पोस्ट्स

विडंबन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आम्हां न मिळे ब्लॉक

आम्हां न मिळे ब्लॉक। न मिळेच बॅन। जालियाची व्हाण। न मिळे आम्हां।। कपाळाची आठी। हातातली काठी। एकमेकां पाठी। न कळे आम्हां।। रोज रोज टॅगा। हॅशटॅग आणा। रोजचा बहाणा । छळण्याचा।। स्वाम्या म्हणे बुक। गुड गुड ठेवा। आणि खावा मेवा। सर्व घरी।।  - सर्वमेळा(स्वामी संकेतानंद)

विडंबन- जालाचे भामटं

जालाचे भामटं माझे घरीं प्रकटले। अवघेचि जालें पैसे गुल।। १।। साईटीचे कपट करुनी फसवलें अकाउंट देखिलें भागाकार गे माये।।२।। रोज बसून पूनम बारू सहज 'नीटु' प्याला। कधी ढोसियला खंबाकारे।।३।। -- स्वामी संकेतानंद, १७ फ़ेब्रुवारी, २०१५

विडंबन- चालवून टाक चीप

चालवून टाक चीप, जागतीक अर्थ मंद   राजना रिसेशनात कोण बैंक होय बंद त्या युरोकुली भरीस, भांडते अजून ग्रीस बाय तू करू नकोस, एक वर्ष स्टॉक बंद  गीत गात 'टू बिगा'चं, बेलआउटी उगाच  सावकार आधुनीक, की मती असेल मंद  गार गार एक्सपोर्ट चीन मोरली सपोर्ट  गाउनी गुलाबगीत खात जा गुलाबकंद  ते तुलाच रे कळेल, कोण कोण रे जळेल  सांग ना अता खरेच, टोकियो कि ताशकंद? हाय ते इझी मनीत, क्यूइने कबर खणीत सांग घेउनी बुडेेल, सैमला अनर्थछंद -- स्कैमी संकेतानंद  ;) नवी दिल्ली,  ०८ जुलै , २०१५ 

विडंबन-- पडून आहे सार्त्र अजुनी

पडून आहे सार्त्र अजुनी भावड्या निजलास का रे? एवढ्यातच त्या कम्यूवर तू असा थकलास का रे? अजुनही रचल्या न थप्पी रँडतैच्या पुस्तकांच्या अजुन ’भू’ खचली कुठे रे? हाय! तू खचलास का रे? सांग, ह्या बाख्तीनदाच्या भाविकाला काय सांगू? नच कळे आम्हास ते जे आणि तू रुसलास का रे? बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा फ़्रांत्स काफ़्का, ’रातपारीला बनूनी कीट वळवळलास का रे?’ उगवती डोक्यात माझ्या ’जागतिक’च्या पायवाटा तू बिचार्‍या वाचकांना एवढा  छळलास का रे? -- स्वामी संकेतानंद, १४ नोव्हेंबर,२०१४, नवी दिल्ली

कंपूची लक्षणे

समास पहिला: कंपूलक्षण ॐ नमोजी आंजानरा | लक्ष-लक्ष तारस्वरा | कृपादृष्टी जालवीरा । अवलोकावें ||१|| तुज नमूं गमभन | श्रीबराहा भक्तगण | गुगल इमे तो अन| तुझी रूपे ||२|| वंदून गुगलचरण | करून विकीस्मरण | लाभार्थ कंपूलक्षण | बोलिजेल ||३|| येक कंपू येक ट्रोजनकंपू | उभय लक्षणीं झोडपू | श्रोतीं सादर थोपू | केला पाहिजे ||४|| ट्रोजनकंपूचे लक्षण | पुढिले समासीं निरूपण | सावध होऊनि विचक्षण | परिसोत पुढें ||५|| आतां प्रस्तुत विचार | लक्षणें सांगतां अपार | परि कांहींयेक तत्पर | होऊन ऐका ||६|| जे जालवीर जन | जयांस नाहीं सभाज्ञान | जे केवळ विद्वान | त्यांचीं लक्षणें ||७|| आपुली भुमिका खरी| दाखवोनि विचारी |परकी ती झिडकारी | तो येक कंपू ||८|| देऊन सर्व स्रोत | गुगलून विकी फ़क्त |म्हणवे प्रज्ञावंत| तो येक कंपू||९|| परायडीशी डूख धरी | खवतून उद्धार करी | कमेंट देई विखारी | तो येक कंपू ||१०|| कंपूवीराशी पंगा | घेता करी दंगा | उधळी नाना रंगा | तो येक कंपू ||११|| एकमेकां करे स्तुती |हापिसे भोगी विपत्ति | सांगे कंपूची कीर्ती | तो येक कंपू ||१२|| गंभीर चर्चेवरी | धाग्याचा काश्मीर करी | चालवे टवाळखोरी | तो येक कंप...

