पोस्ट्स

ब्लॉग चोरी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अनुदिनी चोरास !!

हवसे - गवसे - नवसे, ज्यांना स्वतःच्या बुद्धीने चार शब्द लिहिता येत नाहीत- लिहिता येत नाही, हरकत नाही - पण आपल्याला आवडलेला लेख अनुदिनीवर  द्यावासा वाटतो, जगाला वाटावासा वाटतो, अहो मग द्या की , त्यालादेखील हरकत नाही , पण लेखकाला श्रेय देणे मात्र आवडत नाही, स्वतःच्या नावे लेख खपवतात ( तेवढीच लेखक/कवी म्हणून प्रसिद्धी, मित्रांत फुशारकी !) - अशांना काय म्हणावे बरे ? तर चोर, हो ना ? चोरी सापडली की, कधी-कधी लंगडा युक्तिवाद  करतात - लेख मेलद्वारे आलाय, लेखक माहित नाही. अहो, मग लेख टाकताना  लिहायचे ना, लेखक माहित नाही ! वा थोडे गुगल्बाबाला विचारले की तो सांगतो मूळ लेख कोणत्या अनुदिनीवर आहे. पण लेखक व कवी बनायची कोण हौस असते हो !! आपण लिहावे, नवखे असाल तर चुका होतील, प्रोत्साहन मिळाले की अधिकाधिक चांगले लिहिले जाते, चुका सुधारल्या जातात, पण लिहित राहावे. मीदेखील अजून नवखाच की, मी...