पोस्ट्स

sachin tendulkar after retirement लेबलसह पोस्ट दाखवत आहे

देवबाप्पा सचिन निवृत्तीनंतर (कल्पनाही करवत नाही !)

     काही वर्षांपूर्वी (जास्त दूर जायची गरज नाही, ३-४ च झाली असतील) ,नेमेची यायचा  क्रिकेट सिझन आणि नेमेची चर्चा व्हायची देवबाप्पाच्या निवृत्तीची. "शेर अब बुढ़ा हो गया हैं !"   थोबाडीत मारलीये सचिनने त्यांच्या. आता बघा ना ; २००६ ला  एक  बोका सचिनच्या जखमांवर मीठ चोळत होता. आता मात्र कसे त्याचे दात त्याच्या घशात गेलेत. जखमांनी त्रासलेल्या सचिनला मानसिक आधार देण्याऐवजी हा 'सिक' बोका " मेरी बिल्ली मुझीसे म्याऊ" म्हण सार्थ करत होता .अरे , तुझ्या अवेळी संपलेल्या कारकिर्दीचे खापर सचिनच्या हेल्मेटवर कशाला फोडतोस ? त्याने तेव्हाच hellशी आपली meeting निश्चित केली! मग २००७ ला सचिनवर ऑस्ट्रेलियातून एक चप्पल भिरकावली गेली, "सचिनने आता निवृत्त व्हावे . तो आपल्याच खेळाची सावली बनलाय आता. " त्याच्या भावाने पण त्याच्या चपलेवर चप्पल ठेवत देवबाप्पाच्या प्रामाणिकतेवरच  शंका घेतली .अरे , तू कोचिंग करायचे पैसे घेतले होतेस कि टीम फोडण्याचे ? न्यूझीलंड विरुद्ध ८०-८१ मध्ये आपल्या भावाला underarm टाकायला लावून खिलाडूवृत्तीचे मस्त दर्शन घडवले होतेस !! किती...