विडंबन - अशी कबुतरे येती

अशी कबुतरे येती; आणिक घाण ठेवुनी जाती दोन घरांची पुण्यकमाई दहा घरांच्या खाती कपोत आला, पहिला वहिला खिड़कीमागे उभा राहिला तया मागे, येई साजणी गूटर्गूच्या साथी... दुरून येती थवे देखिले मी ग्याल्रीचे दार लोटिले धड़क मारती तरी निरंतर गंधित झाल्या भिंती पंख दोन ते हळु फ़डफ़डले खोलीभर मायेने फिरले हॉलकिचनाच्या भिंतीमधुनि लागेना मज हाती 'पुण्यवान' तो येता गाठी शिव्या पाच मोहरल्या ओठी त्या तुटल्या दातांची गाथा क्रूर कबुतरे गाती -- स्वामी संकेतानंद, १५ ऑक्टोबर, २०१३, नवी दिल्ली

पितृपक्ष स्पेशल विडंबन- आम्ही कोण

पितृपक्ष स्पेशल विडंबन सादर करत आहे. आस्वाद घेणे. आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू कावळे- देवाने दिधले असे पिंड तयें आम्हांस शीवावया विश्वी या पितराबले विचरतो चोहीकडे लीलया त्रैलोकांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया वळे सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके; काकस्पर्शच आमुचा शकतसे पिंडांप्रती द्यावया- मोक्षातिशया, अशी वसतसे जादू बिलांमाजि या; पापे वाढविता तुम्ही, बदलितो ते भाग्य आम्ही फुके! स्वर्गामाजि वसाहती वसविल्या कोणी नरांच्या बरे? नर्काला मनुलोक साम्य झटती आणावया कोण ते? ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे; ते आम्हीच पितर, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते! आम्हांला वगळा- गतप्रभ झणी होतील मोक्षांगणे आम्हांला वगळा- थकाल पितरांची फेडिता ती ऋणे! -- स्वामी संकेतानंद, नवी दिल्ली, ११/०९/२०१४

विडंबन - या भवनातील शीत पुराणे

हे विडंबन देताना कोणाकोणाची माफ़ी मागावी कळले नाही.  या भवनातील शीत पुराणे रवाळ, कडवे खूप, पाजू द्या -  आज येथले सूप माजशक्तीची चाबुक गाथा खरा शूर हो नमवील माथा जुने सूप अन् जुने घराणे हवा नवा तो कूप --- स्वामी संकेतानंद नवी दिल्ली,  ३एप्रील , २०१४ 

विडंबन - अध्यक्ष

अध्यक्ष एक नाट असतो पदाच्या प्रतिष्ठेची लावलेली वाट असतो बोलत असला तरी ऐकवत नाही आता नसला बोलत तरीही 'बोला' म्हणवत नाही संमेलन संपते पंगती उठतात रिकाम्या मांडवात पत्रावळी साठतात अध्यक्ष मनामनात तसंच ठेवून जातो काही लिव्हरचं लिव्हरलाच कळावं असं जातो देऊन काही अध्यक्ष असतो एक धागा वादाला तोंड फ़ोडणारी पीठावरची जागा संमेलन नसलं तेव्हा त्याचं नसतं भान कोटी केली भाषणात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान रसिक येतात जातात कवी मात्र व्याकुळच त्याची कधीच भागत नाही तहान दिसत नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की सापडतेच काव्यसंग्रहांची खाण याहून का निराळा असतो अध्यक्ष ? तो पीठावर नाही तर कोणावर करतात टीका पत्रकार दक्ष अध्यक्ष खरचं कोण असतो ? कोट्यांची खाण असतो लिव्हरची जाण असतो अक्कल गहाण असतो पायातली वहाण असतो तुंबलेली घाण असतो अध्यक्ष असतो फक्त मुलींसाठी लाजतही नाही , वाजतही नाही -- स्वामी संकेतानंद , ६ जानेवारी, २०१४  दिल्ली 

श्रावणमासी हर्ष-मानसी

माझ्या लाडक्या कवींच्या, बालकवींच्या ’श्रावणमासि हर्ष मानसी’ या माझ्या आवडत्या कवितेचे हे विडंबन त्यांची क्षमा मागूनच सादर करत आहे. श्रावणमासी हर्ष-मानसी, फिरायला जाती सिंहगडी रुटीन चूकवून,बाईक दामटून,वाट करती वाकडी विकेंड बघता ओघ गाड्यांचा गडावरी चाललासे जत्रा भरली काय गडावरी, क्षणोक्षणी मज भासे झालासा सूर्यास्त वाटतो, क्यामेरा त्वरेने तो काढे तानाजी कड्यावर पोज दिली, फ़ोटो काढा ना गडे उठती वरती जलदांकडे पाहण्यास वेळ नसे सर्व प्रेयसीवर होय रोखिले क्यामेर्‍याची लेन्से दुकानमाला दिसता भासे शॉपिंग कॉम्प्लेक्स इथे चढूनि येती गडावरती, खादाडीस की एकमते कचरा करूनि प्लास्टिकचा गडावरी वावरती सुंदर ललना हिरव्या कुरणी मित्रासंगे बागडती पार्ट्याही होती रानी, डीजे आसमंती घुमे फ़ेसाळ पेला बोले, हवी कशाला परमिट रुमे व्हिस्की कॅन उघडला विपिनी,धुंद गंध दरवळला बघता तिथे पोलिसमामा, मन अति कळवळला महागडी गाडी घेऊन साथी घाटावरूनि चढती आले मनी, निघाले झणी,गोंधळ घालाया वरती गडदर्शना निघती ललना, हर्ष येई कराया क्लिक वॉलवर त्यांच्या बघून घ्यावे, श्रावण महिन्याचे ’पिक’ ---पुणे, २ ऑग...

पाडाडी- विडंबनासाठी कच्चा माल- भाग १

माझ्या काव्यरसिक मित्रहो, विसरलांत तर नाही ना ? प्रदीर्घ कालानंतर परत सार्वजनिक जीवनात येत आहे म्हणून विचारले. जे विसरले त्यांना माझी ओळख करून द्यावयाचा विचार आहे. तर मी कवी स.दा.हितकरे. हो, हो तेच ते कविता पाडण्याची रेसिपी लिहून ज्यांनी होतकरू नवकवींवर अनंत उपकार केले आहेत आणि ज्यांच्या कृपाप्रसादामुळे आज प्रत्येक दुसर्‍या व्यक्तीस कविता प्रसवू लागली आहे तेच ते काव्यभूषण, काव्यकलानिधी, काव्यकुसुमरत्नाकर, काव्यपंडित, काव्यशिरोमणी, काव्यसम्राट कवीश्रेष्ठ स.दा.हितकरे. तसे मला ह्या पदव्या नावापुढे जोडायला आवडत नाही,पण काव्यरसिक चाहत्यांनी इतक्या प्रेमाने हा बहुमान दिला आहे त्याचा अव्हेर करता येत नाही. आता माझ्या काव्यरसिक काव्यप्रेमींपुढे प्रश्न पडला असेल की मी अचानक असा अज्ञातवासात कसा गेलो आणि कसा प्रकटलो. मागील वर्षी एका काव्यसंमेलनात काव्यवाचन करत असतांना माझ्या काव्यतृषार्त श्रोत्यांनी मजवर जो ’प्रेमाचा वर्षाव’ केला त्याचा स्वीकार करून अज्ञातवासात जाण्याचे प्रयोजिले जेणेकरून माझ्या काव्यसाधनेस व्यत्यय येऊ नये. आज अचानक माझ्या सर्व काव्यरसिक काव्यप्रेमींच्या दारावर काकपक्षी कोक...

