वेदना


आसवांची पानगळ..
नजरेने केला छळ..
पापण्यांची विवशता...
डोळ्यांची परवशता...

मतिमंद भावना..
स्पंदने कळेना..
मनाचा चुकारपणा..
मोडलेला कणा..

नसती उठाठेव..
पाण्यातला देव..
उध्वस्त प्रतिमा..
शेंदराला काळीमा...
 
दग्ध देहाची राख..
घरे बघा बेचिराख..
टांगलेली लाज..
वेशीला आज..

माझ्यातला मी..
तुझ्यासारखा मी..
कोण घाव करी ?
कोणाच्या अंतरी?

टिप्पण्या

  1. फारच सुंदर रे संकेतानंदा...
    जरासा उशीरच झाला कमेंटायला वाचली तीन-चार दिवसांपूर्वीच होती.. तेव्हाच आवडलेली.. सुंदर!! :)

    उत्तर द्याहटवा
  2. सारिका, उशीरा धन्यवाद म्हणतोय.. धन्स !!!

    उत्तर द्याहटवा
  3. विभी, मला जरा जास्तच उशीर झाला बघ तुझ्या कमेंटचे उत्तर द्यायला.. :D
    धन्स रे !!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय