विडंबन - बंगळुरात

आदी जोशीच्या "कोंकणात " या कवितेवरुन सुचलेले हे विडंबन ...होसुरची वाट
ट्राफिक दाट
डोक्याची वाट
बंगळुरात

फोरमची हिरवळ..
सुगंधी दरवळ    
जीवाला कळ
बंगळुरात

गजर्‍याचा घमघमाट
चोरांचा सुळसुळाट
खिश्याला चाट
बंगळुरात

मराठीला काट
हिंदीला लाथ
कानडी बरसात
बंगळुरात

आय टी ची भरारी
माणूस करारी
एकटेपणा मारी
बंगळुरात

विचलित चित्त
चित्त अतृप्त
सावली संग
बंगळुरात 


 ( "सुगंधी दरवळ " इथे आधी  "ब्रिगेडरोडची वर्दळ " हा शब्द होता :) पण मी तो काढला.(कारण विचारू नये ..हेहे ) ही कविता आधी मीमराठी या संकेतस्थळावर प्रकाशित केली होती.तेथे वाचक म्हणाले ," यार बंगळूरावर कविता लिहितोयस आणि ब्रिगेड रोड मिसिंग ?? ".. तर मित्रांनो ,तुम्हाला योग्य ती ओळ वाचावी ;)  )४ टिप्पण्या:

 1. >> "यार बंगरूळावर कविता लिहितोयस आणि ब्रिगेड रोड मिसिंग ??"

  हजार टक्के सहमत...

  मी 'ब्रिगेड रोड' च वाचणार :)

  उत्तर द्याहटवा
 2. सत्यवाना, वाच रे तुला जे वाचायचे आहे ते ! ( अस्मादिकसुद्धा एकांतात "ब्रिगेड रोड"च वाचतात;) !)

  उत्तर द्याहटवा
 3. मस्त विडंबन ...ब्रिगेड रोड मस्तच आहे ....काय प्रॉब्लेम आहे ते लिहायला लक्षात नाही आलं माझ्या.

  उत्तर द्याहटवा
 4. निलभौ, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. हो ब्रिगेड रोड मस्तच आहे. प्रॉब्लेम म्हंजे लंबी कहानी है दादा.. :)
  येत रहा, भेट देत रहा. :)

  उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More