विडंबन - सांग सांग भोलानाथ

कविवर्य श्री. मंगेश पाडगावकरांची मनापासून माफी मागून आणि ज्यांनी ही  कविता लिहिण्याची प्रेरणा दिली त्या सर्वांना मनसोक्त शिव्या घालून "सांग सांग भोलानाथ " ह्या आपल्या सर्वांच्या लाडक्या बालगीताचे आय टी कामगाराच्या " फ्रस्टेशनगीतात" विडंबन करतोय.  सांग सांग भोलानाथ, क्लाएंट चिडेल काय ? प्रोजेक्ट कचर्‍यात जाऊन, रिलीज मिळेल काय ? भोलानाथ मॅनेजर दया दाखवेल काय ? माझे काम स्वतः उरी घेईल काय ? भोलानाथ, भोलानाथ, खरे सांग एकदा  आयटीत डेडलाईन, पाळली जाते कितीदा ?  भोलानाथ उद्या आहे,क्लाएंन्टसोबत मिटींग.. सिक लीवची माझ्या, होईल का रे सेटिंग ? भोलानाथ भोलानाथ हाईक मिळेल काय ? ३५-४० टक्क्यांचा पाउस पडेल काय ? भोलानाथ माझ्या कॉम्प ऑफ्स देशील काय ? भोलानाथ मनासारखे काम मिळेल काय ? एक गरीब बिचारे पिडलेले कोकरू, आर्त, काळजाला पिळवटणार्‍या स्वरात भोलानाथला म्हणाले, " भोलानाथ पुण्याला, जायला मिळेल काय ?  भोलानाथ मॅनेजरचे, हृदय पाझरेल काय ? " आकाशवाणी झाली, " भगवान के घर...

विडंबन - नागपुरात

बंगळुरात  लिहून झाले .. आता नागपुरात .. प्रेरणास्रोत मागे  सांगितले आहेच, पुन्हा एकदा सांगतो >> आदी जोशीची " कोंकणात " ही  कविता..  ही कविता मी "बंगळुरात" च्या सुरातच लिहिली आहे. मुद्दाम नागपुरी मराठी वापरली आहे. आनंद घ्यावा..  नागपुरात   मोठ्ठाल्ले रस्ते.. ट्राफिकले हसते .. ढोरं बसते.. नागपुरात.. डी पी ची हिरवळ नागनाल्याचा चिखल उन्हाळ्यात तळमळ नागपुरात नागपुरीचा थाट हिंदी बम्बाट इंग्लिशलेबी वाट नागपुरात के सी पार्कचा पोहा पहाटे चारले चहा उधारीच वाहा नागपुरात माहोल पोट्टे रिकामचोट्टे संत्र्याचे कट्टे नागपुरात मिहानची भरारी लफडे भारी दिल्लीची वारी नागपुरात बी इ करी बेरोजगारी पुण्याची वारी नागपुरात मस्तीत चित्त पाहुणचार मस्त फॅमिली संग नागपुरात  -------------------------------------- बम्बाट = भरपूर . विदर्भात "बम किंवा  बम्बाट " हा शब्द बराच कॉमन आहे.. "अबे,बम मजा आली बे .." एकदम सहज निघणारा उद्गार ! माहोल = हा "भारी /लै भारी" चा समानार्थी..आणि इतरही अनेक अर्थ सुचवतो हा शब्द .. म्हणजे बघा ," क्या...

