१२ रजनीचित्रपट व्रतकथा - १
जुनी गोष्ट आहे. एक आटपाट नगर होते पुण्यनगरी त्याचे नाव.त्या नगरीत एक ऑटोचालक राहत होता.वेंकट त्याचे नाव.तो चित्रपटांचा चाहता होता. ईशकृपेने त्याच्या घरी भरभ्रराट होती.कशाची टंचाई त्याला जाणवली नाही.त्याच्याकडे काळा गॉगल होता, पिवळा रुमाल होता. ते त्याच्या देहाचे घटक बनले होते. तरीपण तो दुःखी असायचा. त्याचे मन त्याला खात असायचे. त्याच्या जीवनात एका गोष्टीची कमतरता त्याला कष्टी करायची. तो रजनीकांतदेवांचा निस्सीम भक्त होता. त्यांचे चित्रपट तो दररोज दिवसभर ऑटो चालवून थकल्यानंतर घरी जाण्यापूर्वी बघायचा.रजनीकांतदेवांच्या काही क्रिया त्याला करणे जमायचे.तो गळ्यातून आपला पिवळा रुमाल काढून एकदाच झटकायचा आणि संपूर्ण ऑटो स्वच्छ व्हायचा.ही रजनीकांतदेवांचीच कृपा असे तो समजायचा. अशा अजूनही काही क्रिया ज्या फक्त स्वयं रजनीकांतदेव किंवा त्यांचे निस्सीम भक्तच करू शकतात,त्या तो करायचा. तरी तो कष्टी होता. त्याला "उजवा पाय जमिनीवर ठेऊन डाव्या पाय गोल फ़िरवून धुळीचे वादळ...