विडंबन - बंगळुरात
आदी जोशीच्या "कोंकणात " या कवितेवरुन सुचलेले हे विडंबन ...
होसुरची वाट
ट्राफिक दाट
डोक्याची वाट
बंगळुरात
फोरमची हिरवळ..
सुगंधी दरवळ
जीवाला कळ
बंगळुरात
गजर्याचा घमघमाट
चोरांचा सुळसुळाट
खिश्याला चाट
बंगळुरात
मराठीला काट
हिंदीला लाथ
कानडी बरसात
बंगळुरात
आय टी ची भरारी
माणूस करारी
एकटेपणा मारी
बंगळुरात
विचलित चित्त
चित्त अतृप्त
सावली संग
बंगळुरात
ट्राफिक दाट
डोक्याची वाट
बंगळुरात
फोरमची हिरवळ..
सुगंधी दरवळ
जीवाला कळ
बंगळुरात
गजर्याचा घमघमाट
चोरांचा सुळसुळाट
खिश्याला चाट
बंगळुरात
मराठीला काट
हिंदीला लाथ
कानडी बरसात
बंगळुरात
आय टी ची भरारी
माणूस करारी
एकटेपणा मारी
बंगळुरात
विचलित चित्त
चित्त अतृप्त
सावली संग
बंगळुरात
( "सुगंधी दरवळ " इथे आधी "ब्रिगेडरोडची वर्दळ " हा शब्द होता :) पण मी तो काढला.(कारण विचारू नये ..हेहे ) ही कविता आधी मीमराठी या संकेतस्थळावर प्रकाशित केली होती.तेथे वाचक म्हणाले ," यार बंगळूरावर कविता लिहितोयस आणि ब्रिगेड रोड मिसिंग ?? ".. तर मित्रांनो ,तुम्हाला योग्य ती ओळ वाचावी ;) )
>> "यार बंगरूळावर कविता लिहितोयस आणि ब्रिगेड रोड मिसिंग ??"
उत्तर द्याहटवाहजार टक्के सहमत...
मी 'ब्रिगेड रोड' च वाचणार :)
सत्यवाना, वाच रे तुला जे वाचायचे आहे ते ! ( अस्मादिकसुद्धा एकांतात "ब्रिगेड रोड"च वाचतात;) !)
उत्तर द्याहटवामस्त विडंबन ...ब्रिगेड रोड मस्तच आहे ....काय प्रॉब्लेम आहे ते लिहायला लक्षात नाही आलं माझ्या.
उत्तर द्याहटवानिलभौ, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. हो ब्रिगेड रोड मस्तच आहे. प्रॉब्लेम म्हंजे लंबी कहानी है दादा.. :)
उत्तर द्याहटवायेत रहा, भेट देत रहा. :)