विडंबन - बंगळुरात

आदी जोशीच्या " कोंकणात " या  कवितेवरुन सुचलेले हे विडंबन ... होसुरची वाट ट्राफिक दाट डोक्याची वाट बंगळुरात फोरमची हिरवळ.. सुगंधी दरवळ     जीवाला कळ बंगळुरात गजर्‍याचा घमघमाट चोरांचा सुळसुळाट खिश्याला चाट बंगळुरात मराठीला काट हिंदीला लाथ कानडी बरसात बंगळुरात आय टी ची भरारी माणूस करारी एकटेपणा मारी बंगळुरात विचलित चित्त चित्त अतृप्त सावली संग बंगळुरात   ( " सुगंधी दरवळ "  इथे आधी  "ब्रिगेडरोडची वर्दळ " हा शब्द होता :) पण मी तो काढला.(कारण विचारू नये ..हेहे ) ही कविता आधी मीमराठी या संकेतस्थळावर प्रकाशित केली होती.तेथे वाचक म्हणाले ," यार बंगळूरावर कविता लिहितोयस आणि ब्रिगेड रोड मिसिंग ?? ".. तर मित्रांनो ,तुम्हाला योग्य ती ओळ वाचावी ;)  )

विडंबन - मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा हैं

 गुलज़ार साहेबांची माफ़ी मागून त्यांच्या "मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा हैं " या कवितेचे विडंबन करतोय.. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा हैं.. सॉफ़्टवेअर के कुछ डिवीडीज़ रखे हैं और एक ८ जीबी पेनड्राइव्ह पड़ा हैं वो पेनड्राइव्ह फ़ॉरमॅट कर दो.. मेरा वो सामान लौटा दो... ओ. एस. तुम्हारी, करप्ट होने की आहट.. सुनके मैनें बग्स हटायें थे.. ओ. एस. तुम्हारी अभीतक अच्छी चल रही हैं..  तुम  ओ. एस.  हटा दों...मेरा वो सामान लौटा दो..... एक अकेली किताब से जब आधे आधे पढ़ रहे थे.. आधे़ पढे़ आधे छोड़े.. मैं तो फ़ेल हो गया था.. तुम शायद पास हो गयी थी.. वो मार्क्स मुझे दे दो.. मेरा वो सामान लौटा दो..... एक सौ सोलह मुव्हीज के टॉरेंट्स.. एक तुम्हारे लॅप्पी का वॉलपेपर.. सॉफ़्टवेअर्स के लायसन्स कीज़.. तुम्हारे वॉर्डरोब के कपड़े कुछ.. ८००० रुपयों का पेट्रोल भी सब याद करा दूँ.. सब भिजवादो.. मेरा वो सामान लौटा दो..... एक इज़ाज़त  दे दो बस.. जब इसको ले जाऊँगा.. नयी जी. एफ़ को दे दूँगा..

विडंबन - आफ़रिदी गुपचुप रोता हैं..

माझ्याच " राधा गुपचुप रोती हैं " या कवितेचे विडंबन विद्याधर भिसे च्या सुचनेनुसार ! स्विंग होता,स्टम्प उखाडता बॉल, सिसकियाँ किसकी सुनाता हैं ? आफ़रिदी गुपचुप रोता हैं.. मॅच फ़िक्सिंग में हम मगन थे.. आबरू डुबोने में तो आदतन थे ना खेलते न्यूझीलंड को तो क्या होता? डरपोक ही कहलाते तो क्या होता? सरहदों पार बैठा दहशतगर्द, क्यूँ मातम के गीत गाता हैं ? आफ़रिदी गुपचुप रोता हैं.. ऑन-साईड टेलर,ऑफ-साईड टेलर.. मैदान की हर दिशा में टेलर.. याद कुछ दिला दूँ तुम्हे .. बेहतरीन गेंदबाज कहते हमें.. " टेलर को आउट करो कमिनो.." कौन यह विलाप करता हैं ? आफ़रिदी गुपचुप रोता हैं.. आखिरी ओवर्स में अब कौन बचता हैं ? अख्तर की बॉलिंग से अब कौन डरता हैं ? रावलपिंडी एक्सप्रेस अब क्यूँ कहलाते हो ? अपने बॉलिंग की दहशत जो नही फैलाते हो .. बम का धमाका धमकाती आवाज में .. किस नामाकुल को बुलाता हैं ? आफ़रिदी गुपचुप रोता हैं.. फिकी हो गई ३ जीतों की खुशियाँ देखो.. बेआवाज़ पाकिस्तान की गलियाँ देखो.. इम्रान अब भी आफ़रिदी के पास आता हैं .. क्रिकेट की दो-चार टिप्स खास देता हैं.. नतीजा...