पोस्ट्स

रबिंद्रनाथ टागोर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ठाकुरांची (आणि माझीही) कृष्णकलि

इमेज
बंगाली गीतांमध्ये रुचि घेणे सुरु केले तेव्हाची गोष्ट आहे. आबोहोमान चित्रपटातल्या ’For your eyes only ’ गाण्याबद्दल एका बंगाली फ़ोरमवर वाचले नि ते यूट्य़ूबवर ऐकले. त्या गाण्यात रबिंद्रनाथ ठाकूरांच्या ’कृष्णकलि’ आणि जीबोनानन्दो दासांच्या ’बोनोलता सेन’ ( पुढचा लेख हिच्यावरच आहे. ) ह्या दोन काव्यकन्यांचा उल्लेख येतो.  ही मयनापाड्याची मृगनयनी कृष्णकलि कोण असावी हे कुतूहल तेव्हापासूनचे. कृष्णकलि  यूट्य़ूबवर सहज सापडली आणि मी हिच्या प्रेमातच पडलो. आता ही ठाकूरांची न राह्ता माझीही झाली होती. जिंवत चित्रण करणारे काव्य आणि तेही सहजसोप्या भाषेत कसे असावे ह्याचे सुंदर उदाहरण म्हणजे ’कृष्णकलि’. मात्र हे एवढ्यावर थांबत नाही. सुमारे ११० वर्षांपूर्वी लिहीलेली ही कविता अगदी क्रांतिकारी विचारसुद्धा घेऊन आली आहे. कवी एका काळ्या मुलीच्या प्रेमात पडला आहे. मात्र तो तिच्या काळ्या रंगाकडे न बघता फक्त काळ्या, हरिणीसारख्या डोळ्यांकडे बघत आहे. तसेच काळ्या रंगांचे  आणि आनंदाच्या भारतीय संकेतांचे अद्वैत दाखवून तो म्हणतो की  तुम्हाला तिला जे म्हणायचे असेल ते म्हणा, मी तर तिला कृष्णकलिच ( एका प्रकारचे फूल )

निसर्गाशी एकरूप होतांना - ठाकुरांचे ’आकाश भॉरा शूर्जो तारा ’

इमेज
आपण या निसर्गाचा एक भाग आहोत ही जाणीव जेव्हा होते तेव्हा मनात नेमक्या कोणत्या भावना येतात ? निसर्गाच्या सौंदर्याचा आविष्कार जेव्हा अनुभवतो, तेव्हा मन कसे पाखरू होते ना ?    रबिंद्रनाथ ठाकूरांचे ’आकाश भॉरा शूर्जो तारा ’ हे असेच एक सुंदर गीत. निसर्गात रोजच घडणार्‍या गोष्टींकडे बघण्याची एक नवीच दृष्टी इथे आपल्याला दिसते. निसर्गाच्या विविध रूपांत आपले स्थान गवसल्यावर उचंबळून येणार्‍या भावना गुरुदेवांनी सहजसोप्या आणि गेय शब्दांत गुंफ़ल्या आहेत. शेवटच्या ओळी तर हा ’स्वत्वा’चा साक्षात्कार अगदी अचूक पकडतात. " कान पेतेछी, चोख मेलेछी, धॉरार बुके, प्राण ढेलेछी जानार माझे ओजानार कोरेछी शोंधान " एकदा का स्वत्वाचा साक्षात्कार झाला की नेहमीच्याच ओळखीच्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो आणि मग सुरु होतो ज्ञातांमधल्या अज्ञातांचा शोध.. या गीताचा मी माझ्या परीने मराठीत अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नात मला मोलाच्या सूचना देणार्‍या सविताताईंचे आभार.                आधी मूळ बांग्ला गीत : आकाश भॉरा शूर्जो तारा बिश्शो भॉरा प्रान ताहारी मा

ठाकुरांचा आर्त स्वर - ’आज ज्योत्स्नाराते’

इमेज
   रबिंद्र संगीताबद्दल ऐकून होतो, पण प्रत्यक्षात कधी ऐकले मात्र नव्हते. ऑगस्ट २०११ चा कुठलातरी शुभदिन. खरेतर रात्र, त्यादिवशी रात्रपाळीला होतो. फारसे काम नव्हते. अचानक आठवले की आपल्याला रबिंद्र संगीताबद्दल जाणून घ्यायचे आहे. विचार केला आधी ऐकूया जरा. यूट्य़ूब उघडले. ’रबिंद्र संगीत’ टाकून शोध घेतला. एक गाणे दिसले, ’आज ज्योत्स्नाराते’, लावले. सुरुवात 'इसराज’ या वाद्याच्या दर्दभर्‍या तुकड्याने होते. आणि २ मिनटानंतर शहाना बाजपेईचा आवाज जादू करायला सुरुवात करतो. जसजसे गाणे पुढे सरकते तसतसे ते गाणे, ते संगीत, शहानादिंचा आवाज आणि गुरुदेवांचे ते  शब्द काळीज चिरत  जातात.     गुरुदेवांनी अशी मन कातर करणारी कविता का लिहीली असेल आणि त्याला तितकीच आर्त चाल का लावली असेल असा प्रश्न पडतो. मग ह्या गीताच्या पार्श्वभूमीबद्दल जाणून घेतले. कळले की, हे गीत ठाकूरांनी त्यांच्या मुलाच्या ’शमिंद्रनाथ’ च्या मृत्यूनंतर लिहीले. शमिंन्द्रनाथ त्यांचा धाकटा मुलगा, वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी कॉलरामुळे वारला. याआधी काही काळापूर्वीच त्यांची पत्नी मृणालिनी आणि मुलगीसुद्धा जग सोडून गेले होते. लाडक्या शमिंद्रचा