पोस्ट्स

devotion to rajinikanth लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पुनर्जन्माचा प्रथम वर्धापनदिन

रास्कल* हो, माइंड इट  !!     वाढदिवस वगैरे ऐकले असतील, ही पुनर्जन्माच्या वाढदिवसाची काय भानगड आहे असा प्रश्न पडला असेलच. तर आजपासून बरोब्बर एक वर्षापूर्वी माझ्या मेलेल्या ब्लॉगने रजनीदेवाच्या कृपेने नवा जन्म घेतला.       तसा मी ब्लॉग सुरु केला होता १९ नोव्हेंबर ,२००९ ला. आरम्भशुराप्रमाणे २ लेख पटापट लिहिलेसुद्धा. पण तेव्हा रजनीदेवाची माझ्यावर कृपादृष्टी नसल्याने ब्लॉगचा अकाली मृत्यू झाला. मी फार चिंतीत होतो. मला काही सुचेनासे झाले होते. मग एके दिवशी मला आकाश गुप्ते भेटला. त्याने मला रजनीदेवाविषयी सांगितले. तेव्हापासून माझे जगच बदलले. तो म्हणाला तू रजनीकांत ची आरती लिही.बघ तुझे मराठी ब्लॉग विश्वात कसे नाव होईल. मग मी त्याच दिवशी रजनीदेवाची हिंदी आरती लिहिली आणि ब्लॉगवर टाकली. नतीजा बेहद चौंकानेवाला था. मला त्याचे लगेच परिणाम दिसले. बऱ्याच लोकांनी ती आरती सश्रद्ध वाचली. कमेंट्स आल्यात. हा रजनीनामाचा महिमा होता. आता रजनीदेवाच्या कृपेने दुसऱ्या दिवशी मराठी आरतीसुद्धा आली. ब्लॉग धावू लागला. पाठीराखे बनलेत. ब्लॉगचा नवा जन्म झाला होता. रजनीनामाचा महिमाच असा की...

सार्वजनिक रजनीकांतोत्सव

          आज १२ डिसेंबर, ३०१०. भल्या पहाटे उठून रजनीदेवाजी आराधना करून सहज फेरफटका मारायला बाहेर पडलो. रजनीकांत चौकात आल्यावर एका मोठ्या फलकाने स्वागत केले, " अखिल वैश्विक MIND IT मित्र मंडळ तर्फे आयोजित सार्वजनिक रजनीकांतोत्सव आपल्या हजाराव्या वर्षात पदार्पण करत असल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे ." तो फलक वाचताक्षणीच " स्वामी  संकेतानंद कृत रजनीकांतायण" या प्राचीन महाकाव्याची "MIND IT मित्र मंडळ"  हा अध्याय डोळ्यासमोर तरळला. भावनावेग अनावर होऊन डोळयातून हर्षधारा वाहू लागल्या. शरीर रोमांचित झाले. रजनीकॄपेने आजही "MIND IT मित्र मंडळ" त्याच पद्धतीने सार्वजनिक रजनीकांतोत्सव साजरा करत आहे.एवढेच नव्हे तर हा उत्सव आता संपूर्ण विश्वात सर्व जाती-धर्म-पंथाचे लोक साजरा करतात. या सणाने जगभरातील भेदभाव कामयचा नष्ट केलाय.          आता घरी आल्यावर माझ्या संग्रहात असलेले "सार्वजनिक रजनीकांतोत्सव" ची प्रथम घोषणा करणारे ऎतिहासिक पत्रक वाचायला काढले. हजार वर्षं जुने असलेले हे पत्रक आपल्या दर्शनासाठी प्रकाशित करतोय.   ...

"१२ रजनीचित्रपट व्रत" - विधी

प्रस्तावना : -        "१२ रजनीचित्रपट व्रत" हे रजनीकांतदेवांचे परमभक्त स्वामी संकेतानंद महाराज ह्यांच्या अनेक वर्षांच्या दिव्य साधनेचे फळ होय. हे व्रत अतिशय सिद्ध व तत्काळ परिणाम दाखवणारे आहे.हे व्रत श्रद्धेने पूर्ण केल्यास रजनीकांतदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या काही लीला करण्याची क्षमता सामान्य माणसात अंगी येते.        समस्त भूलोकीच्या मर्त्य मानवांना या व्रताचा लाभ व्हावा या उदात्त हेतूने ह्या व्रताची सम्पूर्ण विधी स्वामी संकेतानंद महाराज ह्यांनी प्रस्तुत अनुदिनीलेखकास सांगितलेली आहे. ह्या व्रताची अचूक व परिणामकारक विधी फ़क्त याच अनुदिनीवर असून भाविकांनी इतर खोट्या व्रत-अनुदिनींपासून सावध रहावे तसेच अनुदिनीस भेट देण्याआधी http://manmanjusha.blogspot.com या संकेतस्थळाची खात्री करुन घ्यावी. इतर अनुदिनींमधे सांगितलेली व्रत-विधी परिणामकारक नाही याची श्रद्धाळूंनी नोंद घ्यावी. तसेच हे व्रत कॉपीराइट केलेले असल्याने ह्या व्रताची नक्कल व चोरी करण्याचे पातक करु नये. रजनीकांतजी आपल्या गॉगलआडून सगळे बघत असल्याची चोरट्यांनी नोंद घ्यावी ...