वेदना
आसवांची पानगळ.. नजरेने केला छळ.. पापण्यांची विवशता... डोळ्यांची परवशता... मतिमंद भावना.. स्पंदने कळेना.. मनाचा चुकारपणा.. मोडलेला कणा.. नसती उठाठेव.. पाण्यातला देव.. उध्वस्त प्रतिमा.. शेंदराला काळीमा... दग्ध देहाची राख.. घरे बघा बेचिराख.. टांगलेली लाज.. वेशीला आज.. माझ्यातला मी.. तुझ्यासारखा मी.. कोण घाव करी ? कोणाच्या अंतरी?