वेदना


आसवांची पानगळ..
नजरेने केला छळ..
पापण्यांची विवशता...
डोळ्यांची परवशता...

मतिमंद भावना..
स्पंदने कळेना..
मनाचा चुकारपणा..
मोडलेला कणा..

नसती उठाठेव..
पाण्यातला देव..
उध्वस्त प्रतिमा..
शेंदराला काळीमा...
 
दग्ध देहाची राख..
घरे बघा बेचिराख..
टांगलेली लाज..
वेशीला आज..

माझ्यातला मी..
तुझ्यासारखा मी..
कोण घाव करी ?
कोणाच्या अंतरी?

७ टिप्पण्या:

  1. फारच सुंदर रे संकेतानंदा...
    जरासा उशीरच झाला कमेंटायला वाचली तीन-चार दिवसांपूर्वीच होती.. तेव्हाच आवडलेली.. सुंदर!! :)

    प्रत्युत्तर द्याहटवा
  2. विभी, मला जरा जास्तच उशीर झाला बघ तुझ्या कमेंटचे उत्तर द्यायला.. :D
    धन्स रे !!

    प्रत्युत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More