’सोपा’ उपाय ??

’फुकट ते पौष्टिक’ च्या ’पिपा’सेला आळा घालणारा ’सोपा’ उपाय.

कथा - कारखान्यातले भूत

भुतांच्या अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणार्‍या मुलाची कथा

विडंबन - अध्यक्ष

अध्यक्ष एक नाट असतो
पदाच्या प्रतिष्ठेची लावलेली वाट असतो

बोलत असला तरी ऐकवत नाही
आता नसला बोलत तरीही
'बोला' म्हणवत नाही

संमेलन संपते पंगती उठतात
रिकाम्या मांडवात पत्रावळी साठतात

अध्यक्ष मनामनात तसंच ठेवून जातो काही
लिव्हरचं लिव्हरलाच कळावं असं
जातो देऊन काही

अध्यक्ष असतो एक धागा
वादाला तोंड फ़ोडणारी
पीठावरची जागा

संमेलन नसलं तेव्हा त्याचं नसतं भान
कोटी केली भाषणात
की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान

रसिक येतात जातात
कवी मात्र व्याकुळच
त्याची कधीच भागत नाही तहान
दिसत नसलं डोळ्यांना तरी
खोदत गेलो खोल खोल
की सापडतेच
काव्यसंग्रहांची खाण

याहून का निराळा असतो अध्यक्ष ?
तो पीठावर नाही तर
कोणावर करतात टीका
पत्रकार दक्ष

अध्यक्ष खरचं कोण असतो ?
कोट्यांची खाण असतो
लिव्हरची जाण असतो
अक्कल गहाण असतो
पायातली वहाण असतो
तुंबलेली घाण असतो

अध्यक्ष असतो फक्त मुलींसाठी
लाजतही नाही , वाजतही नाही

-- स्वामी संकेतानंद ,
६ जानेवारी, २०१४ 
दिल्ली 

गज़ल - ग़ालिब तेरी दिल्ली में

देख ये अराजकता , हाहाकार; ग़ालिब तेरी दिल्ली में
देख ले जम्हूरी* नाटक,व्यापार; ग़ालिब तेरी दिल्ली में

वक़्त ये ग़दर* का ना हो, पर 'मातम-ए-यक शहर-ए-आर्ज़ू'* है
हर गली, सड़क,कूचा,जमनापार; ग़ालिब तेरी दिल्ली में

कब खड़ा मसीहा हो, कब किस रामलीला, जंतरमंतर पर
कौन बन उठे गाँधी या सरदार ; ग़ालिब तेरी दिल्ली में

जो उखाड़ने आए खरपतवार ; खुद अब उसका हिस्सा हैं
हर हकीम हो जाता है बीमार;ग़ालिब तेरी दिल्ली में

छोड़ कर गया था दिल्ली तू जो कभी के वैसी ही तो है
वो सियासतें, खूनी कारोबार ग़ालिब तेरी दिल्ली में


---------------------------------------------------------------

*जम्हूरी = जम्हूरियत का;गणतंत्र का

*ग़दर = 1857 का ग़दर

*मातम-ए-यक शहर-ए-आर्ज़ू* = आरजू(कामना)के शहर (के उजड़ने) का मातम(शोक) ;
( ग़ालिब का एक शेर ,जो 1857 की दिल्ली की तबाही के बाद लिखा गया था।
            
  "अब मैं हूँ और मातम-ए-यक शहर-ए-आरज़ू
   तोड़ा जो तूने आईना, तिमसाल दार था  "
)

--- स्वामी संकेतानंद ,
२१ जनवरी, २०१४,
नई दिल्ली 

सोनिया मातेची आरती
सोनिये दुर्बळ भारी तुजविण कांग्रेसी।
अनाथनाथे गांधे स्पेक्ट्रम विस्तारी।
वारी वारी टूजीथ्रीजीते वारी।
हारी पडलो आता संकट निवारी ।
जय देवी जय देवी जय तेलंगराष्ट्रकर्तिनी ।
डॉलरवालर वर दे सत्ता संजीवनी ।। धृ।।


त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसी नाही।
पीएम श्रमले परन्तु न बोलले काही।
राजा विवाद करता पडिला प्रवाही।
ते तू दिग्गीलागी पावसी लवलाही ।।१।।


प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां ।
आंध्रापासूनि सोडी तोडी रायलपाशा ।
गांधे तुजवाचून कोण पुरविल आशा।
स्वामी तल्लीन झाला दशजनपथलेशा ।।२।।


--- स्वामी संकेतानन्द 
१० जानेवारी , २०१४ 
दिल्ली 

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More