फार भारावून जाणे अशातला प्रकार घडला नव्हता. शाळेला पाठ्यक्रमात मर्ढेकरांची पहिल्यांदा कविता अभ्यासाला आली, 'पितात सारे गोड हिवाळा'. मुंबईच्या हिवाळ्यातील पहाटेचे