"१२ रजनीचित्रपट व्रत" - विधी
प्रस्तावना : - "१२ रजनीचित्रपट व्रत" हे रजनीकांतदेवांचे परमभक्त स्वामी संकेतानंद महाराज ह्यांच्या अनेक वर्षांच्या दिव्य साधनेचे फळ होय. हे व्रत अतिशय सिद्ध व तत्काळ परिणाम दाखवणारे आहे.हे व्रत श्रद्धेने पूर्ण केल्यास रजनीकांतदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या काही लीला करण्याची क्षमता सामान्य माणसात अंगी येते. समस्त भूलोकीच्या मर्त्य मानवांना या व्रताचा लाभ व्हावा या उदात्त हेतूने ह्या व्रताची सम्पूर्ण विधी स्वामी संकेतानंद महाराज ह्यांनी प्रस्तुत अनुदिनीलेखकास सांगितलेली आहे. ह्या व्रताची अचूक व परिणामकारक विधी फ़क्त याच अनुदिनीवर असून भाविकांनी इतर खोट्या व्रत-अनुदिनींपासून सावध रहावे तसेच अनुदिनीस भेट देण्याआधी http://manmanjusha.blogspot.com या संकेतस्थळाची खात्री करुन घ्यावी. इतर अनुदिनींमधे सांगितलेली व्रत-विधी परिणामकारक नाही याची श्रद्धाळूंनी नोंद घ्यावी. तसेच हे व्रत कॉपीराइट केलेले असल्याने ह्या व्रताची नक्कल व चोरी करण्याचे पातक करु नये. रजनीकांतजी आपल्या गॉगलआडून सगळे बघत असल्याची चोरट्यांनी नोंद घ्यावी --- प्रकाशक व्रतासाठी ल