’सोपा’ उपाय ??

’फुकट ते पौष्टिक’ च्या ’पिपा’सेला आळा घालणारा ’सोपा’ उपाय.

कथा - कारखान्यातले भूत

भुतांच्या अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणार्‍या मुलाची कथा

विडंबन - सांग सांग भोलानाथ

कविवर्य श्री. मंगेश पाडगावकरांची मनापासून माफी मागून आणि ज्यांनी ही  कविता लिहिण्याची प्रेरणा दिली त्या सर्वांना मनसोक्त शिव्या घालून "सांग सांग भोलानाथ " ह्या आपल्या सर्वांच्या लाडक्या बालगीताचे आय टी कामगाराच्या " फ्रस्टेशनगीतात" विडंबन करतोय. सांग सांग भोलानाथ, क्लाएंट चिडेल काय ?
प्रोजेक्ट कचर्‍यात जाऊन, रिलीज मिळेल काय ?


भोलानाथ मॅनेजर दया दाखवेल काय ?
माझे काम स्वतः उरी घेईल काय ?


भोलानाथ, भोलानाथ, खरे सांग एकदा 
आयटीत डेडलाईन, पाळली जाते कितीदा ? 


भोलानाथ उद्या आहे,क्लाएंन्टसोबत मिटींग..
सिक लीवची माझ्या, होईल का रे सेटिंग ?


भोलानाथ भोलानाथ हाईक मिळेल काय ?
३५-४० टक्क्यांचा पाउस पडेल काय ?


भोलानाथ माझ्या कॉम्प ऑफ्स देशील काय ?
भोलानाथ मनासारखे काम मिळेल काय ?
एक गरीब बिचारे पिडलेले कोकरू, आर्त, काळजाला पिळवटणार्‍या स्वरात भोलानाथला म्हणाले,

" भोलानाथ पुण्याला, जायला मिळेल काय ?
 भोलानाथ मॅनेजरचे, हृदय पाझरेल काय ? "


आकाशवाणी झाली,

" भगवान के घर देर हैं, अंधेर नही..
  लेकिन तेरा केस भगवान के पास नहीं.. "
अंतहीन...अलविदा म्हणताना...
वेदना अंतहीन..
'क्षण' दोन क्षणांचा..
हुरहूर अंतहीन..


नुसतेच कसे गिळावे..
हुंदके कंठातले....
हसरे डोळे जरी..
आसवे अंतहीन..


पाठमोरी आकृती 
ठिपका होतांना..
परिघात अडकले..
जीवन अंतहीन..


तू असलास जरी..
परक्या बाहुपाशात..
तुझाच मजला...
आधार अंतहीन..


नजरानजर क्षणाची..
मन रे अडकले..
तो विसरायाची..
साधना अंतहीन..


मोहाच्या चांदराती..
बेसावध चांदण्या..
फसव्या स्वप्नांचा 
पाठलाग अंतहीन..


आज पुन्हा एकदा..
एकांताची साथ..
विस्कटलेल्या बिछान्याचे.
भास अंतहीन..


तुटता तुटेना..
ताण अंतहीन..
सुटता सुटेना..
प्राण अंतहीन..


येऊ दे ते ..
मरण अंतहीन..
जळू दे ते..
सरण अंतहीन..


विडंबन - नागपुरात

बंगळुरात  लिहून झाले .. आता नागपुरात .. प्रेरणास्रोत मागे  सांगितले आहेच, पुन्हा एकदा सांगतो >> आदी जोशीची "कोंकणात" ही  कविता..
 ही कविता मी "बंगळुरात" च्या सुरातच लिहिली आहे. मुद्दाम नागपुरी मराठी वापरली आहे. आनंद घ्यावा.. 

नागपुरात 


मोठ्ठाल्ले रस्ते..
ट्राफिकले हसते ..
ढोरं बसते..
नागपुरात..

डी पी ची हिरवळ
नागनाल्याचा चिखल
उन्हाळ्यात तळमळ
नागपुरात

नागपुरीचा थाट
हिंदी बम्बाट
इंग्लिशलेबी वाट
नागपुरात

के सी पार्कचा पोहा
पहाटे चारले चहा
उधारीच वाहा
नागपुरात

माहोल पोट्टे
रिकामचोट्टे
संत्र्याचे कट्टे
नागपुरात

मिहानची भरारी
लफडे भारी
दिल्लीची वारी
नागपुरात

बी इ करी
बेरोजगारी
पुण्याची वारी
नागपुरात

मस्तीत चित्त
पाहुणचार मस्त
फॅमिली संग
नागपुरात --------------------------------------
बम्बाट = भरपूर .
विदर्भात "बम किंवा बम्बाट " हा शब्द बराच कॉमन आहे.. "अबे,बम मजा आली बे .." एकदम सहज निघणारा उद्गार !

माहोल = हा "भारी /लै भारी" चा समानार्थी..आणि इतरही अनेक अर्थ सुचवतो हा शब्द .. म्हणजे बघा ," क्या भाई, आजकल बम माहोल कर रा तू ! " इथे वेगळाच अर्थ आहे ना ?

डी पी = धरमपेठ .. इथल्या वेस्ट हायकोर्ट रोडवर( WHC Road) बरीच 'हिरवळ' असते. शंकरनगर वा लक्ष्मीभुवन चौकात उभे राहायचे.. :) 

के सी पार्क = कस्तुरचंद पार्क . इथले पोहे खूप प्रसिद्ध आहेत. पण भल्या सकाळीच जायचे.

पहाटे चारले चहा = शंकरनगर चौकात  पहाटे ४-५ ला जायचे आणि चहा घ्यायचा किंवा रामदासपेठेत लोकमत चौकात  जायचे. हा तरुणांचा  फेवरेट विरंगुळा.. 

कवितेत बर्डी ( सीताबर्डी ) सुटली.. :( बर्डीचा महिमा शब्दांत बांधता येणार नाही .. ;)  प्रयत्न करेन परत एकदा  :)

विडंबन - बंगळुरात

आदी जोशीच्या "कोंकणात " या कवितेवरुन सुचलेले हे विडंबन ...होसुरची वाट
ट्राफिक दाट
डोक्याची वाट
बंगळुरात

फोरमची हिरवळ..
सुगंधी दरवळ    
जीवाला कळ
बंगळुरात

गजर्‍याचा घमघमाट
चोरांचा सुळसुळाट
खिश्याला चाट
बंगळुरात

मराठीला काट
हिंदीला लाथ
कानडी बरसात
बंगळुरात

आय टी ची भरारी
माणूस करारी
एकटेपणा मारी
बंगळुरात

विचलित चित्त
चित्त अतृप्त
सावली संग
बंगळुरात 


 ( "सुगंधी दरवळ " इथे आधी  "ब्रिगेडरोडची वर्दळ " हा शब्द होता :) पण मी तो काढला.(कारण विचारू नये ..हेहे ) ही कविता आधी मीमराठी या संकेतस्थळावर प्रकाशित केली होती.तेथे वाचक म्हणाले ," यार बंगळूरावर कविता लिहितोयस आणि ब्रिगेड रोड मिसिंग ?? ".. तर मित्रांनो ,तुम्हाला योग्य ती ओळ वाचावी ;)  )Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More